
नागपूर,ता. १३ मार्च: मागच्या सात वर्षांपासून विदर्भातील युवकांना फॉरच्यून फाऊंडेशनच्यावतीने एक योग्य मंच निर्माण करुन देण्याचा दृष्टिकोणातून आम्ही प्रयत्नशील आहोत.रोजगार आणि स्वयंरोजगार या दोन्ही ठिकाणी युवकांना असलेल्या मार्गदर्शनाची गरज लक्ष्ात घेऊन २०१५ साली ‘फॉरच्यून फाउंडेशनची’ स्थानपा करण्यात आली. फॉरच्यून फाऊंडेशनच्या स्थापनेपासून आम्ही दर वर्षी ‘यूथ एम्पावरमेंट समिट’ हे युवकांच्या दृष्टिकाेणातून अत्यंत प्रेरणादायी आणि ज्याची वाट युवक हे सतत पाहत असतात अश्या प्रकारचं यूथ एम्पावरमेंट समिट आम्ही दरवर्षी आयोजित करीत असतो असे फॉरच्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष् व माजी आमदार प्रा.अनिल सोले म्हणाले.ते फॉरच्यून फाऊंडशनतर्फे आयोजित ‘यूथ एन्पावरमेंट समिट‘च्या ऑन लाईन उद् घाटनाप्रसंगी बोलत होते.
देशपांडे सभागृहाच्या परिरसात तसेच आमदार निवासाच्या सर्व खोल्यांमध्ये १०० च्या जवळपास विविध उद्योजक युवकांच्या मुलाखती घेत असतात.ज्यांना रोजगार पाहीजे,ज्यांना चांगली नोकरी पाहीजे अश्या युवकांना आणि ज्यांना चांगले कर्मचारी पाहीजे अश्या कपंन्यांना एका ठिकाणी आणून एका व्यसपीठावर मुलाखत घेतली जाते आणि मुलाखतीतून चांगली नोकरी आणि चांगले कर्मचारी निवडून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाते.अश्या स्वरुपाचे कार्य तीन दिवसांच्या यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये होत असतं.
त्याप्रमाणे स्वयंरोजगाराच्या दृष्टिकाेणातून देखील एकाच छताखाली कर्ज देण्याच्या दृष्टिकोणातून मुद्रा बँकिग,सहकारी बँका, राष्ट्रीय बँका यांचे स्टॉल्स लावले जातात.त्याच प्रमाणे सरकारच्या विविध योजने अंतर्गत युवकांना मार्गदर्शन करण्याबाबत सरकारी, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे स्टॉल्स,विविध विभागांचे स्टॉल्स समिट मध्ये असतात.तसेच वेगवगळे उद्योग सुरु करणाच्या दृष्टिने शेकडो मशीनरीजचे प्रदर्शन,या प्रदर्शनाच्या माध्यमातनून एखादी मशीन युवकांनी जर पाहिली तर त्याचं प्रोफाईल बघणे, ती कश्या पद्धतीने चालवायची याचं प्रशिक्ष् ण,याच्या करीता मनपाच्या सहाय्याने त्याचं व्हीटीपीझ तसेच तज्ज्ञांच मार्गदर्शन युवकांना लाभतं.त्याच बरोबर मार्केटिंग तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करुन देणे या सर्व अतिशय महत्वपूर्ण बाबींचे मागर्दशन यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये तीन दिवसात दर वर्षी हाेतं.
मागच्या वर्षी हे समिट देशपांडे सभागृहात फ्रेब्रुवारी महिन्यात झालं व त्यानंतर मार्च २२ पासून देशात लॉक डाऊन लागला,या वर्षी समिटची जी योजना दोन महिन्यांपूर्वी जी आम्ही आखली होती त्या वेळी वाटलं नव्हतं ’ऑन लाईन’ या वर्षी हे समिट घ्यावे लागणार आहे.मात्र युवकांचा तरीही भरभरुन प्रतिसाद आम्हाला मिळाला.आजही १७ हजारच्या वर नोदंणी युवकांनी केली आहे आणि ७३ कंपन्यांनी समिटमध्ये सहभाग नोंदवला आहे.पुढील तीन ते चार दिवस या ऑन लाईन मुलाखती पार पडणार आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव लक्ष्ात घेता संपूर्ण दिवसभरात १३ आणि १४ मार्च रोजी वेगवेगळ्या तज्ज्ञांचे जे मार्गदर्शन होणार होते ते मात्र आम्हाला रद्द करावे लागले मात्र उद् घाटनानंतर लगेच ऑन लाईन मुलाखती सुरु हाेणार आहेत. सर्वांना लॉगिंग आय-डी मिळेल.मुलाखती होतील व ताबडतोब नियुक्ती पत्र ही मिळेल.एक ही युवक विना मुलाखतीचा राहणार नाही अशी काळजी आम्ही घेणार आहोत.
युवकांना मार्गदर्शनाचा जो सेशन रद्द झाला आहे तो आम्ही पुढच्या आठवड्यात किवा एप्रिलच्या पहील्या आठवड्यात सतत सात दिवस घेणार आहोत.राेज एका वक्त्याचं मार्गदर्शन त्यात राहील. त्याच ठिकाणी पशुउद्योग कुटीर,गृह,ग्रामोद्योग, छोटे उद्योग, पशुखाद्य, कॉस्मेटिक्स या दृष्टिकाेणातून उत्पादन,वितरण व मार्केटिं यासाठी देखील वर्कशॉपच्या माध्यमातून ऑन लाईन मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करोनाचा काळखंडात आता असंच जगणं शिकणे गरजेचे आहे.उद्योग,नोक-या,रोजगार करोनाच्या अनुषंगानेच करावा लागणार आहेत.त्यामुळेच या वर्षी आम्ही एक संकल्प केला आहे,गृहउद्योग,कुटीर उद्योग यांची एक हजार कल्सटर निर्मिती विदर्भात केली जाईल.याचं संपूर्ण संयाेजन केले जाईल.
फॉरच्यून फाऊंडेशन हे एक सामाजिक कार्य आहे.त्यामुळे अनेकांचे सहकार्य आम्हाला मिळतं त्या सर्वांचे आभार याप्रसंगी माजी आ.प्रा.अनिल सोले यांनी मानले.

आमचे चॅनल subscribe करा