Homeनागपूर न्यूजसभागृहात दिलेल्या निर्देशांचे पालन अद्याप नाही, तीन दिवसात अहवाल सादर करा:महापौरांचे आयुक्तांना...

सभागृहात दिलेल्या निर्देशांचे पालन अद्याप नाही, तीन दिवसात अहवाल सादर करा:महापौरांचे आयुक्तांना पत्र

नागपूर,१५ जुलै : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार १९ दिवसानंतरही प्रशासनाकडून लेखी स्वरुपात उत्तरे मिळाली नाही.ही अत्यंत दूर्देवाची बाब असून सभागृहाचा अवमान असल्याचा आरोप करीत याबाबत येत्या ३ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकराम मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात दिले आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा २० ते २६ जून दरम्यान घेण्यात आली. या सभेत पीठासीन अध्यक्ष् महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला विविध निर्देश दिले होते. ६ जुलै पर्यंत निर्देशावरील कारवाईचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे सांगितले होते. परंतु १९ दिवसांनंतरही अहवाल प्रशासनाकडून देण्यात आलेला नाही.त्यामुळे येत्या ३ दिवसात महापौरांनी हा अहवाल मागवला आहे.

सभेत महापौरांनी काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याकरीता राज्य शासनाला प्रस्ताव सादर करणे,के.टी.नगर दवाखाना व इतर ५ दवाखान्यांबाबत स्थायी समिती अध्यक्ष्ांच्या अध्यक्ष् तेखाली समिती स्थापन करुन चौकशी अहवाल सादर करावा,चेंबर दुरुस्ती व त्यावर झालेल्या गेल्या ५ वर्षातील खर्चाबाबत अहवाल देण्यात यावा,यासाठी मुख्य अभियंत्यांची एक सदस्यीय समिती स्थापन करुन १५ दिवसात निर्णय द्यावा. प्रमोद हिवसे जो काही दिवसांपूर्वी वाहन चालक होता,त्याची बढती कशी झाली?यावरील आक्ष्ेपांबाबत चौकशी करावी,जाफरी हॉस्पीटल संदर्भात डॉ.सवाई,एमएचओ यांनी चौकशी करुन ७ दिवसात अहवाल सादर करणे,एलईडी पथदिव्यांची नस्ती १३५ दिवस लेखा व वित्त विभागात अधिका-यांनी स्वत:जवळ ठेवल्याने त्यांच्या मूळ विभागाला डिसीप्लीन कारवाई करण्याची शिफारस करणे, डॉ.प्रवीण गंटावार व डॉ.शीलू गंटावार यांचे तात्काळ निलंबन करुन स्थायी समिती अध्यक्ष् यांच्या समितीने त्याची चौकशी करणे,शहरातील कामाच्या संविदाबाबत माहिती स्थायी समितीपासून लपवून ठेवणे,या सर्व बाबी गंभीर स्वरुपाच्या असल्यामुळे याबाबत आयुक्तांनी ६ जुलै पर्यंत आपले स्पष्टीकरण सादर करावे.

नियमानुसार स्थायी समितीच्या अनुमतीने राज्य शासनाकडून आयुक्त,अति.आयुक्तांनी सुट्यांची मंजुरी घेणे अपेक्ष्ति असताना रजेबाबत स्थायी समितीची अनुमती घेतली नाही.याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण सादर करावे,असे निर्देश दिले होते.
परंतु,प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे महापौरांनी आयुक्तांना ३ दिवसात अहवाल मागितला आहे.

Latest बातम्या