
चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात सहविचार सभा संपन्न
नागपूर/ चंद्रपुर (प्रतिनिधी) : परिवर्तन मिशन हे ब्रिदवाक्य घेवून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजीत वंजारी यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून चंद्रपूर येथे गुरुवारी झालेल्या सभेत एकाचवेळी २२ संघटनांनी पाठिंबा जाहीर केला.
पदवीधरांच्या समस्या निराकरण व विकासाकरिता कार्य करण्यासाठी ॲड.वंजारी उभे ठाकले असून आम्ही सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्यांना समर्थन दिले असल्याचे पत्र या संघटनांच्या नेत्यांनी ॲड. वंजारी यांना दिले.
महाराष्ट्र विधानपरिषद नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी कॅांग्रेस, शिवसेना, पिरिपा ( कवाड़े गट), आरपींआय (गवई गट) आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी चंद्रपूर येथील जनता महाविद्यालय, सिव्हील लाईन्स येथे सहविचार सभा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे होते तर मुख्य अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार, खासदार बाळाभाऊ धानोरकर व माजी आमदार देवराव भांडेकर, बाबासाहेब वासाड़े, प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, प्राचार्य अनिल शिंदे, प्राचार्य सुर्यकांत खनके उपस्थित होते.
सहविचार सभेच्या व्यासपिठावरुन सर्व मान्यवर, संघटना व उपस्थितांनी ॲड. वंजारी यांच्या विजयाचा सकल्प केला. उपस्थित सर्वांनी बहुजन समाजातील ओबीसी उमेदवार निवडून दयावा, असे जाहीर आवाहन केले.
या सहविचार सभेत संस्थाचालक संघ, प्राचार्य फोरम, नुटा, यंग टीचर्स, विजुक्टा, मुख्याध्यापक संघ, चंद्रपुर जिल्हा मुख्याध्यापक असो., विमाशी संघ, पदविधर शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, चित्रकला शिक्षक संघ, एमसीव्हीसी, बायफोकल विभाग, म.रा. जुनी पेंशन हक्क संघठन, जि. चंद्रपुर, जेष्ट नागरीक संघ, वकील असोसिएशन, ओबीसी कर्म. संघटना, महा. शिक्षकेत्तर कर्म. संघटना, माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघ., सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक संघ, म.रा. उच्च माध्य. क. महा. शाळा कृती संघटना, म. रा. प्राथ. शिक्षक समिती, ओबीसी कर्म. अधिकारी संघटना, आदींनी पाठींबा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रवी वरारकर यांनी केले.

आमचे चॅनल subscribe करा