Homeनागपूर न्यूजसव्वाशे कोटी जनतेला एकसंध ठेवणा-या संविधान निर्मात्याला वाहतो आदरांजली

सव्वाशे कोटी जनतेला एकसंध ठेवणा-या संविधान निर्मात्याला वाहतो आदरांजली

Advertisements
Advertisements


ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संविधान चौकात केले महामानवाला महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

नागपूर,ता.६ डिसेंबर २०२२:  आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांनी संविधान चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या संवेदना व आदरांजली अर्पित केली.ज्या महामानवाने या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधूतत्व ही चर्तुसुत्री देतानाच देशाच्या एकता आणि अखंडतेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही,अश्‍या पद्धतीचं व्यक्तिगत स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून परिभाषित केलं तसेच ज्या संविधानामुळेच देशातील सव्वाशे कोटी लोकं आज एकसंध राहून जगाच्या परिपेक्षामध्ये ज्या गतीने वाटचाल करीत आहे,असे संविधान देणा-या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचे प्रदेश सचिव भाजपाचे ॲड.धर्मपाल मेश्राम म्हणाले.

याप्रसंगी भाजप शहर संघटनमंत्री सुनील मित्रा, अनु जाती मोर्चा प्रदेश सचिव सतीश शिरसवान, शहर सचिव ॲड. राहूल झांबरे, अनु जाती मोर्चा सहपालक बंडू शिरसाट, भाजपा ॲाटोरिक्षा आघाडी चे शहर संयोजक जीवन तायवाडे, शंकरराव मेश्राम, इंद्रजीत वासनिक, रोशन बारमासे, संजय जानवे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest बातम्या