Homeनागपूर न्यूजहजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज सादर

हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज सादर

Advertisements

गडकरी, फडणवीस यांचीही उपस्थिती

नागपूर, २२ नोव्हेंबर: स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, बरिएमंच्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, आमदार उपस्थित होते.

आज सकाळी १०.३० वाजता शहर व जिल्ह्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी आकाशवाणी चौकात एकत्र आले. त्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ना. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घेतला. ना. गडकरी यांच्या निवासस्थानी कांचन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्योती बावनकुळे, संकेत, पायल आष्टनकर व लोकेश आष्टनकर उपस्थित होते.

अर्ज भरण्यासाठी निवडणूक प्रमुख आ. प्रवीण दटके आणि सहनिवडणूक प्रमुख डॉ. राजीव पोतदार खा. डॉ. विकास महात्मे, माजी खा. अजय संचेती, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. गिरीश व्यास, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, माजी आ. सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, चरणसिंग ठाकूर, महानगर पालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर पालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजताच आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली होती. सकाळपासूनच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. रस्त्यावर भाजपाचा झेंडा असलेली वाहने फिरत होती. सकाळपासून हा परिसर भाजप कार्यकर्तेमय झाला होता

 

Latest बातम्या