Homeनागपूर न्यूज‘ रंगभूमी’ जीवन जगण्याची कला: रघुवीर यादव

‘ रंगभूमी’ जीवन जगण्याची कला: रघुवीर यादव

सोळा दिवसीय नाट्य अभिनय कार्यशाळेचे उद् घाटन

नागपूर,ता. ३० जून २०२२: मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन नागपूरतर्फे सोळा दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेचे उद् घाटन आज शुक्रवार,दिनांक १ जुलै २०२२ रोजी चित्रपट व रंगभूमी वरील ज्येष्ठ कलाकार रघुवीर यादव यांच्या हस्ते झाले. ‘रंगभूमीमुळे जीवन जगण्याची कला शिकता येते’ असं म्हणत त्यांनी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

अभिनय नाट्य कार्यशाळेला मार्गदर्शिका म्हणून मंगला सानप (पदवीधर , राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली ) लाभल्या आहेत. स्वाती भिसे दिग्दर्शित ‘दि वॉरीयर क्वीन ऑफ झान्सी’, पाच ऑस्कर नामांकित चित्रपट ‘द ग्लोरियस’ या जुली तेमुर दिग्दर्शित चित्रपट व अश्याच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये मंगला सानप यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून भूमिका निभावली आहे.

कार्यशाळेच्या उद् घाटन प्रसंगी संस्कृततज्ज्ञ व आयुर्वेदा मधल्या सुवर्ण पदक विजेत्या डॉ.मनीषा यमसंवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या सोबतच राष्ट्रभाषा परिवाराचे अध्यक्ष राजाराम शुक्ल व सचिव सुरेश बाबूजी अग्रवाल व ऋतुराज वानखेडे यांची उपस्थिती होती.

मनुष्य प्रकृतीपासून दूर होत चालला आहे. त्याचप्रमाणे साहित्यातील प्रकृतिचा प्रभाव सुद्धा कमी होत चालला आहे व हिच पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

सोबतच सदर नाट्य कार्यशाळेमध्ये एम्प्रोवायझेशन , निरीक्षण,ऍक्टिंग थेरी, इम्पल्स, रसा वॉक, मास्क चा वापर करून सादरीकरण, एकाग्रता, श्वसन नियंत्रण, कल्पनाशक्ती वाढण्या करिता थिएटर गेम्स तसेच यांच्या सारख्या विविध उपक्रमांद्वारे अभिनय शिकण्यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यानमार्फत मंगला सानप यांच्या मार्गदर्शनात एका लघु नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक पुष्पक भट यांनी दिली.

Latest बातम्या