Homeनागपूर न्यूजशासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत मास्क विक्री केल्यास करणार कारवाई !

शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत मास्क विक्री केल्यास करणार कारवाई !

अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी नागपूरमध्ये केली मेडीकल दुकानांची पाहणी

नागपूर, दि.६; राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आज नागपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. नागपूर येथे आज त्यांनी मेडिकल दुकानांची तपासणी केली .दुकानांमध्ये शासनाने निर्धारित केल्या गेलेल्या किंमतीनुसार मास्कची विक्री होत आहे किंवा कसे याची खातरजमा केली.या वेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गाडेकर ,सहायक आयुक्त बल्लाळ, निरीक्षक लोहकरे उपस्थित होते.

दुकानांसमोर शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे मास्कच्या किमतीचे बोर्ड लावण्याचे त्यांनी निर्देश दिले. काही दुकानांनी यांच्या दुकानासमोर इंग्रजी भाषेमध्ये मास्कच्या किमतीचे बोर्ड लावले होते .तीन-चार दुकानांनी बोर्ड लावले नव्हते. यावेळी मराठीमध्ये मास्कच्या किमतीचे बोर्ड सर्व दुकानांसमोर लावण्याचे निर्देश दिले.

मेडिकलची जी दुकाने उपरोक्त निर्देशाचेच पालन करणार नाहीत, तसेच जी दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने मास्कची विक्री करताना आढळून येतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश डाॅ. शिंगणे यांनी दिले आहेत.

Latest बातम्या