Homeनागपूर न्यूजसंसर्गाचे प्रमाण कमी मात्र ४० टक्के मुलांना ॲलर्जीचा त्रास:डॉ.राजकुमार किरतकर

संसर्गाचे प्रमाण कमी मात्र ४० टक्के मुलांना ॲलर्जीचा त्रास:डॉ.राजकुमार किरतकर

शुक्रवारपासून नागपुरात ‘नॅपकॉन’ परिषद

अद्यावत ज्ञान व अनुभवाची होणार देवाण-घेवाण

नागपूर, ता. २ नोव्हेंबर २०२२  नवे शोध व प्रगत तंत्रज्ञानामुळे वयोमर्यादा वाढत आहे. मात्र अलीकडे वाढणाऱ्या प्रदुषणामुळे लहानपण ॲलर्जीसारख्या आजारांच्या विळख्यात अडकत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागपूर शहरात सुमारे ४० टक्के मुले ॲलर्जीचा त्रास सहन करीत असल्याची माहिती प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजकुमार किरतकर यांनी दिली. ॲकादमी ऑफ पेडियाट्रिक्स या बालरोग संघटनेच्या नागपूर शाखेतर्फे उपराजधानीत १८ वी ‘नॅपकॉन-२०२२’ परिषद ४ ते ६ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. किरतकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या प्रसंगी बोलताना डॉ.किरतकर म्हणाले की हल्ली लहान मुलांना मातीत खेळू दिले जात नाही त्यामुळे त्यांच्यात संसर्गजन्य रोगाचे प्रमाण तर कमी झाले मात्र वाढत्या प्रदुषणामुळे अलर्जी सदृष्य रोगांना ४० टक्के मुले बळी पडत आहेत.नुकतेच साजरी करण्यात आलेल्या दिवाळी सणात फटाक्यांमुळे झालेल्या वायू प्रदुषणामुळे देखील लहान मुलांमध्ये अलर्जीचा त्रास वाढल्याचे दिसून पडले.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या परिषदेत ‘मुलांमधील प्लमोनरी फंक्शन टेस्ट’या विषयावर किंग्स वे हॉस्पिटलमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ६ नोव्हेंबरला विविध विषयांवर चर्चासत्र होतील.पाचशेपेक्षा अधिक बालरोगत्ज्ञ परिषदेत सहभागी होतील.यात बहूतांश नागपूरातील डॉक्टर वर्ग असणार असल्याचे डॉ.किरतकर यांनी सांगितले.याशिवाय पुणे व दिल्लीच्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांची देखील उपस्थिती राहणार आहे.

डॉ. रावत यांना जीवनगौरव पुरस्कार
नॅपकॉन परिषदेचा उदघाटन सोहळा शनिवारी (ता.५) सायंकाळी साडे सात वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉंईट येथे पार पडणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आरोग्य उपसंचालक डॉ. विनिता जैन-भुसारी प्रमुख पाहूणे असतील. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. एम.एस. रावत यांना संस्थेतर्फे जीवनगौरव तर डॉ. डी.एस. राऊत यांना ॲकॅडमिक एक्सलेन्स पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यावेळी प्रतिष्ठित डॉ.डी.जी गाण वकृत्व डॉ.प्रदीप सुर्यवंशी प्रोफेसर आणि प्रमुख,नवजातशास्त्र विभाग,बीव्हीयू मेडिकल कॉलेज,पुणे यांच्या हस्ते होईल.डॉ.प्रदीप सुर्यवंशी हे ‘भारतीय निओनेटल हेमोडयनॅमिक्स आणि पोकस-संशोधन,प्रशिक्षण‘या विषयावर बोलतील.

शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी परिषदेपूर्वी पार पडणा-या विशेष कार्यशाळेत ‘मुलांमधील प्लमोनरी फंक्शन टेस्ट’या विषयावर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन होईल.दुसरी कार्यशाळा ही ‘सेव्ह’(आपात्कालीन स्थितीत वायुवीजनासाठी पद्धतशीर दृृष्टिकोन)या मुद्दावर पार पडणार आहे.

