Homeनागपूर न्यूजमहालात दागिनांचा ‘महाल’: राेकडे ज्वलेर्सच्या देखण्या शोरुमचे उद्घाटन शुक्रवारी

महालात दागिनांचा ‘महाल’: राेकडे ज्वलेर्सच्या देखण्या शोरुमचे उद्घाटन शुक्रवारी

अभिनेत्री प्राजक्ता माळी व सोनाली कुलकर्णी होणार सहभागी

दागिन्यांच्या इतिहासात पहील्यांदा पहाटे ६ वाजता खरेदीवर भरघोस सूट

’जितना जल्दी आओगे उतना ज्यादा पाओगे: राेकडे कूटूंबियांचे आवाहन

नागपूर,ता.२० सप्टेंबर २०२५: अवघ्या सहाशे चौ.फूटाची महाल बडकस चौकातील जागा ही केवळ इतवारीतील ‘रोकडे ज्वेलर्स’च्या दूकानात येणा-या आपल्या ग्राहकांच्या पार्किंगसाठी घेऊन ठेवली.त्यानंतर हळूहळू या जागेचे महत्व कळू लागले.इतवारीच्या सराफा ओळीतील दूकान महालातील या ठिकाणी हलवले.अनेकांनी टिका ही केली.दागिन्यांचा व्यवहार होणारी बाजारपेठ सोडून महालात आपली पारंपारिक दूकान हलवणे अनेकांना योग्य ही वाटले नव्हते मात्र,महालकारांनी कधीही ग्राहकीत परकेपणाची उणीव भासू दिली नाही.२००० साली थाटलेले लहानसे दूकान आता महालातील ‘महाल’मध्ये परिवर्तित झाले आहे.येत्या शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी ६ हजार चौ.फूटांच्या जागेवर नव्याने बांधकाम झालेल्या रोकडे ज्वेलर्स शो रुमचे उद् घाटन होणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी या दूपारी १२ वा.तर सोनली कुलकर्णी या सायंकाळी ५ वाजता शो रुमल भेट देणार असल्याची माहिती आज रोकडे ज्वेलर्सचे अर्ध्यव्यू राजेश राेकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी रोकडे ज्वेलर्सने महालमध्ये आपला पहिला फ्लॅगशिप शोरुम सुरु केला होता.आज तेच शोरुम अधिक भव्य,मोठे आणि आकर्षक रुपात ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.महाल,नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी १६ हजार चौ.फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळात उभारलेले हे शोरुम विदर्भातील सर्वात मोठे दागिन्याचे शोरुम ठरले असल्याचे राजेश राेकडे म्हणाले.रोकडे ज्वलर्सच्या अनेक शाखा नागपूर तसेच विदर्भातील विविध शहरात सुरु झाले आहे मात्र,महालातील हे शोरुम हे सर्वात मोठे आणि देखणे शोरुम असल्याचे सारंग रोकडे यांनी सांगितले.पंचवीस वर्षां पूर्वी १० ऑक्टोबर २००० रोजी महालातील या लहानशा दूकानाची सुरवात केली होती.अगदी एक चौक पलीकडे पारंपारिक बाजारपेठ सोडून गेल्याने अनेकांनी टिका देखील केली हाेती.मात्र,आम्ही नवीन लोकांमध्ये,नव्या वास्तूमध्ये आलो आहोत अशी जाणीव कधीही महालातील ग्राहकांच्या विश्‍वास व सहयोगामुळे झाली नाही.महालातील हे शोरुम आमच्या दागिन्याच्या व्यवसायातील इतवारी नंतरचे दूसरे शोरुम होते.या नंतर लक्ष्मीनगर,कोराडी,हिंगणा,भंडारा इत्यादी ठिकाणी ७ शोरुम उघडण्यात आले.लवकरच आमचा आठवा शोरुम गाेंदिया येथे उघडला जाणार असून येत्या १० ऑक्टोबर रोजी उद्घाटनाचा प्रयत्न असणार आहे,तीन महिन्यांनंतर यवतमाळ येथे देखील रोकडे ज्वेलर्सचे शोरुम उघडलले जाणार असून २६ मार्च २०२६ रोजी चंद्रपुरमध्ये देखील राेकडे ज्वेलर्स ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती सारंग रोकडे यांनी दिली.

