

धामेचांविरुद्ध लकडगंज पोलीस ठाण्यात ही तक्रार!
भ्रष्ट अधिका-याला अभय: तृतीय श्रेणी लिपीकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस
नागपूर,ता. २१ जानेवारी: महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात गेल्या वेळी पत्र परिषद घेतली असता यावर कारवाई म्हणून विभागाच्या तृतीय श्रेणी वरिष्ठ लिपिक सुरेश शिवणकर यांना ‘कारणे दाखवा’नोटीस पाठविण्याचा प्रकार म्हणजे ‘चाेर सोडून संन्याशाला फाशी’हा प्रकार असून मनपाला सुरक्ष्ा रक्ष् क पुरिवणा-या दोन्ही एजंसींसोबत भ्रष्ट कारभार करणारे व साढे सात कोटींचा भ्रष्टाचार करणारे महेश धामेचा यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी आज मनपाच्या विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र-परिषदेत केली.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मनपाला सुरक्ष्ा रक्ष् क पुरविणा-या दोन्ही एंजसी किशोर एजंसी तसेच सुपर सेक्यूरिटी सर्व्हिसेस यांना पोलिसांकडून मिळालेल्या परवान्याची मुदत २०१६ सालीच संपली होती मात्र ही बाब देखील धामेचा यांनी दडवून ठेवली.गेल्या वर्षी २८ एप्रिल २०२० रोजी या दोन्ही एजंसीचा करार संपला असता धामेचा यांनी कोणतीही निविदा न मागवता,एक दिवस आधीच २७ एप्रिल २०२० रोजीच या दोन्ही एजंसीसोबत पुन्हा नियमबाह्य पद्धतीने करार केला,या दोन्ही एंजसीला वार्षिक साढे सात कोटीं रुपयांचा भरणा जनतेच्या घामाच्या पैश्यातून मनपा करते,परिणामी धामेचा यांची या एजंसींजवरील खास मर्जी बघता त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करणे अपेक्ष्ति असताना तृतीय श्रेणीतील वरिष्ठ लिपिक सुरेश शिवणकर यांना १३ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली,यात काय औचित्य आहे?असा सवाल त्यांनी केला.
वरिष्ठ अधिका-याच्या मर्जीशिवाय,आदेशांशिवाय आणि आर्शिवादाशिवाय लिपिक पदावरील व्यक्ति साढे सात कोटींचा व्यवहार करु शकत नसल्याचे ते म्हणाले.नोटीसमध्ये शिवणकर यांनाच वरील दोन्ही एजंसीचा परवाना संपला हे वरिष्ठांच्या निर्दशनास का आणून दिले नाही?अशी विचाणा करीत नवीन कार्यादेश (नस्ती) सादर करुन वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका शिवणकर यांच्यावर ठेवणे म्हणजे ’तुम्ही मारल्यासारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो!’असे नाट्य असल्याची प्रखर टिका मेश्राम यांनी केली.धामेचा हे पदाधिका-यांना,नागपूरकर जनतेला मूर्ख समजतात का?असा सवाल त्यांनी केला.
आयुक्तांनी १९ ता.पासून किशोर एजंसीला काम थांबविण्याचे निर्देश दिले असले तरी या संपूर्ण भ्रष्टाचाराला कारणीभूत असणारे महेश धामेचा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी मेश्राम यांनी केली.
धामेचा यांच्यावर २०१६ पासून लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!
धामेचा यांचे प्रताप अलीकडचे नसून ते लकडगंज झोनमध्ये सहायक आयुक्त पदी असताना त्यांच्या विरोधात लक्ष्मीकांत देवीदत्त मुरारका यांनी एका अनाधिकृत इमारतीला नियमबाह्यरित्या संमतीपत्र देण्याबाबत लकडगंज पोलिस ठाण्यात १२ डिसेंबर २०१६ रोजी तक्रार दाखल केली असल्याची माहिती याप्रसंगी मेश्राम यांनी दिली.त्यांच्या विरोधात भा.दं.स.चे कलम ४२०,४६७,४६८,४७१ व ३४ अश्या कलमा लावण्यात आल्या आहेत.या इमारतीचे मालक,मंुबईची कंपनी तसे मनपाचे महेश धामेचा यांच्या विरोधात ही तक्रार दाखल आहे.मात्र अद्याप या गुन्ह्याबाबत प्रशासकीयस्तरावर कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
२५ लाखांच्या स्टेशनरीत देखील केला अपहार!
एवढेच नव्हे तर महेश धामेचा यांनी मनपाला स्टेशनरी पुरवठामध्ये ही तब्बल पंचवीस लक्ष् ९६ हजारांचा अपहार केल्याचा आरोपाचा पुनरोच्चार ॲड.मेश्राम यांनी यावेळी केला. संदीप जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष् असताना ठराव क्र.१६० अन्वये समितीची मंजूरी न घेता असे भूगतान तीन एजंसींना कसे करण्यात आले?अशी विचारणा केली होती.गुरुकृपा स्टेशनर्स ॲण्ड प्रिंटर्स,मेसर्स पी ॲण्ड जी सेल्स काॅरपोरेशन तसेच मेसर्स सुदर्शन पेपर कनवर्टींग वर्क्स या तिन्ही कंपनीला हे भूगतान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या तिन्ही कंपंनींना काम थांबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे,याचा अर्थ धामेचा यांच्यावर केलेल्या माझ्या तिन्ही आरोपांवर शिक्कामोर्तब झाले असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
आम्हाला आयुक्तांद्वारे भ्रष्ट कारभार करणारे महेश धामेचा यांच्यावर कोणतीही थातूरमातूर कारवाई नको अाहे,कारवाईत टाळाटाळ न करता एवढ्या भ्रष्ट सहायक आयुक्तांची तातडीने निलंबन करीत कमिश्नर रँकच्या अधिका-याकडून गेल्या ७ वर्षांपासून एकाच विभागात एकाच पदावर कार्यभार करणारे सामान्य प्रशासन विभागाचे महेश धामेचा यांची चौकशी व्हावी अशी देखील मागणी ॲड.मेश्राम यांनी याप्रसंगी केली.




आमचे चॅनल subscribe करा
