

आम आदमी पक्ष्ाचा स्तुत्य उपक्रम
नागपूर,ता. १७ जुलै: आम आदमी पार्टी उत्तर नागपूर प्रभाग क्रं. ५ चे क्रांतीकारी सचिव राज कुंभारे उर्फ आर के यांच्या सौजन्याने यांचे सुपुत्र कुमार तेजस याचा १२ वा वाढदिवस तसेच आर.के. यांचे परममित्र व वार्ड क्रं २४ चे अध्यक्ष अमित अंबादे यांच्या ३६ व्या वाढदिवसाच्या निमित्याने प्रभागातील राणी दुर्गवती नगरातील गोंडपूरा येथील नालंदा वस्तीतील वृध्दाश्रम येथील गरजू , निराधार व वृद्धांना जीवनावश्यक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
यामध्ये कनिक , तांदूळ , डाळ , तेल , साबण, तिखट , मसाला ,मीठ, चहापत्ती , साखर देऊन तसेच वृध्द महिलांना साडी चोळीची भेट म्हणून देण्यात आली .
वाढदिवसा प्रसंगी मोठा कार्यक्रम करण्याऐवजी गरजूंना मदत करुन सामाजिक बांधीलकी जपण्याचा एक छोटासा उपक्रम राबविण्यात आला . यापुढे देखील या वृद्ध माता भगिनींना सहकार्य करण्याचे आश्वासन राज कुंभारे यांनी दिले .
यावेळीआम आदमी पक्षाचे उत्तर नागपूर विधानसभा संयोजक रोशन डोंगरे , संघटन मंत्री प्रदीप पौनीकर , सचिव गुणवंत सोमकुवर , प्रभाग अध्यक्ष विजय नंदनवार ,वार्ड अध्यक्ष योगेश पराते , वार्ड अध्यक्ष अमित अंबादे , नरेश महाजन , हरेश निमजे अरुण गुणरकर , मनोज नंदेश्वर , क्लेमेंट डेविड , हिरालाल बागडे , वृद्धाश्रम संचालिका बेबीताई रामटेके , पुष्पा अंबादे , जोशना नंदेश्वर इत्यादी उपस्थित होते .

आमचे चॅनल subscribe करा