Homeनागपूर न्यूजमुंढे विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी:भाजप आमदारांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

मुंढे विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी:भाजप आमदारांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

नागपूर,ता. ३० जून: स्मार्ट सिटी प्रकल्पातील नागपूरातील नागरिकांच्या विकासकामांचे जवळपास २० कोटी रुपये एका खासगी कंत्राटदाराला दिल्याची तक्रार २१ जून रोजी महापौर तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक असणारे संदीप जोशी तसेच सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी डीसीपी यांच्याकडे केली होती मात्र डीसीपी यांनी ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखाकडे वर्ग करण्याचे आश्‍वासन महापौर व संदीप जाधव या दोन्ही संचालकांना दिले होते. मात्र १० दिवस उलटून देखील अद्याप या गुन्ह्याच्या संदर्भात कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने भारतीय जनता पक्ष्ाच्या आमदारांनी आज मंगळवार दि. ३० जून रोजी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे लेखी निवदेन दिले.

निवेदनात दिलेल्या तक्रारीनुसार मनपा आयुक्तांऐवजी अशी तक्रार सामान्य नागरिक किवा राजकीय पक्ष्ाचा कोणत्याही नेत्याच्या किवा कार्यकर्त्याच्या विरोधात असती तर आतापर्यंत त्वरीत कारवाई केली असती मात्र नागपूर शहरात एक आयएएस अधिकारीच नियमांना सुरुंग लावून बेकायदेशीर कार्य करीत असल्याची तक्रार पुराव्यासंह देऊनसुद्धा अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,हे असंवैधानिक आहे.समानताच्या न्यायाच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आले.

पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार यांनी लवकरच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात भारतीय जनता पक्ष्ाचे आमदार व शहराध्यक्ष् प्रवीण दटके,आ.ना.गो.गाणार,आ.गिरीश व्यास,आ.अनिल सोले,आ.विकास कुंभारे,आ.मोहन मते आदी यांचा समावेश होता.

Latest बातम्या