फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजऑन लाईन निवडणूकीने आणले नगरसेवकांच्या डोळ्यात पाणी!

ऑन लाईन निवडणूकीने आणले नगरसेवकांच्या डोळ्यात पाणी!

Advertisements

सतीश होले यांची घरवापसी!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ५ जानेवारी: महापौर व उपमहापौर पदासाठी आज मनपा मुख्यालयाच्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात ऑन लाईन निवडणूक पार पडली मात्र या ऑन लाईन निवडणूकीने मनपाच्या नगरसेवकांच्या डोळ्यात अक्ष् रश:पाणी आणल्याची माहिती आहे.

भारत देशाची लोकशाही ही शेवटी मतांवर चालते,निवडणूक म्हटली की त्यात मत देणं हे आलंच मात्र आज मनपाच्या १५६ नगरसेवकांना आपले मत महापौर व उपमहापौर निवडीच्या निवडणूकीत देताना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.अनेकांना तर लिंकच मिळत नव्हती.आवाज येत नव्हता.कोण काय बोलतंय कळत नव्हतं.पुन्हा पुन्हा नावे घेतली जात होती.जोपर्यंत नगरसेवक दिसत नाही,हात वर करत नाही,त्यांच्या नावाचा वारंवार पुकारा होत होता.मात्र पलीकडच्या नगरसेवकांना त्यांचे नाव ऐकू येत असूनही यंत्रणेशी कसे जुळावे कळत नव्हते.

सकाळी १० वा. पासून हे नगरसेवक मुख्यालयात मतदानासाठी आले असता दोन तासांच्या मतदानासाठी तब्बल साढे पाच तास सर्व नगरसेवकांना मोबाईलवर डोळे रोखून राहावे लागले.भारतीय जनता पक्ष्ाने तर महापौर कार्यालयात झोन निहाय नगरसेवकांचे गट बनवून मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याची माहिती आहे.भाजपच्या नगरसेवकांना मतदानासाठी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत होती मात्र इतर पक्ष्ाचे नगरसेवक हे ‘भगवान भरोसे‘आपली ऑन लाईन खिंड लढवत होते.

सायंकाळी एकदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर आज अनेक नगरसेविकांनी डोक्याचा भूगा झाल्याचे सांगून डोके गरगरु लागले असल्याचे सांगितले.

भट सभागृहात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी शासनाच्या नियमांच्या अधीन राहून परवानगी प्रदान केली असताना ठाकरे सरकारने मात्र सरसकट विभागीय आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत,मतदानाची प्रक्रिया ऑन लाईन घेण्याची सूचना केली.यामुळे सत्तापक्ष् चांगलाच संतापला होता.

प्रशासनाची भाजपसोबत हातमिळवणी-संदीप सहारे
ऑन लाईन मतदानाच्या या प्रक्रियेवर पराकोटीचा संताप व्यक्त करीत कॉंग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी प्रशासनानी भाजपसोबत विरोधकांच्या मतांमध्ये गडबड करण्यासाठी हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला.त्यांच्या स्वत:च्या मतदानाच्यावेळी त्यांना त्यांचे नाव पुकारले असता यंत्रणेशी जुळताना पराकोटीचा मनस्ताप झाला असल्याचे ते सांगतात. शेवटी त्यांनी आपला मोबाईलचा आवाज आणि कॅमरा म्यूट करुन निवडणूक अधिका-याला ते उपस्थित असल्याचा मॅसेज पाठवला.
हा प्रकार महापौर पदासाठीच्या निवडणूकीत तर घडलाच मात्र उपमहापौर पदाच्या निवडणूकीत देखील तोच प्रकार पुन्हा घडल्याने त्यांनी वरील आरोप केला.प्रशासनाचीच खेळी असल्यामुळे कॉंग्रेसचे बंटी शेळके,गार्गी चोपरा,पुरुषोत्तम हजारे व कमलेश चौधरी यांना अनुपस्थित दाखविण्यात आल्याचा आरोप संदीप सहारे यांनी केला.सत्तापक्ष्ाला काँग्रेसमध्येच ‘एकी’ नाही हे माध्यमांना दाखवायचे होते त्यामुळे त्यांनी प्रशासनाला हाताशी धरुन या चारही काँग्रेसच्या नगरसेवकांना अनुपस्थित दाखवले,असा उघड-उघड अारोप संदीप सहारे यांनी खास ‘सत्ताधीश’जवळ केला.

