
पर्यटकांसाठी गोरेवाडा प्राणीउद्यान सज्ज
नागपूर,ता. २४ जानेवारी: बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीउद्यानात २६ जानेवारी गणतंत्र दिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘इंडियन सफारी’या उपक्रमाचे उद् घाटन होणार असून वैदर्भिय पर्यटकांच्या जगंल सफारीसाठी हे प्राणीउद्यान सज्ज झाले आहे.गोरेवाडा प्राणिउद्यानात वनविभागातर्फे आज रविवार दि. २४ जानेवारी २०२१ रोजी पत्रकारांसाठी विशेष सफारीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आयोजित पत्र परिषदेत या उपक्रमांची माहिती भा.व.से.व्यवस्थापकीय संचालक व महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादीतचे एन.वासुदेवन यांनी दिली.याप्रसंगी भा.व.से चे प्रधान मुख्य वनसंरक्ष् क(वनबल प्रमुख) डॉ.एन.रामबाबु व इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,गोरेवाडा प्राणि संग्रहालय हे भारतातील मोठ्या प्राणी संग्रहलयापैकी एक असून सुमारे ५६४ हेक्टरपेक्ष्ा अधिक जागेवर उभारण्यात आले आहे. तसेच‘ गोरेवाडा बचाव केंद्र’ व ‘गोरेवाडा रिझर्व्ह’ असे एकत्रितपणे गोरेवाडा उद्यानाचे सर्व क्ष्ेत्र १९१४ हेक्टर आहे. गोरेवाडा रिझर्व्ह येथील सफारी व गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्राचे उद् घाटन २०१५ मध्ये करण्यात आले होते.याचेच पुढचे पाऊल म्हणजे ‘इंडियन सफारी’ असून हा प्रकल्प गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा मोठा व महत्वाचा भाग आहे.
\
(व्हीडीयो-पत्रकारांना आज सफारीदरम्यान दिसलेला व्याघ्र)
‘इंडियन सफारी’मध्ये चार वेगवेगळ्या सफारींचा आनंद पर्यटकांना लृटता येणार आहे.यामध्ये बिबट सफारी,व्याघ्र सफारी,अस्वल सफारी व तृणभक्ष्ी प्राण्यांची सफारी यांचा समावेश आहे.व्याघ्र सफारीमध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून २०१७ साली स्थलांतरीत करण्यात आलेला ‘राजकुमार’नावाचा वाघ सोडण्यात आला आहे.तसेच महाराजबाग येथून प्राप्त ’ली’ नावाची वाघिणीही स्थलांतरीत करण्यात आली असून पर्यटकांना असे एकूण दोन वाघांचे दर्शन या इंडियन सफारीमध्ये घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.यातील नीलगाय,चितळ व अस्वल सफारी २५ हेक्टरवर तर तृणभक्ष्ी सफारी ४० हेक्टरवर असल्याची माहिती त्यांनी दिली.

बिबट सफारीमध्ये असणारे ७ बिबट केंद्रिय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण,नवी दिल्लीच्या परवानगीनंतर गोरेवाडा येथे स्थलांतरीत करण्यात आले असून अस्वल सफारीमध्ये असणारे ६ अस्वल हे बाबा आमटे एनिमल पार्क,मेळघाट व इतर ठिकाणाहून प्राप्त झाले आहेत.याशिवाय तृणभक्ष्ी सफारीमध्ये असणा-या १४ नीलगाय,४ चितळ राज्याच्या विविध भागातून प्राप्त करण्यात आले आहेत.
