Homeनागपूर न्यूजआ.भांगडिया प्रकरण:उच्च न्यायालयाचा दणका:पोलीस अधिकारी येऊ शकतात अडचणीत!

आ.भांगडिया प्रकरण:उच्च न्यायालयाचा दणका:पोलीस अधिकारी येऊ शकतात अडचणीत!

Advertisements
Advertisements

नागपूर,ता. १२ जानेवरी: आमदार कीर्तीकूमार भांगडिया नासुप्र सदनिका हडपण्याच्या प्रकरणात काल सोमवार दि. ११ जानेवरी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश देत इमामवाडा तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना दोन वेगवेगळ्या प्रकणात अर्जदारांनी संपूर्ण पुराव्यासंह २९ ऑक्टोबर २०२० रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणती पावले उचललीत?यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले,न्यायालयाच्या या आदेशामुळे या दोन्ही पाेलीस ठाण्यातील अधिकारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे बेघरांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये सदनिका मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा आरोप असलेले आ.कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सर्व पुराव्यानिशी तक्रारकर्ते.तरुण चतुरभाई परमार यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात इमामवाडा तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर २०२० रोजीच केली होती.मात्र अडीच महिन्यांचा काळ लोटून देखील इमामवाडा तसेच सक्करदरा पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही.
परिणामी या संबधी तक्रारदात्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या विशेष न्यायालयात धाव घेतली.न्या.व्ही.एम.देशमुख यांनी दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिका-यांना आ.भांगडिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले मात्र दहा दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर देखील इमामवाडा तसेच सक्करदरा पोलिस ठाण्यात आ.भांगडिया यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली नाही!

तक्रारदात्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेत ही बाब न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिली.या तक्ररीची गंभीर दखल घेत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिका-यांनी याबाबत नुकतेच आदेश पारित करीत न्यायालयीन अवमाननाची केस दाखल का करण्यात येऊ नये?अशी विचारणा करणारा आदेश पारित केला.न्यायालयाने या दोन्ही प्रकरणी बंटी भांगडिया यांच्यावर गुन्हे दाखल करुन तपासाअंती न्यायालयापुढे अहवाल सादर करण्याचे आदेश दोन्ही पोलिस ठाण्यांना यापूर्वी दिले होते.

मात्र या आदेशाची पूर्तता न झाल्याने याचिकाकर्त्यांनी परत न्यायालयात धाव घेतली होती.यावर न्यायालयाने दोन्ही पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्ष् कांना नोटीस बजावली होती. शुक्रवारी ९ जानेवारी २०२० रोजी यावर सुनावणी झाली.यावेळी दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्ष् कांनी लवकरच गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्‍वासन न्यायालयाला दिले होते.

या संपूर्ण प्रकरणावर काल साेमवारी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश देत इमामवाडा तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना दोन वेगवेगळ्या प्रकणात अर्जदारांनी संपूर्ण पुराव्यासंह २९ ऑक्टोबर २०२० रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणती पावले उचललीत?यावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे,न्यायालयाच्या या आदेशामुळे या दोन्ही पाेलीस ठाण्यातील अधिकारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सक्कदरा पोलिस ठाण्याचे आयुर्वेदिक ले आऊट परिसरातील तसेच इमामवाडा परिसरातील बेघर लोकांच्या योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या एकूण तीन सदनिका हडपण्यासंदर्भात भादंस चे कलम १९९,२०० आणि ४२० अन्वये आ.भांगडिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिका-यांनी आदेश दिले होते.

दोन्ही प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.सतीश उके यांनी बाजू मांडली.

Latest बातम्या