Homeनागपूर न्यूजस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट सिटीतर्फे प्रेरणादायी कार्यक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट सिटीतर्फे प्रेरणादायी कार्यक्रम

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

१ ते ३ ऑक्टोबर दरम्यान शहरात अनेक उपक्रमांचे आयोजन

स्तनदा मातांसाठी सुरु होणार ‘पिंक केबिन’

नागपूर, ता. २९ सप्टेंबर २०२१ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएसएससीडीसीएल) च्या वतीने १, २ आणि ३ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. तिनही दिवस सकाळी ६.३० वाजतापासून विविध कार्यक्रमांना सुरूवात होईल. हे कार्यक्रम रात्री ९ वाजतापर्यंत सुरु राहतील. नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी आज पत्र-परिषदेत सांगितले की, केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे नागपूर स्मार्ट सिटीची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑक्टोबरला सक्करदरा तलावालगत उद्यानासमोर, २ ऑक्टोबर रोजी सीताबर्डी मेन रोड येथे ग्लोकल मॉलच्या समोर आणि ३ ऑक्टोबर रोजी बिडपेठ तारा उद्यान येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

स्वतंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या अनुषंगाने स्मार्ट सिटीतर्फे सक्करदरा तलावालगत उद्यान येथे १ ऑक्टोबर रोजी सकाळी योगा त्यानंतर उद्योजिका मेळावा, अग्निशमन विभागाचे बँड पथक, देशभक्ती संगीत आदी कार्यक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत. याच ठिकाणी सायंकाळी ५ वाजता पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर दयाशंकर तिवारी भूषवतील. कार्यक्रमात शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आदी प्रमुख्याने उपस्थित राहतील.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला सकाळी व्हेरॉयटी चौक येथून रॅली काढण्यात येईल. रॅलीमध्ये गांधीजींच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ग्लोकल मॉलपर्यंत ही रॅली काढण्यात येईल. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करा, तंबाखूचे सेवन करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा आदी संदेश देण्यात येतील. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमात जेसीज रॉयल, लॉयन्स क्लब आदी संघटनांचे सहकार्य असणार आहे.

सीताबर्डी येथे दुपारी लॅक्टशन cubiod – पिंक केबिन (बाळांना स्तनपान करण्यासाठी) या विशेष केंद्राचे ग्लोकल मॉल येथे लोकार्पण करण्यात येईल.सार्वजनिक ठिकाणी तान्ह्या बाळाला स्तनपानासाठी स्तनदा मातांना खूप अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे पर्यावरण विभागाच्या मुख्य व्यवस्थापक डॉ.प्रणीता उमरेडकर यांनी पत्र-परिषदेत सांगितले. महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या प्रयत्नाने व स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने पिंक केबिनची स्थापना करण्यात येत आहे. या अत्यावश्‍यक उपक्रमाची सुरवात ग्लोकल मॉलपासून होत आहे.या विषयी इतर ही कमर्शियल कॉम्प्लॅक्समध्ये जनजागृती झाल्यास याचा फायदा स्तनदा मातांना होईल,अश्‍या त्या म्हणाल्या.

याच ठिकाणी संध्याकाळी उद्योजकांसाठी चर्चासत्राचे तसेच सायबर क्राइमवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागातर्फे नागरिकांना आगीपासून सुरक्षा करण्यासंदर्भात माहिती दिली जाईल.

३ ऑक्टोबर रोजी बिडीपेठ येथे तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता होईल. येथे महिलांना आत्मसुरक्षेचे प्रशिक्षण, आयुर्वेदिक वृक्षांची माहिती, भरोसा सेलची माहिती व लहान मुलांसाठी स्पर्धा घेण्यात येईल. ‘माझा अडोस-पडोस’ स्पर्धेत भाग घेणा-या मुलांना पुरस्कार वितरीत करण्यात येतील. या स्पर्धेत ६ वर्षापर्यंत मुलांनी सहभाग नोंदवला असून त्यांना त्यांच्या पालकांचे सहकार्य या स्पर्धेत मिळाले आहे.स्पर्धेत लहान मुलांच्या आपल्या आजूबाजूच्या परिसराबाबत अनेक अनोख्या संकल्पना असून यात आजूबाजूच्या परिसरात वाय-फाय नको,शाळा जवळ हवी,पोलिस स्टेशन हवे,करोनामुक्त परिसर हवा इ.अश्‍या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या असल्याची माहिती डॉ.उमेरडकर यांनी दिली.

या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील खासदार, आमदार, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, स्मार्ट सिटीचे संचालक, झोन सभापती, विषय समिती सभापती यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूर स्मार्ट सिटीच्यावतीने स्ट्रीट फॉर पीपल, नॅचरिंग नेबरहुड, इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज, ईट राईट चॅलेंज आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजमध्ये नागपूरला एक कोटीचे पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे.

पत्रकार परिषदेमध्ये कंपनी सचिव भानुप्रिया ठाकुर, पर्यावरण विभागाच्या डॉ. प्रणिता उमरेडकर, मोबिलिटी विभागाचे राजेश दुफारे, ई-गव्हर्नंस विभागाचे डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे उपस्थित होते.

Advertisements

Latest बातम्या