Homeनागपूर न्यूजरक्तदान महायज्ञ येथेच न थांबता काश्‍मीर ते कन्याकुमारी प्रवास:किशोर बावणे

रक्तदान महायज्ञ येथेच न थांबता काश्‍मीर ते कन्याकुमारी प्रवास:किशोर बावणे

Advertisements

देवता फाऊंडेशनच्या रॅलीचा समारोप

नागपूर,ता. १६ ऑक्टोबर: देवता लाइफ फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या ‘वंदे मातरम रक्तदान महायज्ञ व जागरुकता अभियान रॅली’चा समारोप विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ.हेडगेवार स्मृती मंदिर रेशीमबाग येथे करण्यात आला.

यावेळी रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.दरम्यान,अध्यक्ष किशोर बावणे यांच्यासह सर्वांनीच डॉ.हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

रॅलीने विदर्भ,मराठवाडा,खानदेश असा पूर्ण सहा हजार किलोमीटरचा प्रवास केला.त्याचे नेतृत्व देवता फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी केले होते.

दरम्यान,बावणे यांचा सत्कार स्मृतिचिन्ह आणि देवदूत सन्मान देऊन नरेंद्र सतीजा यांनी केला.
यावेळी उपाध्यक्ष कस्तुरी बावणे,विशवस्त निलीमा बावणे,सारिका पेंडसे,डॉ.रवी गि-हे,शेखर साेनी,मोहन कोडवानी,कीर्ती जेसानी,शशीशेखर देशपांडे यांचासुद्धा देवदूत सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

यावेळी विशवस्त निलीमा बावणे यांनी या प्रवासातील रक्तदान जागृतीबाबतचे त्यांना आलेले अनुभव कथन केले.आजच्या युवा पिढीची प्रतिनिधी व संस्थेच्या उपाध्यक्षा कस्तुरी बावणे यांनी रक्तदानाचे महत्व सांगून तरुण पिढीला रक्तदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना किशोर बावणे म्हणाले,की रक्तदान महायज्ञ व जनजागृतीसाठी येथेच न थांबता पुढील काश्‍मीर व कन्याकुमारी अशा प्रवासाची घोषणा केली तसेच देवता सेवा संघाची स्थापनाही विजयादशमीच्या निमित्ताने त्यांनी केली.

या संघामध्ये इच्छूक देवदूतांनी या संस्थेसाठी दररोज एक ते दोन तास देऊन नि:स्वार्थपणे समाजकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या सेवा संघामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि १३५ वेळा रक्तदान करणारे नरेंद्र सतिजा यांची ‘देवदूत आचार्य’ म्हणून निवड करण्यात आली.
संचालन दिपाली घोंगे यांनी केले तर आभार संस्थेचे सदस्य विवेक जुगादे यांनी मानले.

Latest बातम्या