
हेतूपुरस्सर केली महामेट्रोची बदनामी:अधिका-यांचा दावा
प्रशांत पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल
नागपूर,ता. २२ जानेवारी: महामेट्रोने ताेट्यात चालणा-या मेट्रो रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली यात शहरातील नागरिकांना वाढदिवस,सण-सोहळे धावत्या मेट्रोमध्ये साजरे करण्याची मुभा दिली.शहरातील अनेक नागरिकांनी याचा आनंद ही लृटला मात्र परवा बुधवार दि. २० जानेवारी २०२१ हा दिवस महामेट्रोसाठीच नव्हे तर संपूर्ण नागपूर शहरासाठी अतिशय दूर्देवी तसाच बदनामी कारक ठरला असल्याचे विधान महामेट्रोचे उपव्यवस्थापक अखिलेश हळवे यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केले.मेट्रोच्या नावावर गरिमामय ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नागपूर शहराचीच मानहानि करण्याचा अशलाघ्य प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला.
महामेट्रोने आपला महसूल वाढविण्यासाठी नुकतीच ‘पॅलेस ऑन व्हील्स’च्या पार्श्वभूमीवर नागपूरात ’सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ ही योजना अंमलात आणली. मात्र शहरातील एका संघटनेच्या कृकृत्याने शहराची प्रतिमाच मलीन केल्याचा प्रकार काल महामेट्रोमध्ये घडला.विशेष म्हणजे या संघटनेने या संपूर्ण अवैध कृत्याचे व्हीडियोज हेतूपुरस्सर माध्यमांना व्हायरल केले!
महामेट्रोच्या नागपूरकर नागरिकांना निखळ आनंद देण्या-या योजनेचा काल शेखर शिरभाते नामक व्यक्तीने प्रशांत पवार अध्यक्ष् असलेल्या ‘जय जवान जय किसान’संघटनेच्या संगनमताने वाढदिवसासाठी मेट्रो बू करुन चक्क एका तासाच्या प्रवासात मेट्रोमध्ये तृतीय पंथी नाचवले,जूगार ही भरवला,एवढेच नव्हे तर प्रशांत पवार हे स्वत: तृतीय पंथीयांवर पैसे उधळतानाचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे.यामुळे शहराच्या एका महत्वाकांक्ष्ी प्रकल्पाच्याच प्रतिमेला जगभरात धक्का लागला असल्याचे विधान हळवे यांनी केले.
एखाद्या वेळी महामेट्रोच्या अधिका-यांसोबत वैयक्तिक द्वेष समजू शकतो मात्र सूड भावनेत आंधळे होऊन शहराचीच प्रतिष्ठा धूळीला मिळवायची हे योग्य नव्हते,असे ते म्हणाले.आतापर्यंत आम्ही नागरिकांकडून आगाऊ रक्कम(ॲडव्हांस)घेत नव्हतो.मात्र आता या घटनेनंतर मेट्रोची बदनामी करण्यासाठी किवा शहराची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी महामेट्रोचा वापर झाल्यास नुकसानभरपाई म्हणून या पुढे आम्ही आगाऊ रक्कम नागरिकांकडून भरुन घेणार असल्याचे ते म्हणाले.
एका संघटनेच्या अविचारी वागण्यामुळे आता संपूर्ण भुर्दंड हा नागपूरकर नागरिकांवर बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.शहराला काळीमा फासणारी ही घटना असून वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बूक करणे,त्यात असभ्यपणे तृतीय पंथीयांना नाचवणे,त्यांच्यावर पैसा उधळणे,जुगार भरवणे,त्या जुगाराचे दृष्य चित्रण करणे,माध्यमांना उथळ प्रसिद्धीसाठी व मेट्रोच्या बदनामीसाठी हेतुपुरस्सर व्हिडीयो पुरवणे ही मेट्रोसारख्या महत्वाकांक्ष्ी प्रकल्पालाच नव्हे तर शहरालाच काळीमा फासणारी घटना असल्याचे मत यांनी व्यक्त केले.
