Homeनागपूर न्यूजशाळा आणि आरोग्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवू:प्रशांत पवार

शाळा आणि आरोग्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवू:प्रशांत पवार

दक्षिण-पश्‍चिमध्ये भव्य रॅलीने केली प्रचार सांगता

नागपूर: शनिवारी प्रचाराचा अंतिम दिवस असल्याकारणाने निवडणूकीत दंड थोपटणाऱ्या सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात अंतिम दिनी प्रचार रॅलीच्या माध्यमातून जनसंपर्कावर भर दिला.दक्षिण-पश्‍चिमचे अपक्ष् उमेदवार तसेच ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांची रॅली दूपारी १२ वा. काछीपूरा येथील त्यांच्या कार्यालयातून सुरु झाली. यावेळी वाहनांचा ताफा तसेच हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. ‘प्रशांत भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है‘च्या नारा देऊनच रॅलीला सुरवात झाली.

प्रशांत पवार यांच्या या रॅलीने छत्रपती चौक,रहाटे कॉलनी,घाट रोड,रामेश्‍वरी,त्रिशरण चौक,ओंकार नगर,नरेंद्र नगर,चिचभवन,सोमलवाडा,वर्धा रोड,भेंडे-ले-आऊट,उज्वल नगर इत्यादी मार्गावरुन मार्गक्रमण केले. त्रिशरण चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. या मार्गावरील उजव्या-डाव्या भागातील गल्ली बोळ्यात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. निवडणूकीत उभे राहण्याबाबत आपली भूमिका मतदारांना सांगितली. सामान्य असो किंवा गरीब नागरिक,शिक्ष् ण आणि आरोग्य हे दोन प्रश्‍न कायम त्यांच्यासमोर गहन असतात. शाळेतील फी ही भरमसाठ वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना आता आपली पाल्ये कॉनव्हेंटमध्ये शिकवणे अशक्यप्राय झाले आहे. सरकारी शाळांची दुरावस्था अतिशय चिंताजनक आहे. गरीबांनी अापल्या पाल्यांना शेवटी शिकवावे तरी कुठे? याशिवाय आरोग्याचा विचार केला तर खाजगी डॉक्टरांची महागडी फी सामान्य माणूस देऊ शकत नसल्याने सरकारी रुग्णालयांच्या सामान्य माणूस आसरा घेतो मात्र तेथेही सामान्य माणसांची पराकोटीची हेलसांड होते. बेरोजगारीचा प्रश्‍न ही गहन आहे. तरुणाईच्या हाताला रोजगाराच नाही. हे तीन प्रश्‍न घेऊन प्रशांत पवार हे जनतेत गेले व आपली भूमिका मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच दक्षिण-पश्‍चिम मतदार संघातून त्यांची लढत मुख्यमंत्री यांच्याशी आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख हे देखील प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभे ठाकले आहेत. नागपूर शहरातील सहा ही विधान सभा मतदार संघातून सर्वाधिक २० उमेदवार हे दक्षिण-पश्‍चिमधून लढत आहे हे विशेष. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे. प्रशांत पवार यांचे स्वत:चे कार्यकर्त्यांचे एक नेटवर्क आहे जे त्यांच्या प्रचारात जोमाने कामाला लागले आहेत. लढवय्या वृत्तीमुळे ते कायम चर्चेत असतात. मेट्रोमधील भ्रष्टाचार तसेच जामठा स्टेडियममधील भ्रष्टाचार त्यांनी कसोशिने तसेच सातत्याने माध्यमात उघडकीस आणला. त्यामुळे नागपूरकर जनतेत त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. २४ ता.ला अपक्ष् उमेदवार म्हणून त्यांनी भाजप तसेच काँग्रेसची किती मते खेचली हे उघड होईल मात्र प्रशांत पवार यांना त्यांच्या विजयाची पूर्ण खात्री आहे.

Latest बातम्या