Homeनागपूर न्यूजमॅक्स:ग्राहकांसाठी विश्‍वसनीय खरेदीस्थळ

मॅक्स:ग्राहकांसाठी विश्‍वसनीय खरेदीस्थळ

Advertisements


देवेशकुमार यांचा दावा:योग्य किंमतीत ग्राहकांचे समाधान
नागपूर,ता.१० सप्टेंबर २०२२: धरमपेठ येथील ‘मॅक्स’ फॅशन स्टोर हे मागील नऊ वर्षांपासून ग्राहकांसाठी विश्‍वसनीय खरेदी स्थळ राहीले आहे.मात्र ही इमारत जुनी असल्याने १३,७७० चौ.मी.जागेत नव्याने भव्य असे फॅशन स्टोर आज उभारण्यात आले आहे.डिसेंबर २०१३ पासून धरमपेठ येथील हे मॅक्स फॅशन स्टोर ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर राहीले आहे.आज या फॅशन स्टोरचे नव्याने उद् घाटन झाले असून, आपल्या ग्राहकांना पूर्वीसारखेच समाधान देणार असल्याचे मॅक्स फॅशन स्टोरचे उपाध्यक्ष(पश्‍चिम) व व्यापर प्रमुख देवेशकुमार यांनी आज पत्र परिषदेत सांगितले.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की आज खरेदी ही फक्त ‘गरज’राहीली नसून नेहमीच्या रुटीन कामापासून परवृत्त होऊन, मनाचा निखळ आनंद मिळवण्याचे एक यशस्वी माध्यम झाले आहे.ग्राहकांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी जगभरात ‘मॅक्स’तत्पर आहे.जगभरातील विविध देशात,त्या त्या देशातील संस्कृती व गरजेप्रमाणे मॅक्स फॅशन स्टोर ग्राहकांना समाधान देत असतात.

आमच्या फॅशन स्टोरमध्ये जवळ जवळ ६८ ते ६९ वस्तूंची किंमत ही ५०० रुपयांच्या खाली आहे.त्यामुळेच समाजातील प्रत्येक वर्ग सहज आमच्या फॅशन स्टोरमधून समाधान आणि आनंद घेऊनच बाहेर पडतो.आपल्या सर्वच वस्तूंच्या किंमती योग्य ठेऊन आम्ही ग्राहकांचे समाधान जपतो.

आमच्या मॅक्स फॅशन स्टोरमध्ये कुटुंबातील सर्वांसाठीच विविध वस्तूंची भरमार आहे.तरुणाई,मुली,महिला,पुरुष,लहान मुले,ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी ‘मॅक्स’या एकाच ठिाकणी, भरपूर वस्तू उपलब्ध आहेत.विविध फॅशनचे कपडे ते ही स्वस्त दरात,हेच मॅक्सचे वैशिष्ठ असल्याचे ते म्हणाले.

मॅक्सच्या माध्यमातून ग्राहक ऑन लाईन खरेदी देखील करु शकतात.आमची बेवसाईट max.fasion.com यावर देखील ग्राहक मॅक्सच्या उत्पादनांना पसंदी देतात मात्र फॅशन स्टोरमध्ये प्रत्यक्ष खरेदी केल्याने ,आमचे आपल्या ग्राहकांसोबत ‘भावनिक बंध’ही जुळत असतात.आज आमच्या या धरमपेठेतील मॅक्स फॅशन स्टोरमध्ये जवळपास ४० कर्मचारी ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहेत.आज आमचे अडीच लाखांहून अधिक ग्राहक असून दीड लाख ग्राहक तर आमच्या या धरमपेठेतील मॅक्स फॅशन स्टोरसोबतच जुळलेले असल्याचा दावा त्यांनी केला.

सध्या उपराजधानी नागपूरात मॅक्सच्या ४ शाखा कार्यरत आहे.धरमपेठेतील मॅक्स फॅशन स्टोर आजपासून ग्राहकांच्या सेवेत सुरु झाले असून अजून ४ स्टोर सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे देवेश कुमार यांनी सांगितले.आमच्या प्रत्येक मॅक्सच्या फॅशन स्टोरमध्ये ग्राहकांना एकसारखाच अनुभव,आनंद आणि समाधान मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले.

या ठिकाणची जुनी वास्तू तोडून नव्याने हे स्टोर उभारण्यात आले आहे.आता येणा-या विविध सणासुदीच्या काळात मग ती नवरात्र असो किवा मंगल दीप उजळणारी दिपावली,ग्राहकांना वेगळे काही देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.नेहमीप्रमाणे आमच्याकडून केल्या जाणा-या खरेदीवर त्यांना भेटवस्तू देखील दिल्या जातील,अशी माहिती त्यांनी दिली.

गेली अडीच वर्षे आपल्या सर्वांचे सण समारंभ, कोविड-१९ महामारीमुळे उत्सवांशिवाय गेली.यंदा त्याची कसर भरुन काढणार.ग्राहकांना येत्या नवरात्र,दसरा व दिवाळीसारख्या पारंपारिक सणांच्या उत्सवाच्या खरेदीमध्ये आम्ही आमची सर्वोकृष्ट सेवा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे देवेशकुमार यांनी सांगितले.

एकच माहगडी टी-शर्ट घेण्यापेक्षा चार टी-शर्ट सवलतीच्या दरात घेण्याची आपली भारतीय मानसिकता असते,‘मॅक्स‘याच भारतीय मानसिकतेच्या कसौटीवर खरा उतरतो,असा दावा याप्रसंगी देवेशकुमार यांनी केला.

मॅक्समध्ये बारा हजारपेक्षा जास्त वस्त्रांच्या डिझाईन्स उपलब्ध असून आमचे वस्त्र निर्माते हे आंतरराष्ट्रीय फॅशनचे रुझान समजून घेऊन त्या अनुषंगाने वस्त्रांची निर्मिती करीत असतात.सध्या १७० शहरात मॅक्सचे ४०० पेक्षा अधिक स्टोर या कल्पकतेची व यशाची साक्ष देतात.

Latest बातम्या