

दिवाणी न्यायालयात बाजू मांडण्याची सुवर्ण संधी बावणकुळे यांच्यामुळे मिळेल
नागपूर,ता. २ फेब्रुवारी २०२२ : माजी ऊर्जामंत्री आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात मी कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा असल्याचे आरोप केले आहेत पण ते खोटे आहेत असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची नोटीस बजावली आहे . मला हे आज विविध वृत्तपत्रांमूधन कळले पण अद्याप अशी कोणतीही नोटीस मला प्राप्त झाली नाही .
बावनकुळे हे माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत हे सुद्धा मला वृत्तपत्रांच्या बातमीतून कळले पण ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही माझी नसगून बावनकुळे यांची आहे आणि असे जर का त्यांनी केले तर मला त्यांची उलट तपासणी घेण्याची संधी उपलब्ध होईल,याचा मलाच विशेष आंनद होणार आहे,असे ॲड.उके यांनी पत्रकाद्वारे कळवले .
चंद्रशेखर बावनकुळे जे काही म्हणाले, की त्यांचे नातलग सुरज तातोडे याने केलेले सर्व आरोप निराधार असून राजकीय षडयंत्र रचून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे खोटे आहे तर मी कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाइकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे काम सुरज तातोडे याच्या माध्यमातून , मी वकील सतीश उके करत आहे , हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे म्हणणे सपशेल चुकीचे आहे .
कोणालाही स्वतःचे खरे आणि खोटे मा. न्यायालया समक्ष सिद्ध करण्याचा अधिकार असून हा त्याचा हक्क आहे , चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांना काय करायचे ते करतील . माझी बाजू दिवाणी न्यायालयात सिद्ध करण्याची सुवर्ण संधी मला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे उपलब्ध होईल आणि मला चंद्रशेखर बावनकुळे यांची उलट तपासणी सुद्धा घेण्याची संधी उपलब्ध होईल,असे ॲड.उके यांनी नमूद केले.
या पूर्वी देखील बावणकुळे यांनी जे काही मानहानिचे दावे ठोकले होते,त्यांचे काय झाले?याचा ही उलगडा त्यांनी माध्यमांसमोर येऊन करावे,असे माझे त्यांना आव्हान आहे.दावे तर ठोकले पण कोर्टात हजरच झाले नाहीत कारण आरोपी पक्षाच्या वकीलाला त्यांची उलटतपासणी करण्याची संधी मिळत असते.हेच टाळण्यासाठी आजवर बावणकुळे यांचे मानहानिचे दावे हे ‘डिसमिस इन डिफॉल्ट’ झाले आहेत,त्यामुळेच बावणकुळे यांनी माझ्यावर खरोखरंच ५० कोटींचा मानहानिचा दावा ठाेकावाच,मला ही त्यांची उलट तपासणी करण्याची संधी यातून मिळणार असल्याने मी त्यांच्या या दाव्याचे मनापासून स्वागत करतो,असे ॲड.उके यांनी पत्रकात नमूद केले.

आमचे चॅनल subscribe करा