
मुंढेंनी केले महिलांविषयी वादग्रस्त विधान
नागपूर,ता. २७ ऑगस्ट: माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सत्ताधा-यांनी त्यांचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून महिलांना त्यांच्या केबिनमध्ये पाठवून कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या विरोधात मुंढे यांनी २४ तासात महिलांची बदनामी करणारे वक्तव्य याचा पुरावा सादर न केल्यास भारतीय जनता पक्ष्ाच्या समस्त नगरसेविकांच्यावतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येईल असा इशारा उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिला.
मनपा मुख्यालयात सायंकाळी ५.३० वा.आयोजित पत्र परिषदेत उपमहापौरांन हे विधान केले.याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका वर्षा ठाकरे,प्रगती पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपमहापौर म्हणाल्या की,भाजपाला जे काही करायचे होते ते सभागृहात केले,आंदोलन करुन केले.भाजपची ही वृत्ती नाही आणि दुषचरित्र ही नाही.मुंढे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपचा दोन वेळा उल्लेख केला.याचा अर्थ ते नागपूरात भाजप पक्ष्ाविषयी आधीच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोण ठेऊन आले होते,हा आमचा अारोप सिद्ध झाला.
मुंढेंनी सत्ताधा-यांचा उल्लेख केल्याने आता त्यांनीच २४ तासांच्या आत हा खुलासा करावा,ही घटना कधी घडली?केव्हा घडली?किती वाजता घडली?आयुक्तांशी कोणीही पूर्व परवानगीशिवाय भेटू शकत नव्हते. त्यांचे नाव,गाव,पत्ता,मोबाईल क्रमांक,काम काय आहे?या सर्व बाबी पूर्वीच नोंदवल्या जात होते. याचा अर्थ ज्या महिलांनी आयुक्तांसमोर कपडे फाडलेत,त्यांची नावे आयुक्तांना माहिती आहे,परिणामी २४ तासात त्यांनी ती नावे माझ्याकडे पाठवावी.
कॅमरा हा आयुक्तांचा सर्वाधिक आवडीचा विषय.अश्या कॅम-याप्रेमी आयुक्तांच्या कक्ष्ात अनेक कॅमरे लागले आहेत.सीसीटीव्ही लागले आहेत. या घटनांचे सीसीटीव्ही फूटेज देखील मुंढे यांनी येत्या २४ तासात मला सोपवावे असे उपमहापौर म्हणाल्या.
कॅमराप्रेमी मुंढेंनी नुकतेच २१ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सभेत महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभा स्थगित केल्यानंतरही काही नगरसेवक हे आपापसात हास्य-विनोद करीत असताना,त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्याची सूचना त्यांच्या लॅपटॉपच्या मागे उभे असणा-या तंत्रज्ञाला दिली. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याला हाताने इशारा केला,की हे सर्व रेकॉर्ड कर आणि ती रेकॉर्डींग त्यांनी नंतर सोशल मिडीयावर व्हायरल केली,अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.यावरुन त्यांनी नगरसेवकांचे चरित्रहनन करण्याचा प्रयत्न आपल्या केबिनमध्ये केल्याचा आरोप त्यांनी केला.इतक्या पराकोटीच्या टेक्नोसेव्ही मुंढेंनी आता तेवढ्याच तातडीने महिलांनी त्यांच्या केबिनमध्ये कपडे फाडण्याचा प्रयत्न केला,याचेही फूटेज उपमहापौरांना सादर करावे.
मुंढेंची महिला विरोधी मानसिकता त्यांच्या या ही वक्तव्यावरुन सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.स्मार्ट सिटीच्या महिला अधिकारीला रात्रीच्या १० वाजता त्यांनी स्वत:च्या बंगल्यावर येण्याचा हूकूम फरमावला.नागपूरात जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाही त्यावेळी तेथील महिला कर्मचारी यांनी मुंढेंच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली ज्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरु आहे.मुंढे हे मुंबईत कार्यरत असताना तेथील महिला अधिकारी यांनी देखील त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.यावरुन ते महिलांकडे कोणत्या आणि कश्या पद्धतीने बघतात,हे सिद्ध होतं.
आता त्यांनी भाजप पक्ष्ाला बदनाम करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप केले.या आरोपाबाबत त्यांनी २४ तासात पुरावे सादर न केल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्या जाईल,असा इशारा त्यांनी दिला.

आमचे चॅनल subscribe करा