माझे जावई स्वत:आय.टी.वाले असतानाही त्यांना देखील माझी लिंक जोडून देण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला,आय.टी.वाले तज्ज्ञ यांनाच जर लिंकसोबत जुळायला एवढी मेहनत घ्यावी लागली तर सामान्य नगरसेवकांचे काय?कॉंग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित नसून भापच्या सांगण्यावरुन प्रशासनानेच तंत्रामध्ये गडबड करुन त्यांना मतदान करु दिले नाही,असा आरोप संदीप सहारे यांनी सत्तापक्ष्ावर केला.

होले यांची घरवापसी-
नोव्हेंबर २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीत भाजप पक्ष्ाकडून आमदारकीचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी बंडाचा झेंडा फडकावून अपक्ष् म्हणून विधान सभेची निवडणूक लढली.यात त्यांना यश मिळाले नसले तरी पक्ष् शिस्त मोडली म्हणून त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती.दक्ष्ि ण नागपूर मतदार संघातून सतीश होले यांनी भाजपचे मोहन मते व काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
मात्र होले यांनी आज पक्ष् निष्ठा बाळगत दयाशंकर तिवारी यांना मतदान केल्याने ‘आमचा माणूस आमच्यात परतला’हीच चर्चा भाजप गोटात आज मनपा मुख्यालयी ऐकू येत होती.मनपाच्या निवडणूकीला फक्त १३ महिन्यांचा कालावधी राहीला असल्याने होले यांनी पुढील निवडणूक बघून पक्ष्ाशी जुळवून घेतल्याची देखील चर्चा होती.

काँग्रेसतर्फे आमदारकी मिळालेलेच मतदानात अनुपस्थित!
काँग्रेस पक्ष्ातर्फे युवा नेते बंटी शेळके यांना मध्य नागपूर तर पुरुषोत्तम हजारे यांना दक्ष्णि नागपूरातून आमदारकीची तिकीट देण्यात आली होती मात्र आज मनपा मुख्यालयात पार पडलेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीतून बंटी शेळके,पुरुषोत्तम हजारे,गार्गी चोपरा यासारखी अत्यंत महत्वाची नावेच अनुपस्थित राहील्याने याविषयी देखील मनपा मुख्यालयात चांगलेच चर्विचर्वण सुरु होते.बंटी शेळके हे मध्य नागपूरातील काँग्रेसचे युवा नेतृत्व असून दयाशंकर तिवारी हे देखील मध्य नागपूरचे प्रभावी प्रस्थ असल्याने बंटी शेळके यांनी मतदानासाठी दांडी मारल्याचे बोलले जात होते.तर गार्गी चोपरा यांचे पतीदेव हे भाजपवासी असल्याने काँग्रेसतर्फे गार्गी चोपरा यांचे मत पडू शकले नसल्याचे देखील सांगितले जात होते.

वरील सर्व नगरसेवकांशी ‘सत्ताधीश‘ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही परिणामी,त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.ज्येष्ठ अपक्ष् नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रभागात निकटच्या कार्यकर्त्याच्या घरी मृत्यू झाला असल्याने त्या देखील मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहील्या.

दयाशंकर तिवारी यांच्या घोषणांनी दणानला मनपा मुख्यालय परिसर-
दयाशंकर तिवारी यांची प्रदीर्घ चालणा-या मतगणनेनंतर विजयाची घोषणा झाली.यानंतर उपमहापौर निवडणूकीत ही बराच कालावधी गेला.एकदाचा दुपारी साढे चार दरम्यान दोन्ही भाजपचे उमेदवार दयाशंकर तिवारी तसेच मनीषा धावडे यांनी प्रत्येकी १०७ मते घेऊन विजय मिळवल्यानंतर स्थायी समिती सभागृहाबाहेरुनच ‘कमल गुंजी युपी और बिहारी..दयाशंकर तिवारी दयाशंकर तिवारी’’दया भैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है’या सारख्या घोषणांनी संपूर्ण मनपा मुख्यालय परिसर चांगलाच दणानला.दुपारी चार नंतर नागपूरात अनेक चौकात नव्या महापौरांच्या अभिनंदनाचे फलक झळकू लागले.हा संपूर्ण उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांचा होता की दयाशंकर तिवारी यांच्या समर्थकांचा?याविषयी मात्र खासगीत गप्पा झडत होत्या.

थोडक्यात महापौर व उमहापौर पदासाठी ‘करोनामुळे’ऑन लाईन पार पडलेली ही निवडणूक समस्त नगरसेवकांच्या आयुष्यभर चांगलीच स्मरणात राहणार आहे,हे मात्र नक्की.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या