फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजश्‍वानांच्या आभासी पालकत्व उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

श्‍वानांच्या आभासी पालकत्व उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

Advertisements

सेव्ह स्पीपलेस संघटनेने मानले आभार:एका दिवसात १२ पिल्ले गेली दत्तक

नागपूर,ता. १ जानेवरी:  प्राण्यांची शहरातील संख्या बघता प्रत्येकाचे उदरभरण होणे शक्य नाही.यातील अनेक श्‍वान अपघातात किवा मानवी अत्याचारा ला बळी पडून गंभीर जखमी होतात,असे प्राणी तसेच श्‍वानांना काही प्राणीप्रेमी संघटना शेल्टर होम उघडून आश्रय देतात,त्यांची शुश्रुषा करतात,औषधोपचार करतात मात्र शेवटी त्यांना ही एक मर्यादा असतेच.अश्‍यावेळी शेल्टर होममधील काही श्‍वानांचे आभासी पालकत्व शहरातील नागरिकांनी स्वीकारल्यास शेल्टर होमधील प्राण्यांवरील खर्चाचा भार कमी होऊन याच पैश्‍यात शहरतील आणखी श्‍वानांना आश्रय देता येईल,औषधोपचार करता येईल या उदात्त हेतूने दरवर्षी शहरातील सुप्रसिद्ध प्राणी संघटना ‘सेव्ह स्पीचलसे‘तर्फे १ जानेवरी रोजी ‘श्‍वानांची दत्तक योजना ’ हा उपक्रम राबविला जातो,यावेळी देखील या उपक्रमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून आज एकाच दिवशी शेल्टर हाेममधील १२ पिल्ले नागरिकांनी दत्तक घेतले तसेच ४ श्‍वासानांचे आभासी पालकत्व नागरिकांकडून स्वीकारण्यात आले.

पाळीव प्राण्यांची अनेकांना आवड असते मात्र प्रत्यक्ष् त्यांचा सांभाळ करण्यास वेळ मिळत नाही अश्‍यावेळी शेल्टर होममधील एखादे श्‍वान यांचे आभासी पालकत्व स्वीकारण्याचे अावाहन ‘सेव्ह स्पीचलेस’ने नागरिकांना केले होते.सकाळी ११ ते २ या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार होता मात्र आज दिवसभर हजारी पहाड येथील संस्थेच्या शेल्टर होमवर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली.

विशेष म्हणजे या प्राणी शुश्रुषा केंद्रात आश्रित असणा-या सर्व श्‍वानांचे छायाचित्रे संस्थेच्या फेसबूक पेजवर प्रसिद्ध करण्यात आली होती.संस्थेतर्फे या उपक्रमाचे हे ७ वे वर्ष आहे. २०१४ पासून संस्थेतर्फे हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या वर्षी देखील अनेक नागरिकांचे आज दिवसभर संस्थेच्या संचालिका स्मिता मिरे यांना विचारणा करणारे फोन येत होते.अनेकांनी येत्या काही दिवसात या शुश्रुषा केंद्रातील प्राण्यांचे आभासी पालकत्व स्वीकारणार असल्याचे सांगितले.

स्मिता मिरे यांनी आज एकाच दिवसात त्यांच्या केंद्रातील तब्बल १२ पिलांना स्वत:च्या हक्काचे घर व माणसे मिळाल्याने ‘सत्ताधीश’कडे आनंद व्यक्त केला.मात्र शहरातील नागरिकांनी पुढे येऊन शुश्रुषा केंद्रातील आणखी जास्त श्‍वांनाचे पालकत्व स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.

डीसीपी विनिता शाहू यांची सेव्ह स्पीचलेस संस्थेच्या शुश्रुषा केंद्राला भेट-
आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारात डीसीपी विनिता शाहू यांनी सेव्ह स्पीचलेस केंद्राच्या हजारी पहाड येथील शुश्रुषा केंद्राला भेट देऊन या उपक्रमाचे भरभरुन कौतूक केले.हा उपक्रम अतिशय चांगला असून काहीही मदत लागली तर सांगा,असे त्या म्हणाल्या.श्‍वानांवर केला जाणा-या मानवी अत्याचाराबाबत तसेच क्रोर्याबाबत बोलताना,जोपर्यंत तक्रारकर्ते स्वत: समोर येणार नाही तोपर्यंत पोलीस काय कारणार?अशी अगतिकता त्यांनी व्यक्त केली.

मुक्या प्राण्यांच्या नैसर्गिक तसेच नैतिक हक्कांच्या संरक्ष् णासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात समोर येण्याचे डीसीपी विनिता शाहू यांनी याप्रसंगी आवाहन केले.याप्रसंगी जवळपास अर्धा तास त्यांनी केंद्रातील श्‍वानासोबत घालवला.या पुढे देखील या केंद्राल भेट देत राहील असे त्या म्हणाल्या.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या