Homeनागपूर न्यूज‘सूर’ बंद पण ‘पोट’कसं बंद करायचं?नागपूरकर कलावंतांचा प्रश्‍न

‘सूर’ बंद पण ‘पोट’कसं बंद करायचं?नागपूरकर कलावंतांचा प्रश्‍न

महापौर व मनपा आयुक्तांना कलावंतांचे निवेदन

ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीने घेतला पुढाकार

नागपूर,ता. २५ फेब्रुवरी: मार्च २०२०पासून तब्बल दहा महिने कोविड संक्रमण कालावधीमध्ये शासनाने घातलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदीचा नागपूरकर कलावंतांना जोरदार फटका बसला होता, शहरात संगीत क्षेत्रात मंच सादरीकरण करून आपला उदरनिर्वाह करणारे जवळपास ६०० ऑर्केस्ट्रा, सुगम संगीत, क्षेत्रातील कलावंतांना या भीषण संकटाचा सामना करावा लागला. शासन दरबारी अनेकदा विनंती करून देखील या कलावंतांना काहीच मदत झाली नव्हती,त्यातून हा हलवा मनस्वी व स्वाभिमानी कलावंत सावरत असतानाच पुन्हा माय बाप सरकारने सरसकट ७ मार्चपर्यंत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील असा फरमान काढला,आता कुठे पोटापाण्याची गाडी रुळावर येत असताना सरसकट कार्यक्रमच रद्द केल्याने ‘सूर’तर मायबाप सरकारने बंद केले पण पाेटातली ‘भूक’ही कशी बंद करणार?असा संतप्त सवाल नागपूरातील कलावंत जग विचारत आहे.

अश्‍या संकटाच्या काळात नागपूर शहरातील सात सुप्रसिध्द गायक, वादक कलावंत कोविड संक्रमण झाल्याने आरोग्य व्यवस्थे अभावी व आर्थिक कारणाने दगावली, आपल्यातील सहकारी कलावंतांना हे जग सोडून जातांना पाहून अनेक कलावंत आजही मानसिक धक्क्यातून सावरले नाहीत. दहा महिन्यांनंतर कसेबसे थोडेफार कार्यक्रम प्रारंभ झाले होते,

अशातच पुन्हा शासकीय आदेशानुसार कोविड संकट लक्षात घेऊन कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे,आता पुन्हा कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा ज्वलंत प्रश्र्न कलावंत व बॅक स्टेज कलावंत यांच्यासोबतच सभागृह चालवणारे यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

कलावंतांची ही गंभीर परिस्थिती लक्ष्ात घेऊन शहरातील ‘ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी’ नागपूरच्या पदाधिका-यांनी तातडीची बैठक घेऊन कलावंतांच्यावतीने महापौर दयाशंकर तिवारी तसेच महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदन सादर केले.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्ाच्या साहित्य कला व सांस्कृतिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रभू आंभोरे यांच्यमार्फत राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना सुध्दा निवेदन देण्यात आले. त्यानुसार प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर सविस्तर विषय घालून नागपुरातील स्थानिक कलाकारांना न्याय मिळेल व शासनाचे सर्व अटी नियम पाळून कार्यक्रम सादर करण्यासाठी कशी व्यवस्थित परवानगी देण्यात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन संघटनेला दिले.

कलावंतांसाठी कार्यक्रम खुले करण्यासाठी विनंती करण्यात आली असून शासनाने दिलेल्या करोनासंदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करून आम्ही कार्यक्रम करू,व प्रशासनाला यासाठी पुरेपूर सहकार्य करण्याची ग्वाही संस्थेचे अध्यक्ष पी.कुमार यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात शहरातील गणमान्य कलावंत विजय किर्तने,प्रणय कुथे,लकी खान तसेच संस्थेचे पदाधिकारी,प्रशांत खडसे,संदीप मेश्राम, शेखर शामकुवर,राजू गजभिये,संगीता गावंडे,रिनेश जाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Latest बातम्या