Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत करोनाचे आज २८ बळी; ४२६ नवे रुग्ण, एकूण १४,७८१ बाधित

मुंबईत करोनाचे आज २८ बळी; ४२६ नवे रुग्ण, एकूण १४,७८१ बाधित

Advertisements

मुंबई: मुंबईतील करोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईत आज दिवसभरात २८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १४,७८१ वर पोहोचली आहे.

मुंबईतील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १४, ७८१ झाला आहे. आज दिवसभरात ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं मृतांची एकूण संख्या आता ५५६ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १७ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तर मृतांमध्ये १७ पुरुष आणि ११ महिला रुग्ण होत्या. ४ रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. तर दहा रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. उर्वरित १४ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली

Latest बातम्या