
युथ एम्पोवेरमेन्ट समिटच्या दुसऱ्या दिवशी तरुणांची गर्दी
नागपूर,ता.१८ फेब्रुवरी २०२३:. युवकांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पना व्यवसायाच्या माध्यमातून आणण्याच्या प्रयत्न करत असतात. काही आर्थिक अडचणीमुळे ते स्वयंरोजगार करू शकत नाही, अशा नवव्यावसायिकांना आर्थिक बळ देण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, असे वेधचे अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी केले.
फॉर्च्यून फाऊंडेशन, कौशल्य विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पॉवरमेन्ट समिटच्या दुसऱ्या दिवशी परिसंवादात ते बोलत होते.
देशाच्या अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी नव्या उद्योजकांची आवश्यकता आहे. देशाचा जीडीपीमध्ये वाढविण्यासाठी त्याच्या फायदा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन व्यवसायात पाया उभारणी करणे सुरू आहे. २०१४ पूर्वी काही मोजक्याच स्टार्टअप कंपनी होत्या आज त्याची संख्या हजाराच्या घरात आहे. यावरून लक्षात येईल की स्टार्टअप सुरू करण्याची संख्या किती असेल.

या नंतर दिलीप पेशवे यांचे आत्मनिर्भर भारत या विषयावर मार्गदर्शन झाले.आत्मनिर्भर भारत ही मोहीम भारताला विकसित राष्ट्राच्या पंक्तित नेईल. आत्मनिर्भर भारताचे सर्वात जास्त कामे ही महाराष्ट्रामध्ये होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनामार्फत समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी दिली. या योजनेतून विदेशात नोकरीच्या असलेल्या संधी मिळत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. राज्य व केंद्र सरकार द्वारे स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नोकरीपेक्षा व्यवसायात पुढे या असा सल्ला देत त्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युथ इम्पोवेरमेन्ट समिटचे कौतुक केले.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या योजना सुशांत बेझलवार यांनी मांडल्या. संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ यांची माहिती सुरेश ढगे आणि अक्षय कांबळे यांनी दिली. ग्रामीण युवकांच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मशिनरीचा स्टॉल संजीवनी ऍग्रोचे राजेश देशपांडे यांनी त्याबाबत माहिती दिली.
एव्हीएशन क्षेत्रातही मोठ्या संधी आहे. फ्लाईंग क्लब मध्ये अनेक रोजगार निर्माण होणार आहे. भारत एव्हीएशन क्षेत्रात पुढील पाच वर्षात मोठी कामगिरी करणारा जगातील पहिला देश बनणार आहे. टाटा समूहाने नुकतेच एअर इंडिया विकत घेतले आणि ५०० विमान निर्मितीचा ऑर्डर दिला आहे. याची देखभाल दुरुस्तीसाठी ४० हजार तंत्रज्ञांची आवश्यकता भासणार आहे. ड्रोन फार्मिंगमध्ये देखील ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध राहणार असल्याची माहिती विशाल बांगरे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनीतसिंग तुली, भोलानाथ सहारे, अनिल देव, कुणाल पडोळे, विजय फडणवीस, राजेश कनाटे, अशोक सायरे, शैलेश ढोबळे, योगेश पाचपोर, शीतल पाटील, हे परीश्रम घेत आहेत.
युथ एम्पोवेरमेन्ट समिटचा समारोप-
तीन दिवस चालणाऱ्या युथ एम्पोवेरमेन्ट समिटचा समारोप आज रविवार दिनांक १९ फेब्रुवरी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुद्रा लोन लाभार्थ्यांना धनादेश वितरण-
या समिटमार्फत स्वयंरोजगारासाठी मुद्रा लोन लाभार्थ्यांना धनादेशचे वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यशस्वी उद्योजकांचा सत्कार
या युथ एम्पोवेरमेन्ट समिटमार्फत स्वयंरोजगार ज्यांनी सुरू केला अशा यशस्वी उद्योजकांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.
………………………

आमचे चॅनल subscribe करा