फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरच्या आशिनाची गणतंत्र परेडसाठी निवड:नागपूरचे नाव केले उज्जवल

नागपूरच्या आशिनाची गणतंत्र परेडसाठी निवड:नागपूरचे नाव केले उज्जवल

Advertisements

 

खडतर,शिस्तबद्ध सरावामुळे पायातून रक्त मात्र उरात प्रखर देशाभिमान

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २३ जानेवारी: २६ जानेवारी गणतंत्र दिनी देशाच्या राजधानीत इंडिया गेट येथे होणारी परेड ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच असते.अतिशय शिस्तबद्ध असणारी ही परेड दूरचित्रवाहीनीवर बघण्यास उल्लहासित,आनंददायी वाटत असली तरी या मागे परेडमध्ये सहभागीतांचे किती कठोर परिश्रम आणि खडतर सरावाची पार्श्वभूमी असते ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतरांना माहिती नसते.नागपूरची अशीच एक तरुणी आशिना सावरकर हिला या वर्षी दिल्लीच्या इंडिया गेट येथील परेडमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले,विशेष म्हणजे संपूर्ण देशभरातून अतिशय कठोर सरावातून आधी २०० विद्यार्थी निवडण्यात आले यामधूनही शेवटचे ५० विद्यार्थ्यांनाच देशासाठी आपले परिश्रम सांडवण्याचे भाग्य लाभले त्यात नागपूरच्या आशिना हिने आपल्या कठोर जिद्दीने बाजी मारली.

आशिना हिच्या जिद्द, चिकाटी व ध्येयासाठी च्या झपाटलेपणामुळेच हे सिद्ध होऊ शकल्याचे तिची आई डॉ.प्रिती सावरकर यांनी खास ‘सत्ताधीश‘ला सांगितले. प्रिती या पॅथोलॉजिस्ट आहेत तर आशिनाचे वडील महेश सावरकर हे सेंट्रल रेल्वेमध्ये अभियंते आहेत.
आशिना ही सध्या उत्तराखंडीतील हरिद्वार येथील देव संस्कृती विश्‍वविद्यालयाची पदव्युत्तरची विद्यार्थिनी असून गढवाल मंडळाच्या ज्या सहा विद्यार्थ्यांची निवड या राज्यातून झाली त्यात अाशिना हीचा क्रमांक लागला.अाशिनाने आपल्या आईसोबत आगरा येथे ४ डिसेंबरपर्यंत झालेल्या सरावाबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या.आगरा येथे अतिशय कठोर सरावाला तिला सामोरे जावे लागले.या सरावातूनच तिची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली.

आग-याच्या सरावामध्ये विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा देखील श्‍वास घ्यायला वेळ दिला गेला नाही.एवढी टफ स्पर्धा असल्याचे तिने आईला सांगितले.तिच्यासोबत सरावामध्ये सोबत असणारे अनेक विद्यार्थी हे या अतिशय कठाेर सरावात अनुत्तीर्ण झाल्यामुळे सरावाच्या बाहेर झाले,त्यांचे ढसाढसा रडणे हे देशाप्रती सादरीकरण न करु शकल्याच्या प्रेमापोटीच असल्याचे आशिना सांगते.

भारत देशाच्या गौरवाचे मानांकन असणा-या इंडिया गेटवर पंतप्रधान व इतर मान्यवरांच्या समोर दहा किलोमीटरची सलग परेड करणे हे कोणत्याही भारतीयाचे ऊर अभिमानाने भरुन आणनारेच आहे.मात्र प्रत्येकाच्या भाग्यात ही संधी नसतेच मूळी.

आगरा येथील प्रशिक्ष् णात अाशिना यांची निवड होताच तिला दिल्लीतील ब्लॅक कमांडोनी प्रशिक्ष् णासाठी ताब्यात घेतले.‘ उरी सर्जिकल स्ट्राईक‘मध्ये ज्या ब्लॅक कमांडोंनी दुश्‍मनांचे छक्के सोडवलेत,तेच २६ जानेवारीच्या परेडसाठी देशभरातून आलेल्या या विद्यार्थ्यांना राजपथावर प्रशिक्ष् ण देतात.मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना खाऊ-पिऊ घातल्या जातं…यानंतर मात्र…पाण्याच्या एका घोटासाठीही या विद्यार्थ्यांना उसंत मिळू दिली जात नाही,एवढा कठोर हा सराव असतो.आशिना सांगते तिच्या पायातून रक्ताची धार निघते मात्र…सरावामध्ये कुठेही कसूर केला जात नाही.एवढा जढ ड्रमसेट एवढ्या किलोमीटरपर्यंत उचलून त्यांचे खांदे देखील सूजतात,बोटांतूनही रक्त वाहतं मात्र…एवढीसी चूक अन्‌….परेडमधून बाहेर…आपल्या महाविद्यालयात परत पाठवलं जातं…अनेकांना परत पाठविल्या गेलं…अाशिनाला हे नको हवं होतं…तिला तिच्या राज्याचं प्रतिनिधित्व करायचं होतं….यासाठी तिने सुरवातीपासूनच मनातील जिद्द आणि चिकाटी कायम ठेऊन एकानंतर एक खडतर मुकाम सर केले…येत्या २६ जानेवारी रोजी मूळ नागपूर,सेमिनरी हिल्स येथील ही मूलगी नागपूरकरांना अभिमानाने परेडमध्ये दिसणार आहे.

