Homeनागपूर न्यूजस्थानिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा‘अनुभव’ देण्याचा प्रयत्न:संदीप जोशी

स्थानिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा‘अनुभव’ देण्याचा प्रयत्न:संदीप जोशी

Advertisements

 

 

खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्यापासून शुभारंभ

खेळाडूंचा उत्साह जोमात

नागपूर,ता. १२ मे २०२२: शहरातील ४० मैदाने ही आज खेळाडूंच्या उत्साहाने अोसंडून वाहत आहेत.गेल्या दोन वर्षात करोना महामारीमुळे जिथे घराबाहेर डोकावणे ही दुरापस्त झाले होते तिथे आता पुन्हा डिसेंबरमध्ये चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा झाल्याबरोबर शहरातील सर्वच वयोगटातील खेळाडूंमध्ये आनंद आणि उत्साह,जोश आणि स्पर्धेचा जल्लोष ओसंडून वाहत आहे,ही जरी स्थानिक पातळीवर आपल्या शहरवासी खेळाडूंसाठीची १६ दिवस सलग चालणारी स्पर्धा असली तरी आम्ही सर्वच मैदानांवर,सर्वच वयोगटातील आणि सर्वच क्रीडा प्रकारातील खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीस स्पर्धांचा ’अनुभव’देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माजी महापौर व खासदार क्रीडा महाेत्सवाचे संयोजक संदीप जोशी सांगतात.

बास्केट बॉल क्रीडा प्रकाराचेच उदाहरण घ्यायचे तर फक्त या क्रीडा प्रकारातच एकूण १७० मॅचेस पार पडणार आहेत व १२०० खेळाडू यात भाग घेणार आहेत. उद्यापासून ४३ मैदानांवर हे खेळ रंगणार आहेत.खासदार क्रीडा स्पर्धेतील सर्वच खेळाडूंचा हाच आग्रह होता,सर तुम्ही काही पण करा पण आम्हाला खेळू द्या!नागपूरच्या रणरणत्या आणि भाजून काढणा-या उन्हाची आम्हाला सवय आहे.आम्ही सगळी काळजी घेऊ,स्वत:ला हायड्रेड ठेऊ,इलेक्ट्राॅल पिऊन खेळू पण आता आम्हाला खेळू द्या.

फक्त खेळाडूंमध्येच हा असा उत्साह संचारला नाही तर विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे पंच हे देखील स्पर्धांचे परिक्षण करण्यास उत्सुक आहेत.खासदार क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे,पूर्वी आम्हाला परिक्षक मिळत नव्हते आता परिक्षक स्वत:हून पुढे येतात व खेळाडूंच्या पुढील उज्जवल भविष्याचा विचार करुन या क्रीडा समिधामध्ये सहभागी होतात,आपला अनुभव,आपले कौशल्य खेळाडूंना मुक्त हस्ताने दान करतात,त्यांना अनुभवाने समृद्ध करतात.आपल्या नागपूर शहरात क्रीडांगणांतील सुविधा,गुणवत्ता ही कितीही चांगली असली तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तुलनेत ती कमीच पडते,अश्‍यावेळी खेळाडूंना त्याच दर्जाचा अनुभव देणे,सुविधा देणे,त्यांच्याकडून उत्कृष्ट आणि सर्वोत्तम खेळ करवून घेणे हे निश्‍चितच आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही.या स्पर्धा खेळविण्याच्या मागे खेळाडूंचा ‘मानसिक व शारीरिक’दर्जा सुधारणे हा मूळ हेतू आहे.

आऊटडोरसाठी तरी आपल्याकडे भरपूर मैदाने आहेत मात्र खासदार क्रीडा महोत्सवातील इनडोर खेळांच्या स्पर्धांसाठी तशी सुविधा असणारी जागा नाही,त्यामुळे या स्पर्धेत इनडोर खेळांच्या स्पर्धा या देखील आऊटडोर घेत असलो तरी प्रत्येक खेळाडूला ग्लूकोन-डी या एनर्जी ड्रिंकचं पाकीट दिल्या जात आहेत,प्रत्येक मैदानावर पाणी,वीज,प्रसाधनगृहे,तात्पुरती प्रसाधनगृहे यासोबतच ’रुग्णवाहीका’ देखील सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचे जोशी हे सांगतात.

