Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्र्यांनी अपघातात जखमी तरुणाला पोहोचवले स्वत: रुग्णालयात

मुख्यमंत्र्यांनी अपघातात जखमी तरुणाला पोहोचवले स्वत: रुग्णालयात

मुख्यमंत्र्यांची समयसुचकता: वाचवले चार जणांचे प्राण

ट्रक,बाईक व कारचा विचित्र अपघात

नागपूर,ता.१७ डिसेंबर २०२३: आज झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या स्थळी मुख्यमंत्री गेले होते. तिथे आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसले .त्या ठिकाणी अपघातामध्ये एका ट्रक आणि बाईकची धडक झाली बाईकचा त्यासोबत त्याचवेळी त्या ट्रकला एक सेंट्रो कार धडकली. सेंट्रो कारला एक बस धडकली. त्यात काही जण जखमी झाले मात्र जो बाईक चालवत होता तो तरुण ट्रक खाली अडकला होता. गंभीर अवस्थेत होता. जमाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होता मात्र, त्याला कोणी मदत करत नव्हतं मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि तो अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला त्या ट्रकच्या खालून काढायला लावलं.

त्याचा पाय गंभीर असा जखमी होता. तिथे ॲम्बुलन्स बोलवण्यात आली आणि त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत घेऊन टाकून स्वत: मुख्यमंत्री ते रवी नगर चौकातील सेन गुप्ता च्या रुग्णालयात त्या तरुणाला घेऊन आले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. तरुणाला रुग्णालय दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली तसेच इतर जखमी रुग्णांना या ठिकाणी आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनंतर त्या जखमी रुग्णांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी थांबला नसता तर गंभीर अवस्थेतील तरुणाच्या जीवाला बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र, मुख्यमंत्र्यांनी एनवेळी तत्परता दाखवून त्या तरुणाला तिथून काढून रुग्णवाहिका बोलून रुग्णालयात आणून दाखल केले.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने तरुणाचे प्राण वाचले.या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.

मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले.

याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगनआर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.

या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.

या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांमधील या माणुसकीचे व समयसुचकतेचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.
…………………

Latest बातम्या