या सर्व सफारींचे दर ही सर्वसामान्य पर्यटकांना परवडतील असेच ठेवण्यात आले असून सफारीच्या बुकींगसाठी ऑन लाईन व ऑफ लाईन दोन्ही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.यासोबतच प्रशासकीय इमारत,तिकीट खिडकी,कॅफेटेरिया,पर्यटकांसाठी खास रंगरंगोटी केलेल्या वातनुकूलीत बसेस,पार्किंक,पीक अप ॲण्ड ड्रॉप पॉईंट,टॉयलेट ब्लॉक इ.सर्व सुविधा पर्यटकांना देण्यात आल्या असून सुरक्ष्ि त तेचा दृष्टिकोण लक्ष्ात ठेऊन वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
जंगलातील नष्ट झालेली गावे, मोठमोठी वारुळे, गुहा,नैसर्गिक पाणवठे, तलाव अश्याप्रकारचे अगदी नैसर्गिक अधिवास तयार करण्यात आले आहेत.प्रत्येक एन्कलोझरमध्ये असणा-या प्राण्यांना आवश्यक अशा वातावरणाची गरज लक्ष्ात घेता प्रत्येक ठिकाणी वन्यप्राण्यांकरिता फिडींग पॉईंट,रात्र निवा-याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वसफारी वैविध्यपूर्ण असून या सर्व सफारीद्वारे पर्यटकांना अनोख्या प्राणीजीवनाचे दर्शन घडणार आहे.‘इंडियन सफारी‘मध्ये वन्यप्राणी मुक्तपणे संचार करताना पाहण्याचा आनंद पर्यटकांना नक्कीच घेता येणार असल्याचे ते म्हणाले.या व्यतिरिक्त केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्याद्वारे मास्टर प्लॅन फेज-२(अफ्रिकन प्राणीसंग्रहालय,आदिवासी माग,नाईट प्राणिसंग्रहालय,बायो पार्क,संवेदनांचा मागोवा)अफ्रिकन सफारीच्या रुपरेषा यांना मान्यता प्राप्त असून भविष्यात टप्प्पया टप्प्पयाने याची भविष्यात उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.लवकरच ‘वॉकिंग ट्रेन’ याचा देखील आनंद पर्यटकांना लृटता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर हे देशात चारही भागाकंडे जाणारा गेट-वे असून विदर्भातील इतर पर्यटन क्ष्ेत्राचा आनंद लृटण्यासाठी जाताना किवा येताना गोरेवाडा हा देखील त्यांना एक आनंददायी अनुभव राहणार असल्याचे ते म्हणाले.पर्यटकांना सफारीदरम्यान प्रशिक्ष्ति गाईड्स मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या इंडियन सफारीमाध्ये वन्य जीवांच्या सुरक्ष्ि ततेसाठी पर्यटकांना खासगी वाहनाने प्रवेशाची परवानगी नसून वन विभागाच्या तीन वातानूकूलीत बसेसद्वारेच सफारीचा आनंद लृटता येणार आहे.या तीन बसेसमध्ये ६ गाईड राहणार आहेत.या पुढे व्हॅन उपलब्ध होणार असून त्यात देखील प्रशिक्ष्ति गाईड्स हे पर्यटकांसोबत राहणार आहेत.
हा एकूण प्रकल्प ४५० कोटींचा असून यातील २०० कोटी राज्य सरकार तर उर्वरित २५० कोटी हे खासगी गुंतवणकीतून उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.२०० कोटीपैकी राज्य सरकारने आतापर्यंत ९० कोटी जमा केले असून त्यातील ६० कोटी खर्च करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ.एन.रामबाबू यांनी माध्यमांना माहिती देताना गोरेवाडाला तीन हजार वर्षांचा जूना इतिहास असल्याचे सांगितले.या जागेवरील अतिशय प्राचीन अश्या दफन विधीच्या खूणा,मोठमोठे विशाल दगड याची साक्ष् देतात.आपल्याकडे भूतदया संस्कृती असल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत वन्य जीवांना मनुष्य प्राण्याकडून फार कमी धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
असे आहेत दर-
एसी बस प्रिनियम- सोमवार ते शुक्रवार ३०० रु.शनिवार,रविवार ४०० रु.मात्र एक महिन्यापर्यंत पर्यटकांसाठी विशेष सवलत दर मिळणार असून सोमवार ते शुक्रवार २४० तर शनिवार व रविवार प्रति व्यक्ती ३२० रु. दर असणार आहेत.स्टॅर्ण्ड एसी बसचे दर पुढील प्रमाणे आहेत-सोमवार ते शुक्रवार २०० रु.सवलतीचा दर १६० रु.शनिवार व रविवार ३०० रु.सवलतीचा दर २४० रु.प्रतिव्यक्ती.नॉन एसी बसचा दर- सोमवार ते शुक्रवार १०० रु,शनिवार व रविवार १०० रु.या दरात कोणतीही सवलत पर्यटकांना मिळणार नाही.
उद् घाटनप्रसंगी यांची राहणार विशेष उपस्थिती-
२६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाेणा-या इंडियन सफारीच्या उद् घाटन सोहळ्याप्रसंगी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,गृहमंत्री अनिल देशमुख,पालकमंत्री डॉ.नितीन राऊत,क्रीडा मंत्री सुनील केदार,पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मुख्यमंत्री व विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस,खासदार डॉ.विकास महात्मे,आ.ना.गो गाणार,आ.प्रवीण दटके,माजी आ. गिरीश व्यास, आ. ॲड.अभिजित वंजारी,आ.विकास ठाकरे,आ.समीर मेघे, मिलिंद म्हैसकर,महापौर दयाशंकर तिवारी,वन विभागाचे एन.रामबाबू, नितीन काकोडकर, संजीव कूमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे इ.मान्यवर यांची उपस्थिती राहील.

आमचे चॅनल subscribe करा