नागपूर-विदर्भचा उन्हाळा त्यात ऐन ‘मे’महिना,अश्‍यात मैदानांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन म्हणजे निसर्गाला दिलेले एक प्रकारचे आव्हानाच आहे मात्र खेळाडूंची मन:स्थिती हीच मूळात उत्तम व खिळाडू वृत्तीची असल्याने निसर्गाच्या आव्हांना देखील ते स्पर्धात्मकरित्या सामोरे जाण्यास उत्सूक आहेत.तरी देखील आम्ही अगदी सकाळच्या वेळी व अगदी सांयकाळीच स्पर्धांचे नियोजन केले आहे.या क्रीडा स्पर्धेत २८ मे पर्यंत ३४ खेळांच्या स्पर्धा एकाच वेळी होणार असून यात ९२३७ सामने रंगणार आहेत.५६० चषक ७८३० पदक देणार असून ४० हजार खेळाडूंचा यात सहभाग असणार आहे.एकूण १६ दिवस हा क्रीडा महोत्सव साजरा होणार आहे.दोन वयोगटांमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत.

हे ही वाचा…..

धनराज पिल्ले यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन https://sattadheesh.com/?p=15544

विशेष म्हणजे या ४० हजार खेळाडूंमध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी कधीही,कोणत्याही स्पर्धेत भागच घेतला नाही.१३ वर्षपर्यंत वयोगटातील तर अनेक खेळाडू असे आहेत ज्यांची ही खासदार क्रीडा स्पर्धा,पहीली स्पर्धा असणार आहे.संपूर्ण स्पर्धेत जवळास १५ हजार असे स्पर्धक आहेत जे पहील्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहेत.बास्केट बॉलचेच उदाहरण घ्यायचे असल्यास १२०० पैकी ८०० स्पर्धक हे पहील्यांदा मैदानात उतरणार आहेत.

या मागे उद्देश्‍य म्हणजे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीयस्तरावील प्लॅटफॉर्म देणे हाच आहे.हे संयोजक व समन्वयकांसाठी देखील खूप आव्हानात्मक आहे.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, चार वर्षांपूर्वी या खासदार क्रीडा महोत्सवाला जेव्हा सुरवात झाली त्याचवेळी जरी हे आयोजन ’राजकीय’ वाटत असले तरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तराच्या ज्या स्पर्धा होतात त्याच प्रकारचा अनुभव आम्हाला आमच्या स्थानिक खेळाडूंना द्यायचा आहे,हे निर्धारित केले होते.या विविध स्पर्धांमधूनच एक दिवस नागपूर शहराचं नावलौकिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे अनेक खेळाडू तयार होणार आहेत,याची आम्हाला जाणीव आणि दृढ विश्‍वास आहे.

प्रत्येक सामन्यानंतर प्रत्येक खेळातील खेळाडूंना प्रसाधन गृहांची सोय,पाणी,एनर्जी ड्रिंक दिले जाणार असून या स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला एक टी-शर्ट मिळणार आहे.विविध शाळांमधील विद्यार्थी खेळाडू हे क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असतात त्यावेळी त्यांना कीट दिली जाते ती अनेक ठिकाणी परतही घेतली जात असते मात्र खासदार क्रीडा महोत्सवातील सर्व ४० हजार खेळाडूंना या टी-शर्ट भेटस्वरुप दिली जाणार आहेत.

या स्पर्धेच्या पूर्व तयारीबाबत सांगावयाचे झाल्यास त्या त्या खेळांच्या संघटनांकडे आम्ही त्या-त्या खेळाशी संबंधित व्हिीडीयो फॉरवर्ड करीत असतो,ते प्रशिक्षकांकडे फॉरवर्ड करतात,प्रशिक्षक ते पालकांकडे व खेळाडूंकडे पाठवतात त्यामुळे पूर्वीच्या स्पर्धांमधूनही नवे खेळाडू खूप काही शिकत असतात.

विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सवात या वेळी ९३ लाख रुपयांची रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे.बास्केट बॉलचेच उदाहरण दिल्यास यात ४ लाख २८ हजार रुपयांचे राेख पारितोेषिक आहे.या स्पर्धेतील विजेत्यालाच ४१ हजार रुपये रोख मिळणार आहेत.फूटबॉलमध्ये १ लाख ८२ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आहेत.

ही सर्व रक्कम सरळ खेळाडूंनाच धनादेशाच्या स्वरुपात मिळत असते.खासदार क्रीडा महोत्सवात आम्ही कोणत्याही संघटनेकडे रोख रकमेचे धनादेश सोपवत नसतो.संपूर्ण आर्थिक व्यवहार हा ’पारदर्शी’स्वरुपात पार पडत असतो.अगदी मैदानांवर पाणी शिंपडणा-यांचे भुगतान देखील जीएसटी बिल बघूनच दिले जाते. त्यामुळे स्पर्धा किवा महोत्सव म्हटले की शारीरिक,मानसिक,भावनिक आणि आर्थिक बाजू या भक्कमपणे पेलवणे गरजेचेच असते,या सर्व बाबी उद्यापासून सुरु होणा-या चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाची देखील वैशिष्ठ ठरणार असल्याचे माजी महापौर व खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी सांगतात.

Latest बातम्या