Homeनागपूर न्यूजमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराची दमदार सुरुवात

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराची दमदार सुरुवात

Advertisements
पहिल्याच दिवशी ७ स्कॅनिंग कॅम्पमध्ये २,१०२ नागरिकांची आरोग्य तपासणी; ३८२ आयुष्मान व आभा कार्डांची नोंदणी

नागपूर, दि. ५ जुलै :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराअंतर्गत आजपासून स्कॅनिंग कॅम्पला प्रारंभ झाला. १५ जुलैपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्रात एकूण ७५ ठिकाणी हे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात येणार असून, पहिल्याच दिवशी दक्षिण पश्चिम व पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सात केंद्रांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

आज आयोजित सात स्कॅनिंग कॅम्पमध्ये एकूण २,१०२ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच १९१ आयुष्मान कार्ड आणि १९१ आभा कार्ड, असे मिळून ३८२ कार्डांची नोंदणी करण्यात आली.

दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात चार ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये एकूण १,१८६ लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. बिरसा मुंडा समाजभवन, तकिया धंतोली (धंतोली मंडळ) येथे १८१ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच ४५ आयुष्मान व ४५ आभा कार्डांची नोंदणी झाली. आजी-आजोबा पार्क, दीनदयाळ नगर (सुभाषनगर मंडळ) येथे २१४ नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. दत्तोपंत ठेंगडी सभागृह, जयप्रकाश नगर (त्रिमूर्ती मंडळ) येथे ३७४ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच १५ आयुष्मान व १५ आभा कार्डांची नोंदणी झाली. गणेश हनुमान मंदिर, हावरापेठ (नरेंद्र नगर मंडळ) येथे सर्वाधिक ४१७ नागरिकांनी तपासणी करून घेतली, तर ६० आयुष्मान आणि ६० आभा कार्डांची नोंदणी करण्यात आली. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकूण २४० आयुष्मान व आभा कार्डांची नोंदणी झाली.

पश्चिम विधानसभा क्षेत्रात तीन ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये ९१६ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. भिडे स्कूल, बर्डी (धरमपेठ मंडळ) येथे ३२२ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच ५४ आयुष्मान व ५४ आभा कार्डांची नोंदणी झाली. बाबासाहेब आंबेडकर भवन, गड्डीगोदाम, नाईबस्ती (झिंगाबाई टाकळी मंडळ) येथे २५० नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला, तर ४८ आयुष्मान व ४८ आभा कार्डांची नोंदणी झाली. मनपा हिंदी स्कूल (सुरेंद्रगड मंडळ) येथे ३४४ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली तसेच ४० आयुष्मान व ४० आभा कार्डांची नोंदणी झाली. पश्चिम विधानसभा क्षेत्रात एकूण १४२ आयुष्मान व आभा कार्डांची नोंदणी झाली.

या महाआरोग्य उपक्रमासाठी राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संदीप जोशी हे संयोजक म्हणून, तर रितेश गावंडे, विनोद कन्हेरे, रितेश पांडे हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. सर्व मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय पथके या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत असून, १५ जुलैपर्यंत तीनही विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.

…………………………………….

Latest बातम्या