स्नेहनगर येथील शेखर शिरभाते यांनी वाढदिवसासाठी मेट्रो बूक केली होती,यात मेट्रोची काय चूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.महामेट्रोने एखादी योजना काढली,त्यात नागरिकांना सहभागी करुन घेतले,नागरिकांनी देखील या योजनेचा निखळ आनंद लृटला मात्र परवाच्या घटनेत हेतुपुरस्सर तृतीयपथांना बोलावून नृत्य करवून घेणे,जुगार भरवणे त्याचे व्हीडीयोज व्हायरल करणे यासारख्या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्याच निखळ आनंदावरच विरजण पडले असून,याची सर्वस्वी जवाबदारी ‘जय जवान जय किसान’सारख्या संघटनेची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.उथळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी शहराचीच प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.माध्यमांनी आमची देखील बाजू समजून घ्यावी व ती निरपेक्ष् पणे मांडावी अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
जय जवान जय किसान’संघटनेवर एफआयआर दाखल
महामेट्रोची बदनामी करण्यासाठी खोट्या व्यक्तीकरवी मेट्रो बूक करुन बुधवारी मेट्रोमध्ये झालेल्या असभ्य वर्तनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात आज मेट्रोकरवी ‘जय जवान जय किसान’संघटनेच्या व या संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.वाढदिवसासारखे आनंदाचे क्ष् ण धावत्या मेट्रोमध्ये आपल्या आप्तस्वीयांसोबत साजरा करण्यासाठी मेट्रोतर्फे ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ही योजना सुरु करण्यात आली होती.
वाढ दिवसा सारखे चांगले क्षण स्वकीयांसोबत घालवता यावे या करता महा मेट्रो तर्फे सुरु केलेल्या `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ उपक्रमात गोंधळ घालणाऱ्यांवर एफआयआर रजिस्टर करण्याकरता महा मेट्रो तर्फे तक्रार नोंदवण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात या संबंधीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. २० जानेवारीला `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अंतर्गत वाढ दिवस साजरा करण्या करता मेट्रो गाडी बुक करत गाडीत प्रवासा दरम्यान आपल्या कृतीने महा मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेखर शिरभाते व राहुल कोल्हे, जय जवान जय किसानचे प्रशांत पवार आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या विरोधात हि तक्रार नोंदवण्यात आली .
महा मेट्रोतर्फे नागरिकांकरता `सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ हि अनोखी योजना राबवली जात असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळात आहे. फक्त ३०५० रुपये मध्ये वाढदिवस, प्री-व्हेंडिंग शूट, लग्नाचा वाढदिवस व या सारखे इतर कार्यक्रम साजरा करू शकतात. . आज पर्यंत सुमारे ६० परिवारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या उपक्रमात आजवर अनेक मान्यवर आणि नामदारांनी सहभाग घेतला आहे. या शिवाय स्थानिक उद्योजक जय प्रकाश गुप्ता, एयर इंडिया एमआरओ मध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकारी श्री वैभव शिंपी, बांधकाम व्यावसायिक सावंत हिराणी, नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी याचे पुत्र अथ तिवारी आणि या सारख्या अनेक मान्यवरांनी आपल्या स्वकीयांचा वाढ दिवस मेट्रो ट्रेन मध्ये साजरा केला . अश्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचे काम काही समाज कंटकांनी केले आहे. हे चिथावणीखोर कृत्य जाणीव पूर्वक घडवून आणण्यात आले .
एकीकडे नागपूरकर असा उत्स्फूर्त प्रतीसाद देत असताना, दुसरीकडे मेट्रो गाडीत धुडगुस घालत, मेट्रो प्रवासाच्या आणि सार्वजनिक आयुष्यातील संकेतांची पायमल्ली करण्याचा प्रकार २० जानेवारी रोजी घडला आहे. शेखर शिरभाते यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने त्यांनी आणि राहुल कोल्हे यांनी मेट्रो ट्रेन बुक केली होती. पण सीताबर्डी ते लोकमान्य नगर प्रवासा दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी असभ्य वर्तन करत नागपूर मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मेट्रो प्रवासात तृतीय पंथियांसोबत असभ्य वर्तन, नाच गाणे आणि पैसे उधळले. तसेच जुगार खेळण्याचा प्रयत्न देखील केला.
या सर्व घटनांची प्रसार माध्यमांनी गंभीर दखल घेतली. महा मेट्रो ने देखील याची दखल घेत त्या संबंधी एफआयआर नोंदवण्यासाठी मेट्रो रेल्वे (ऑपरेशन मेंटेनन्स) ऍक्ट २००२ च्या कलम ५९ आणि ६४, भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, १४९, १८८, २६८ आणि २९४ तसेच गॅम्बलिंग ऍक्ट च्या कलाम १३ अंतर्गत महा मेट्रोतर्फे सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या योजने अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये आनंदोत्सव साजरा करताना कुठल्याही प्रकारचे अशोभनीय व्यवहार करू नये असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.

आमचे चॅनल subscribe करा