
योगी आदित्यनाथ यांचा पुतळा फूंकला
नागपूर,ता. १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार व बलात्काराच्या घटना वाढत आहे. हाथरस येथे एका दलित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी चार नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन तिला बोलता येऊ नये म्हणून तिची जिभ कापली. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने झालेल्या प्रकरणाची दखल न घेता सामुहिक बलात्काराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या बलात्कार पीडितेचा शेवटी रुग्णालयात मृत्यू झाला.
ही उघड-उघड हत्या असून सुद्धा पीडितेच्या अंत्यसंस्काराचा अधिकार देखील तिच्या कुटुंबियांकडून हिरावून घेण्यात आला व जबरन मध्यरात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अंत्य संस्कार करण्यात आला. पीडीतेला न्याय मिळवण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते पूर्व अध्यक्ष् राहूल गांधी व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी हाथरसला पिडितेच्या घरी जात असताना योगी सरकार व त्यांच्या पोलिस प्रशासनाने राहूल व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांचा मार्ग अडवून त्यांना अटक केली.

या प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे मुख्यालय देवडिया काँग्रेस भवन समोर प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार,काँग्रेसचे पुढारी ॲड.अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात भव्य निर्देशने करण्यात आली तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा फूंकण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
प्रदर्शनात माजी नगरसेवक किशोर गजभिये,इरशाद अली,प्रा. दिनेश बानाबाकोडे,महेश श्रीवास,मोतीराम मोहाडीकर,अशोक निखाडे,गोपाल पट्टम,अब्दुल शकील,राजेश पौनकीर, राजेश डेगे,वसीम खान,ॲड.अभय रणदिवे,सुरेंद दहीकर,प्रशांत पाटिल,श्रीकांत ढोलके,नवेद शेख,इरफान काशी,शकील खान,मुख्तार अंसारी,आकाश कथलकर,मोहम्मद समिर,पंकज लोणारे,पवन सोमकुवर,युवराज वैद्य,लंकेश उके,बादल वाहने,राज खत्री,टिंगु कांबले,अनमोल लोणारे,ॲड.एन.वाय.भांदककर,जितेश गायकवाड,सरफराज खान,राजु भेंडे,मयुर हिंगणे,शेख नईम,जयंत डोईफोडे,कुणाल हेडावू,अब्दुल तौसिफ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आमचे चॅनल subscribe करा