Homeनागपूर न्यूजमेडीकलच्या विद्यार्थ्याच्या पत्रकबाजीवर वरिष्ठ डॉक्टर्सनी केली नाराजी व्यक्त

मेडीकलच्या विद्यार्थ्याच्या पत्रकबाजीवर वरिष्ठ डॉक्टर्सनी केली नाराजी व्यक्त

Advertisements

नागपूर,ता.२४ ऑक्टोबर: इंदिरा गांधी मेडीकल रुग्णालयातील बीएस.सी पीएमटीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी महेंद्र बाबूराव सोनवणे याने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती त्यात त्याने दोन वर्षाचे ७२ हजार २०० रुपये शुल्क भरण्यास असमर्थ असल्याने व तातडीची मदत न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.या व्हायरल झालेल्या पोस्टची दखल घेत मेडीकल रुग्णालयातील अनेक वरिष्ठ डॉक्टर्सनी तीव्र नापसंदी व्यक्त केली आहे.

या विद्यार्थ्याच्या ‘आत्महत्या’ या शब्दावर त्यांची तीव्र नाराजी असून या विद्यार्थ्याने पोस्ट व्हायरल करण्या ऐवजी संबंधित जवाबदार व्यक्तिंकडे समस्या मांडली असती तर मदत स्वरुपात काहीतरी तोडगा निश्‍चितच काढता अाला असता.महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलयानंतर शुल्क भरणे हे बंधनकारक आहे ,त्यासाठी अधिष्ठाता किवा इतर वैद्यकीय चिकित्सक यांच्या अख्यारितीत कोणाचेही शुल्क माफ करण्याचा अधिकार नाही.हे शासकीय नियम आहेत त्यांचे पालन करणे क्रमप्राव्त आहे.

मात्र शुल्क न भरल्यास आत्महत्या करील हा शब्द निदान मेडीकलच्या विद्यार्थ्याच्या तोंडी शोभत नसल्याचे वरिष्ठ डॉक्टर्स यांनी सांगितले.आज अनेकाना किडनी,ह्दयरोग,कर्कराेग इ.सारखे जीवघेणे आजार आहेत मात्र तरी देखील ते जिवंत राहण्यासाठी हिमतीने लढा देतात,मात्र दूसरीकडे वैद्यकीय क्ष्ेत्रातीलच एक तरुण फक्त शुल्की न भरु शकल्याने आत्महत्यासारखा निराशावदी सूर काढतो,याची अत्यंतिक वेदना झाल्याचे मत वरिष्ठांनी व्यक्त केले.

या विद्यार्थ्याने पुढील परिस्थिती वेळीच लक्ष्ात घेऊन पालकमंत्री,जिल्हाधिकारी,समाज कल्याण अधिकारी आदी यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न करायला हवे होते.किवा समाजातील दानशूरांकडे मदत मागायला हवी होती.या विद्यार्थ्याचे उज्जवल भविष्य खराब होऊ नये म्हणून समाजातील दानदाते हे निश्‍चितच पुढे आले असते मात्र अात्महत्यासारखा चुकीचा,निराशावादी शब्द हा मेडीकलच्या विद्यार्थ्याला शोभला नसल्याची खंत या वरिष्ठ डॉक्टर्सनी व्यक्त केली.

GMC is Dying Everyone is Enjoying!
मेडीकलमध्ये आधीच करोनाच्या ३०० रुग्णांचा भार आहे.यात आणखी ४०० खाटा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे मात्र दूसरीकडे मेयाेसारखे दूसरे शासकीय रुग्णालयांनी कोविडच्या नावाखाली लहानसहान शस्त्रक्रिया देखील बंद केल्या आहेत. साधे बोटाचे देखील ऑपरेशन करायचे असल्यास रुग्णाला मेडीकलमध्ये पाठवले जाते.परिणामी मेडीकलमधील अनेक वरिष्ठ डाॅक्टर्सनी अधिष्ठाता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

मेयो रुग्णालयांनी त्यांचा शस्त्रक्रिया विभागच बंद करुन ठेवला असल्याची धक्कादायक माहिती आहे.परिणामी मेयोमधील उपचार करु शकणा-या रुग्णांचाही संपूर्ण भार हा मेडीकल प्रशासनावर आला असून GMC is Dying Everyone is Enjoying!अशी खंत मेडीकलमधील वरिष्ठ डॉक्टर्स व्यक्त करीत आहे.शेवटी मेडीकलमध्ये काम करणारे डॉक्टर्स ही सुद्धा माणसेच आहेत,त्यांच्या परिश्रमालाही मर्यादा आहेत याचेही भान शासनाने ठेवावे,गेल्या सात महिन्यांपासून अविरत परिश्रमामुळे त्यांच्याही तब्ब्येतीवर परिणाम झाला आहे,तरीदेखील कर्तव्यापुढे सदैव ते तत्पर असले तरी मेयोमधील शस्त्रक्रिया विभाग तातडीने पुन्हा सुरु करण्यात यावा,व अर्धा भार उचलावा,अशी मागणी केली जात आहे.

Latest बातम्या