Homeनागपूर न्यूजमहापौर पदाची निवडणूक: विभागीय आयुक्तांद्वारे अधिसूचना जाहीर

महापौर पदाची निवडणूक: विभागीय आयुक्तांद्वारे अधिसूचना जाहीर

Advertisements
Advertisements

५ जानेवरी रोजी होणार निवडणूक

नागपूर,ता.२८ डिसेंबर: माजी महापौर संदीप जोशी यांनी गेल्या सोमवारी दि.२१ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महापौर पदासाठी येत्या मंगळवार दि. ५ जानेवरी रोजी पुन्हा निवडणूक होणार असून याबाबतची अधिसूचना आज जाहीर झाली. महापौर पदासोबसात उपमहापौर मनीषा कोठे यांनी देखील आपला राजीनामा दिला असल्यामुळे ५ जानेवरी रोजी मनपाच्या विशेष सभेत महापौर तसेच उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार अाहे.

भारतीय जनता पक्ष्ातर्फे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे उमेदवार राहणार असल्याचे माजी महपौर संदीप जोशी यांनी पत्र परिषदेत घोषित केले होते.

महापौर पदासाठी बुधवार दि. ३० डिसेंबर रोजी,विशेष सभेच्या किमान ३ दिवसांअाधी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत.सकाळी ११ ते दूपारी ३ वाजेपर्यंत निगम सचिवद्वारे मनपाच्या डॉ.पंजाबराव देशमुख,स्थायी समिती सभागृहात हे नामनिर्देशित पत्र स्वीकारले जातील.

विशेष सभा मगंळवार दि. ५ जानेवरी २०२१ रोजी सकाळी ११ वा.कविवर्य सुरेश भट सभागृह,रेशिमबाग येथे पार पडेल.
याच दिवशी नामनिर्देश पत्राची छानणी,सभास्थळी पिठासीन अधिकारी करतील.याच वेळी सभेच्या दिवशी नामनिर्देशन पत्राची छानणी केल्यानंतर पिठासीन अधिकारी हे वैध उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पिठासीन अधिका-यांद्वारे उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेची घोषणा केली जाईल, घोषणेच्या १५ मिनिटांच्या आत स्वत: उमेदवाराने लेखी नोटिसद्वारे पिठासीन अधिका-याकडे अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

उक्त प्रक्रियेनंतर पिठासीन अधिकारी हे निवडणूक लढविणा-या उमेदवारांची नावे घोषित करतील.मतदान आवश्‍यक असल्यास मतदान होईल,यानंतर निवडणूक निर्णयाची घोषणा करतील.

याच दिवशी उपमहापौर पदाची देखील निवडणूक पार पडणार असून हे पद महापौर पदासारखेचअनारक्ष्ति वर्गासाठी घोषित झाले आहे.या पदासाठी देखील वरीलप्रमाणेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

Latest बातम्या