
नागपूर,ता. २१ सप्टेंबर २०२१: उत्तम अभिनेते, समाज सेवक व आम आदमी पार्टीच्या शिक्षण क्रांतीचे प्रचारक सोनु सुद यांना केंद्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात आम आदमी पार्टी युवा आघाडी तर्फे सोनु सुद यांच्या समर्थनात आज आंदोलन करण्यात आले.
सोनू सूद यांचा केंद्र सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या छळा विरोधात हे आंदोलन करण्यात आले. करोना महामारीच्या लॉकडाऊन काळात सोनु सूद यांनी समोर येऊन संपूर्ण देशवासियांना मोठी मदत केली, हजारो नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या, भोजन व्यवस्था केली या प्रकारे अनेक देशहीत कार्य केले. हे सर्व देशवासियांनी पाहिले. करोना महामारीच्या काळात सोनु सुद हे एक देवदुत मसीहा म्हणून समोर आले.
सोनु सुद यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातर्फे सुरू असलेल्या शिक्षण क्रांतीची दखल घेत दिल्ली मधील होणाऱ्या सरकारी शिक्षण मॉडेलचा प्रचार प्रसार करून दिल्ली शिक्षण मॉडेल संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या सोबत कार्य सुरू केले . त्याकरिता आम आदमी पार्टीतर्फे सोनु सुद यांना दिल्ली शिक्षण मॉडेल संपूर्ण भारतात पोहोचवण्यासाठी ‘देश का मेंटर’ या अभियानाचे प्रमुख करण्यात आले.
परंतू हे देश हिताचे कार्य गरीब जनतेपर्यत पोहोचू नये या द्वेषभावनेने मोदी सरकारने सोनु सुद यांना त्रास देणे सुरू केले व त्यांच्या घरी, ऑफिसमध्ये कोणतेही कारण नसतांना आयकर विभागामार्फत छापा टाकून त्रास देण्याचे काम सुरू केले.
मोदी सरकारच्या या हुकुमशाहीला प्रतिउत्तर देण्यासाठी व सोनु सूद यांना प्रचंड जन समर्थन देण्यासाठी आज आम आदमी पार्टी युवा आघाडी विदर्भ संयोजक श्री पियुष आकरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या संख्येत नागपूर मधील युवा वर्ग सहभागी होऊन सोनु सुद यांना आपले प्रचंड जन समर्थन देत आहेत.
हे आंदोलन राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग नागपूर संयोजिका कविता सिंगल विदर्भ सोशल मीडिया प्रमुख गीता कोईकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विदर्भ युवा आघाडी संयोजक पीयुष आकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. प्रामुख्याने राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, युवा पूर्व विधर्भ संघटन मंत्री सौरभ दुभे, नागपुर युवा अध्यक्ष गिरीश तितरमारे, सचिव प्रतिक बावनकर, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, स्वप्निल सोमकुवर, हेमंत पांडे, पंकज मेश्राम, प्रियंका तांबे उपस्थित होते.
या वेळी सहभागी आप युवा आघाडी कार्यकर्ते पार्थ मिरे, ओम आरेकर, आकाश गजभिये, वीशाखा दुपारे, शुभम मोरे, योगेश पराते, प्रणाली सहारे,नरेश महाजन,स्वप्नील शेंडे, प्रभाकर मोटघरे, मनीष सोमकुवर, निशीकांत माटे, गनेश राऊत, आकाश कावळे, राहुल कावळे, जॉय बांगडकर, हनोक मार्टिन, विश्वजीत मसराम, संजय सिंघ, आकाश वैद्य, राहुल मोरे, अंकित तिडके, बबलु मोहाडीकर, आकाश वेघ, प्रभात अंग्रवाल, राजेन्द्र शेलकर, अनिकेत नारद, आकाश कांबळे, कुणाल मंचलवार, नरेश महाजन, प्रदीप पौनिकर, क्लेमेंट डेबिट, गिरीश आखरे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा