

कलम १४४ लागू: पोलीसांचे राहणार लक्ष्
नागपूर दि,२८ डिसेंबर : नवीन वर्षाचे स्वागत करताना नागपूर महानगर व जिल्ह्यात प्रतिबंधित व शांतता क्षेत्रात फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे सोबतच या काळासाठी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ तारखेला फटाक्याच्या लडी, अधिक आवाज करणारे फटाके फोडणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
नूतन वर्ष साजरा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लोकं मोठ्या प्रमाणात फटाके उडवितात व फोडतात. यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होवून शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक हिताच्या आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ जानेवारी २०२१ पर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ जिल्ह्यात लागू केली आहे. उत्सवाच्या काळात या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कलम १८८ मधील तरतुदीनुसार कायदेशीर शिक्षेस पात्र राहील.
शहरातील पेट्रोल पंप, सिलेंडर, गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्याची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे डेपो, रासायनिक पदार्थांचे डेपो, दुकाने वस्ती अथवा बाजारपेठेत आहेत तेथील स्थानिक लोकांकडून व्यापाऱ्याकडून सदर ठिकाणाजवळ फटाके व रॉकेट इत्यादी फोडले गेल्यास फटाक्यांची ठिणगी पडून त्याद्वारे स्फोट होवून मोठ्या प्रमाणात आग लागण्याची व जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व ठिकाणी २०० फुटांच्या आत फटाके उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.
फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा, फटाके उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत ११० ते ११५ डेसीबल पेक्षा जास्त होता कामा नये. शाळा कॉलेज, रुग्णालय, न्यायालय इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात. त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई आहे. फटाक्याच्या लडी, मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित करणारे फटाके, आवाज व घन कचरा तयार करणारे फटाके फोडणे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे व कंदील आदी उडविण्यास मनाई आहे.
हरित लवादाच्या आदेशानुसार ग्रीन फटाके वगळता इतर सर्व प्रकारचे फटाके विकणे, फोडणे व उडविणे यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी-
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सुधारित निर्देशानूसार ‘लॉकडाऊन’ची कालमर्यादा ५ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली असून दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नागपूर महापालिका कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पोलीस आयुक्त नागपूर शहर तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी अमितेश कुमार यांनी संचारबंदी आदेश लागू केले आहे.
शासनाने व महापालिका नागपूर यांनी वेळोवेळी पारीत केलेल्या आदेशानुसार देण्यात आलेल्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा तसेच वस्तु याबाबतच्या सवलती समाविष्ट राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कलम १८८ मधील तरतुदीनुसार कायदेशीर शिक्षेस पात्र राहील.
असे आहेत शासनाचे आदेश-
-करोनाच्या अनुषंगाने दि.३१ डिसेंबर २०२० रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवरी २०२१ रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे.
-३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी,बागेत,रस्त्यावर अश्ाा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याकडे विशेष लक्ष् द्यावे.
-करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व १० वर्षाखालील मुलांनी सुरक्ष्तितेच्या व आरोग्याच्या दृष्टिने घराबाहेर जाणे टाळावे.
-नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
-नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहूसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अश्यावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोणातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
-फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये.ध्वनिप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
-राज्यातील मोठ्या शहरामध्ये ३१ डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी नागरिक मोठय्ा प्रमाणात गर्दी करतात,करोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
-कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन,अारोग्य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्ष् ण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका,पोलीस,स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
……………………………………




आमचे चॅनल subscribe करा
