Homeनागपूर न्यूजयोग्य रितीने निवडणूक प्रक्रीया राबवा : निवडणूक निरीक्षक यांच्या सूचना

योग्य रितीने निवडणूक प्रक्रीया राबवा : निवडणूक निरीक्षक यांच्या सूचना

Advertisements

कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण

नागपूर,दि.२६ नोव्हेंबर: : मतदानाच्या दिवशी मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेचे काम जबाबदारीने पार पाडावे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रीयेबाबत सर्व माहिती घेवून सर्व मतदानाचा सराव करुन योग्य पध्दतीने प्रक्रीया राबवावी, , असे निर्देश निवडणूक निरीक्षक माधवी खोडे यांनी निर्देश दिले.

स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे. यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्याबोलत होत्या. उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, तहसिलदार, नायब तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

मतदानाचे काम जिकरीचे असल्याने जाबाबदारीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या. सर्व मतदान केंद्राधिकारी यांनी मतदानाच्या अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देवून मतदार ई-पीक व ओळखपत्राच्या आधारे मतदानास पात्र राहील, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदान केंद्रात जांभळा स्केच पेन आवश्यक आहे अन्यथा मतदान अवैध होईल. ओळख स्लिपवर कोणत्याही पार्टीचे नाव राहू नये, नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांचे ओळखपत्र पात्र राहील, असेही त्यांनी सांगितले.

नोटा या निवडणूकीत नाही, स्मार्ट फोन व कॅमेरा मतदान केंद्रात आणण्यास सक्त मनाई राहणार आहे. या प्रशिक्षणात बॅलेट हाताळणे, मतदान पेटी कशा प्रकारे उघडणे आदी बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. मतदान अधिकारी क्र.१ व २ यांच्या कामाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. मतदान विषयक सिलींग व साहित्य जमा करणे, संविधानिक व असंविधानिक लिफाफा, अपंग मतदाराची यादी आदी बाबतचे निवडणूक विषयक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
……………………….

Latest बातम्या