Homeनागपूर न्यूजशहरातील सर्व अनाधिकृत बांधकामांची माहिती द्या:आ.विकास ठाकरे यांचे मनपा आयुक्तांना पत्र

शहरातील सर्व अनाधिकृत बांधकामांची माहिती द्या:आ.विकास ठाकरे यांचे मनपा आयुक्तांना पत्र

Advertisements
Advertisements

नकाशाव्यतिरिक्त शहरात किती अनाधिकृत बांधकामे?

नागपूर,ता. ३० सप्टेंबर: नागपूर शहरात एकूण किती शासकीय व खासगी इमारतीत अनाधिकृत बांधकाम आहेत तसेच शहरातील किती वस्त्या,मॉल्स,पार्किंगच्या जागा मनपाद्वारे मंजूर नकाश्‍याप्रमाणे आहेत तसेच मंजूर नकाश्‍या व्यतिरिक्त अनाधिृकत बांधकामे किती?याविषयी विस्तृत माहिती तातडीने लिखित स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी पश्‍चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना आज पत्राद्वारे केली .

नागपूर शहरात अनाधिकृत बांधकामांची संख्या ही लक्ष् णीय असल्याचे आढळते. यात शासकीय तसेच खासगी जमिनींवरील बांधकामांचा देखील समावेश असून शहरातील अनेक शासकीय तसेच खासगी जमिनीवरील अनाधिकृत बांधकाम नेमके कोणकोणते आहेत?विशेष म्हणजे अनाधिकृत बांधकाम म्हणजे नेमके काय?या विषयी शहराचा काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने मला विस्तृत माहीती जाणून घ्यायची आहे,असे त्यांनी पत्रात नमूद केले.

शहात किती अनाधिकृत बांधकामांचे नकाशे हे मंजूर नाहीत? किंवा नागपूर महानगरपालिकेने मंजूर केलेल्या नकाश्‍ााव्यतिरिक्त जास्त बांधकाम केले गेले,अशी किती शासकीय व खासगी अनाधिकृत बांधकामे शहरात आहेत? शहरात बहूतांश भागातील बांधकामांना अधिकृत परवानगी नसल्याचे आढळून आले आहे,विशेष करुन जुन्या वस्त्यांमधील बांधकामांना मंजुरी प्राप्त नाही.अश्‍या संपूर्ण बांधकामांची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेच्या किती इमारतीमध्ये,झोन कार्यालयात,शाळेत अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे? मनपाच्या मालकीच्या जागेंवर दुस-यांचा कब्जा करुन अनाधिकृत बांधकाम केले आहे. विशेष करुन जुन्या वस्त्यांमधील बांधकामांना मंजुरी प्राप्त नाही. अश्‍या संपूर्ण बांधकामांची माहिती देण्याची विनंती त्यांनी केली.सत्र न्यायालयातील ८ व्या मजल्यावरील करण्यात आलेले बांधकाम हे देखील अनाधिकृत बांधकाम नाही का?तसेच शहरातील किती पोलीस स्टेशनच्या इमारतींचे बांधकाम नकाशा मंजूर आहेत?किती पोलीस स्टेशनमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम केले आहे?अश्‍या अनेक प्रश्‍नांची सरबत्ती आ.विकास ठाकरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या शेकडाे एकर जागेवर महानगरपालिकेची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम करण्यात आले आहे.याशिवाय शहरातील मोठमोठे मॉल्स यांनी देखील मंजूर नकाशाशिवाय अनाधिकृत बांधकाम केलेले आढळते. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये तर गडर लाईनवरच बांधकाम करुन घरे बांधण्यात आली.याशिवाय शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत पार्कींगही आढळते. याचा अर्थ नागपूर शहरात जवळपास ६० टक्के बांधकाम हे अनाधिकृत श्रेणीत येत आहे,विशेष म्हणजे या संपूर्ण अनाधिकृत बांधकामाच्या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन्स टाकण्यात आल्या. स्ट्रीट लाईट्स, वीजेची व्यवस्था करण्यात आली.रस्ते बांधून देण्यात आले.कालच्याच घटनेत मानकापूर जवळील बगदादीनगर येथे २८० प्लाॅट्सपैकी १८६ भूखंडावर अनाधिकृत बांधकाम झाल्याचे निर्दशनास आले.हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व मनपाला येत्या दोन दिवसात यावर न्यायालयात उत्तर सादर करायचे असल्याने या वस्तीवर काल जेसीबी चालवण्यात आली.शहरातील अश्‍या किती अनाधिकृत बांधकाम असणा-या वस्त्यांमध्ये मनपाने रस्ते,वीज,पाणी,स्ट्रीट लाईट्स इ.सोयी-सुविधा पुरवल्या व यावर मनपाचा एकूण खर्च किती झाला?याची देखील माहिती लवकरात लवकर देण्याची मागणी आ.ठाकरे यांनी पत्राद्वारे केली.

या शिवाय नागपूर शहरात अनेक भागात अनाधिकृत मंगल कार्यालये तसेच लॉन्स सुरु आहेत,असे किती मंगल कार्यालये व लॉन्स सध्या शहरात आहेत,जे अनाधिकृत आहेत?याची देखील सविस्तर माहिती लिखितमध्ये देण्याची तसदी घ्यावी.ही संपूर्ण माहिती कृपया तातडीने देण्यात यावी,अशी नम्र विनंती आ.विकास ठाकरे यांनी आपल्या विस्तृत पत्राद्वारे केली.

Latest बातम्या