Homeनागपूर न्यूजविधानमंडळ सचिवालय कक्षाचे उद्या उद् घाटन

विधानमंडळ सचिवालय कक्षाचे उद्या उद् घाटन

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ऑन लाईन उपस्थिती

नागपूर, दि. ३ डिसेंबर : उपराधानी नागपूरातील विधानभवनात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कक्षाचे उद् घाटन उद्या (सोमवार, ४ जानेवारी) होत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांसह प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा उद् घाटन समारंभ होणार आहे.

विधान भवनाच्या जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षात दुपारी १.३० वा. हे उद् घाटन होईल. त्यानंतर विधानसभा सभागृहात मुख्य सोहळा पार पडणार आहे.

हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असून सुरक्षेच्या कारणास्तव सोबत निमंत्रण पत्रिका आणि ओळखपत्र आणने आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन या कार्यकमास नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी उपस्थित रहाण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय बंद करण्यात येऊन विधान भवन, मुंबई येथे सुरु करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत कार्यालय कामकाजासाठी बंद असते.

विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधान भवन नागपूर येथील कार्यालय वर्षभरासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

Latest बातम्या