
नवनिर्वाचित महापौरांनी केले मनपा पत्रकार कक्ष्ात बाळगंगाधर जांभेकरांच्या छायाचित्राला माल्यापर्ण
नागपूर,ता. ६ जानेवारी: अठराव्या शतकात बाळगंगाधर जांभेकर यांच्यासारख्या आद्य पत्रकाराने इंग्रजांच्या काळात त्यांच्याच विरोधात आपल्या ‘ दर्पण‘या साप्ताहिकेत लिहण्याचे धाडस केले.आपल्या लेखात ते इंग्रजांच्या जुल्मी राजवटीच्या विरोधात लिहण्याचे धाडस करीत होते.ख-या अर्थाने ते आजच्या तरुण पिढीचे देखील आदर्श आहेत.नव्या पिढीने बाळगंगाधर जांभेकरांच्या पत्रकारितेचा आदर्श घ्यावा,असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
ते मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्ष्ात बाळगंगाधर जांभेकर पत्रकार दिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके,सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव,प्रतोद दिव्या धुरडे आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या छोटे खानी अनौपचारिक भाषणात दयाशंकर तिवारी म्हणाले,की बाळगंगाधर जांभेकर हे एक क्रांतिकारी पत्रकार होते.मराठी भाषेत ६ जानेवरी १९३२ साली त्यांनी ‘दर्पण‘या साप्ताहिकाची सुरवात केली.दर्पण याचा अर्थ ‘आरसा’होतो.तत्कालीन जुल्मी इंग्रजी राजवटीतील कार्यभार ते निर्भिडपणे आपल्या साप्ताहिकात मांडत असत.ज्याप्रमाणे हिंदी भाषेतील पत्रकारितेत आद्य पत्रकार म्हणून गणेश शंकर विद्यार्थी यांचे नाव घेतले जाते तसेच मराठी पत्रकारितेत बाळगंगाधर जांभेकर यांचे नाव आहे.
त्यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्याचे भाग्य मला लाभले खरे तर मी हे माझे सौभाग्य समजतो असे म्हणत पत्रकार कक्ष्ात उपस्थित समस्त पत्रकार वर्गाचे त्यांनी पत्रकार दिनानिमित्त अभिनंदन केले. त्यांनी एका अज्ञात शायरच्या शायरीने आपल्या छोटेखानी भाषणाची सांगता केली.
मराठी पत्रकारितेचे अग्रदूत बाळगंगाधर जांभेकर यांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ नावाचे प्रथम मराठी साप्ताहिक वाचकांसाठी सुरु केले होते.आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी लिखाणालाच वाहीले होते.यात ते इंग्रजी विभागात लेखन करीत असे.त्यांनी इतिहास व गणित संबंधित अनेक पुस्तकांचे लेखन केले. रॉयल एशियाटिक सोसायटी तसेच जिऑग्राफिकल सोसायटीमध्ये वाचल्या जाणारे शिलालेख तसेच ताम्रपत्रांशी संबधित त्यांनी लिहलेले निंबध हे अत्यंत महत्वाचे मानले जातात.याच शिलालेखांच्या शोधात जेव्हा ते कनकेश्वर येथे गेले तेव्हा ऊन लागून त्यांचे देहवासन झाले.ख-या अर्थानी त्यांनी आपले जिवन वाचकांसाठी वाहीले होते.त्यांच्याच स्मृति प्रित्यर्थ दर वर्षी ६ जानेवरी रोजी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार जनसंपर्क विभागाचे प्रमुख मनीष सोनी यांनी मानले.




आमचे चॅनल subscribe करा
