Homeनागपूर न्यूजशहराध्यक्ष नाना पटोले यांचे जंगी स्वागत

शहराध्यक्ष नाना पटोले यांचे जंगी स्वागत


बॅण्ड,ढोल ताश्‍यांचा गजराने दूमदूमले विमानतळ

दीक्ष्ाभूमी,टेकडी गणपती व बाबा ताजुद्दीनेचे घेतले दर्शन

नागपूर,ता. १० फेब्रुवारी: काँगेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांचे आज बुधवारी सकाळी १० वा. प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्तीनंतर प्रथमच आगमन झाल्याने काँग्रेस पक्ष्ातर्फे त्यांचे जंगी स्वागत विमानतळावर करण्यात आले.ढोल ताश्‍यांचा गजराने अवधे विमानतळ दुमदुमले.सर्वत्र काँग्रेसच्या पताका फहरत होत्या.

नाना पटोले यांनी नागपूरच्या भूमीवर पाय ठेवताच आधी दीक्ष्ाभूमीला जाऊन वंदन केले.यानंतर ते टेकडी गणपतीच्या दर्शनाला गेले.मोठा ताजबाग येथील बाबा ताजुद्दीन यांच्या दरगाहवरही ते नतमस्तक झाले.

त्यांच्या स्वागतासाठी शहर काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती.

एक वर्ष विधान सभा अध्यक्ष् हे संवैधानिक पद सांभाळ्यानंतर आता पक्ष्ाच्या प्रदेशाध्यक्ष् पदावर नियुक्त झालो.हे यश मला मिळाले यात अनेकांचा सहयोग आहे.आता नवीन जवाबदारी समोर आली.आमच्या नेत्या सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी संघटनात्मक प्रमुख म्हणून मोठी जवाबारी सोपवली असल्याचे ते म्हणाले.

ही जवाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्या कर्मभूमीतील दीक्ष्ाभूमी,टेकडी गणपती तसेच बाबा ताजुद्दीन यांचे आधी दर्शन घेतले.महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष् संघटनात्मकदृष्टया पहील्या क्रमांकावर आणील असे आर्शिवाद घेऊन आलो असल्याचे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले.

Latest बातम्या