२६ जानेवारीच्या परेडमध्ये विविध राज्यांच्या झांकी,सेनाच्या तुकडीद्वारे परेड तसेच बँड याचे प्रदर्शन देशातील नागरिकांच्या मनात एक वेगळाच उल्लास निमार्ण करीत असतात मात्र या मागे सैन्य आणि विद्यार्थ्यांचा किती कठोर सराव असतो हे आशिनाच्या बोलण्यातूनच तिच्या आईला उमजले.त्यांच्याकडे मोबाईल देखील ठेवू दिला जात नाही.कुटुंबियांशी बोलण्याची व्यवस्था सैन्यच करते,सर्वात महत्वाचे म्हणजे आशिनाची दिल्लीच्या परेडसाठी निवड होताच आशिनाच्या नागपूर येथील घराची केंद्रिय सुरक्ष्ा पथकांद्वारे झडती घेण्यात आली.हा त्यांच्या नियमांचा भाग असतो,असे प्रिती सांगतात.

विशेष म्हणजे २६ जानेवारीच्या परेडमध्ये विविध राज्यातील लोकनृत्य देखील सादर केली जातात,आशिना हिचा छत्तीसगड राज्यातून नृत्यामध्ये देखील निवड झाली मात्र आशिना हिला ब्लॅक कॅट कमांडोंसोबच्या खडतर सरावामध्येच रस होता परिणामी तिने निवड स्पर्धे दरम्यान मुद्दामून अतिशय वाईट नृत्य सादर केले तरी देखील तिची निवड नृत्यासाठी झाली होती,मात्र आशिनाने नृत्या ऐवजी परेडमध्येच सहभागी होण्याचा निश्‍चय कळवला.

आशिना हळवी पशुप्रेमीही…
मूळात आशिना ही अतिशय चांगली क्रीडापटू असून ती एक उत्तम हॉकी प्लेअर आहे.तिच्यात एक संवेदनशील मन देखील असल्याची प्रचिती तिच्या पशुप्रेमाबद्दलची छायाचित्रे बघितल्यास येते. ती पशुप्रेमी संघटनेची संचालक देखील आहे. नागपूरच्या रस्त्यावरील कितीतरी जखमी पशु पक्ष्यांना तिने जीवनदान दिले आहे.तिची हीच भूतदया तिची स्वप्ने साकार करण्यास मदतगार ठरतात असे प्रिती,आशिनाची आई सांगते.

छत्तीसगडमध्ये चौका-चौकात आशिनाचे फलक महाराष्ट्रात दखल सुद्धा नाही!
आशिनाने आपल्या आईला छत्तीसगडमधील चौका चौकात तिचे व तिच्यासह ज्यांची त्या राज्यातून या परेड साठी निवड झाली त्यांची छायाचित्रे लागल्याचे फलकांचे फोटोज पाठवले.छत्तीसगडमध्ये २६ जानेवारीच्या परेडसाठी त्यांच्या राज्यातून निवड होणा-या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून विशेष बहूमान प्राप्त होत असतो.मात्र मूळ महाराष्ट्राची ती ही नागपूरची कन्या असून देखील माझ्या घराच्या शेजारच्या गल्लीत देखील माझ्या परिश्रमाची,यशाची दखल घेतली जात नसल्यची खंत नुकतीच आशिनाने आपल्या आईजवळ व्यक्त केली.

तल्लख बुद्धीची आशिना ही नागपूरची ’श्रावणक्वीन’ देखील राहीली आहे.त्या स्पर्धेत शेकडो नागपूरकरांनी माझे कौतूक केले मात्र आज मी देशासाठी एवढे खडतर प्रयास करीत आहे त्याबद्दल माझ्याच शहरवासीयांना माहिती सुद्धा नाही,अशी खंत तिने नुकतीच आपल्या आईकडे व्यक्त केली.

मला आपल्या मातृस्थळाचेही कौतूक हवे असे ती सांगते.ती मूळ नागपूरची आहे याचा ती सार्थ अभिमान बाळगते.आशिना या महाराष्ट्राच्या लाडक्या कन्येला तिच्या या गौरवास्पद यशाबद्दल नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मानाचा मुजरा!

(डॉ.प्रिती सावरकर-९४२२१०४०१९)

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या