डॉ. अभिजित चौधरी, डॉ. अभिषेक मथुरा, डॉ. आकाश बंग, डॉ.अमोल फाळके,डॉ.आनंद भुतडा,डॉ.अनुपम बाहे,डॉ.अपर्णा(हैदराबाद)डॉ.आशिष लोढे,डॉ.आतिश बकाने,डॉ.बी.पी.खाेब्रागडे,डॉ.भुपेंद्र भोड(अमरावती)डॉ.दिपक गाेयल,डॉ.दिप्ती नारंग सुरी(पी.जी.आय.चंदिगड)डॉ.गिरीश सुब्रमण्यम,डॉ.हरी मंगतानी,डॉ.उमाषू धुआ,डॉ.जयंत उपाध्ये,डॉ.जयंत वाघ,डॉ.जितेंद्र हजारे,डॉ.कुलदिप सुखदेव,डॉ.मनीष चोखंदरे,डॉ.मनोहर तुले,डॉ.निनाद पाठक, डॉ.निशांत बानाईत,डॉ.नितीन चावला(हैदराबाद)डॉ.पराग डेकाटे(हैदराबाद)डॉ.प्रदीप सुर्यवंशी(पुणे)डॉ.प्रणीत लाले,डॉ.प्रियंका वानकर,डॉ.राजेश बूब(अमरवती)डॉ.राजू मोहता,डॉ.साची रस्तोगी,डॉ.सचिन कुथे,डॉ.सचिन पाटील(यवतमाळ)डॉ.समीत उमाटे,डॉ.संदीप गोल्हर,डॉ.संदीप हटवार,डॉ.संदीप यादव,डॉ.संजय मराठे,डॉ.सतिश देवपुजारी,डॉ.शिल्पा हजारे,डॉ.सुधीर महाजन,डॉ.स्वप्नील भिसीकर,डॉ.उमेश शर्मा(गोंदिया)डॉ.वसंत खळतकर,डॉ.विनीत त्यागी(नोएडा)डॉ.विनीत वानखेडे,डॉ.विराज शिंगाडे,डॉ.जबीहा खान(यवतमाळ) असे पन्नासपेक्षा अधिक डॉक्टर आपले विचार व्यक्त करतील.

परिषदेतील पॅनलवरती चर्चा-
-जन्मजात हायड्रोनेफ्रोसिस: A ते Z
-मुलांमध्ये मधुमेह मेस्लिसचे व्यवस्थापन
-श्‍वाशोश्‍वासाचा त्रास आयुष्याच्या ७२ तासांनंतरही कायम राहतो
-स्वारस्यपूर्ण श्‍वसन प्रकरणांसाठी विश्‍लेषणात्मक दृष्टिकोण
-गंभीर परिणामांसह बालरोग ह्दयविकाराची प्रकरणे
– बालरोग अतिदक्षता विभागामध्ये निर्णय घेणे
-बालपण एपिलेप्सीचे केस आधारित व्यवस्थापन

विषय-
-परिणाम सुधारणे.ज्ञान पुरेसे आहे का?
-ऍलर्जी असलेल्या मुलांकडे दृष्टिकाणे:केस आधारित
-चुका केल्याबद्दल मला पश्‍चाताप होईल
-तापामध्ये संसर्गाच्या पलीकडे पाहणे:स्वयं जळजळ
-मुलांमधील सांधेदुखीचे व्यवस्थापन:केस आधारित
-IEM निदान करने सोपे झाले आहे
-भारतीय नजवात हेमोडायनॅमिक्स आणि POCUS-संशोधन,प्रशिक्षण
-बालरोग ट्रॉमा-प्रत्येक जीवन वाचवा(आघात व्यवस्थापनासाठी बालरोगतज्ञ मार्गदर्शक)
-मुलांमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचे व्यवस्थापन
-चालणे आणि शस्त्रक्रियेचे चमत्कार
-एनआयसीयूमध्ये संसर्ग रोखणे:सर्वोत्तम क्लिनिकल पद्धती
-‘माझे मूल बोलत नाही’-एका पत्रकाराचा दृष्टिकोण
-विलंबित तारुण्य व्यवस्थापन:केस आधारित दृष्टिकोन
-मतभेद हाताळेण
-डिलिव्हरी रुम केअर टर्म आणि मुदतपूर्व बाळांची बदलती परिस्थिती
-मुलांमध्ये मूड स्विंग्स आणि मूड डिसऑर्डर:केस आधारित
-नवजात POCअल्ट्रासाऊंडच्या मूलभूत संकल्पना
-बायोमेडिकल संशोधनाची मूलतत्वे
-प्राथमिक लसीकरणामध्ये हेक्साव्हॅलॅट लसींची भूमिका
-पाच वर्षांच्या वयात IPV ची गरज:वैज्ञानिक पुरावा
-लसीकरणातील प्रश्‍नमुलांमध्ये एलोजेनिक बीएमटी

परिषदेचे संरक्षक डॉ.उदय बोधनकर, संघटनेचे अध्यक्ष तसेच नॅपकॉन परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजकुमार किरतकर व सचिव डॉ.प्रितेश खटवार यांनी परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले असून, मिडीया समन्वयक डॉ.सुचित बागडे,डॉ.विंकी रघूवानी व सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अविनाश गावंडे यांनी परिषदेच्या आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन केले.पत्रकार परिषदेला डॉ. उदय बोधनकर, डॉ. सुचित बागडे, डॉ.संजय देशमुख, डॉ.प्रीतेश खतवार आदी उपस्थित होते.

Latest बातम्या