विदर्भातील सर्वात मोठे शोरुम महालातील असून सर्व शाखांमध्ये सर्वाधिक प्रिय हे महालातील शोरुम असल्याचे पारस रोकडे सांगतात.बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांना पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावं लागतं,बाजारपेठेमुळे रस्ता अरुंद आहेत,याची जाणीव आम्हाला देखील आहे मात्र,तरीही ग्राहकांची पसंदी रोकडे ज्वेलर्सवर कायम राहीली.त्यामुळेच येत्या २६ सप्टेंबर रोजी भव्य,देखण्या शोरुमच्या उद् घाटनाच्या वेळी आम्ही आमच्या ग्राहकांच्या दूचाकी व चारचाकी पार्किंगसाठी पुरेपूर योग्य सोय केली असल्याची माहिती पारस यांनी दिली.मूळात पहाटे ६ वाजता दागिन्यांच्या इतिहासात दागिने विक्रीची सुरवात होत आहे,असे पहले कधीच घडले नाही त्यात ही आम्ही या दिवशी ग्राहकांवर सवलतीची लयलृट करणार आहोत.

सकाळी ६ वा.येणा-या ग्राहकांना सोन्या-चांदीच्या दागिन्यांची घडण मूल्य(मेकिंग चार्ज)वर तब्बल ६० टक्के सवलत मिळणार आहे.प्रत्येक तासागणिक ही सवलत मात्र ५ टक्क्यांनी कमी होत जाणार आहे.याचा अर्थ पहाटे सहा ते सात वाजता दरम्यान दागिन्यांच्या घडण मूल्यावर  ६० टक्क्यांची सवलत ग्राहकांना मिळणार आहे व शेवटी दर तासाला ५ टक्क्यांनी ती कमी होत जाईल व शेवटी ३० टक्क्यांची सवलत ग्राहकांना मिळू शकणार आहे.३० टक्के सवलतीवर हा दर २६ सप्टेंबर रोजी स्थिर राहील.हि-यांच्या दागिन्यांच्या घडण मूल्यावर संपूर्ण दिवस संपूर्ण सूट राहील तर उद् घाटनाच्या दिवशी गोल्ड सेव्हिंग प्लान सुरु करणा-या ग्राहकांना पहिल्या हप्त्यावर २५ टक्के सवलत मिळेल,अशी माहिती पारस रोकडे यांनी दिली.‘जितना जल्दी आओगे,उतना ज्यादा पाओगे’असे आवाहन रोकडे कुटूंबियांनी केली.
गेल्या पंचवीस वर्षात ग्राहकांची डिमांड बघत या शोरुमचे तीन ते चार वेळा अंतर्गत बांधकाम करण्यात आले.मात्र,यावेळी ‘महालात ‘महाल’सारखे शोरुम बांधण्यात आले असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.या भव्य शोरुमला हेरिटेज डिझाईने सजविण्यात आले असल्याची माहिती ते देतात.सर्वात जुन्या बाजारपेठेत सर्वात देखणे शोरुम रोकडे ज्वेलर्सचे असल्याचे ते सांगतात.पारसने २६ तारखेच्या उद् घाटन व विविध दागिन्यांवरील विशेष सवलतींची माहिती दिली आहे मात्र,पहाटे सहा ते सात वाजता दरम्यान शोरुमच्या आत आलेल्या ग्राहकांमध्ये गोंधळ उडू नये म्हणून पहाटे ६ ते ७ दरम्यान शोरुमच्या आत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सहीनिशी एक टोकन दिले जाईल.त्यामुळे ग्राहक अगदी निश्‍चिंत होऊन आपल्या पसंदीचा दागिना कितीही वेळाने खरेदी करु शकतो.त्या एका तासातच ग्राहकाने दागिना विकत घ्यावा,अशी अट नाही,असे राजेश रोकडे यांनी सांगितले.टोकनमुळे ते ६० टक्के दागिन्यांच्या घडण मूल्यावर सूटचे हकदार राहतील.सकाळी ७ वा.नंतर येणा-या ग्राहकांना देखील असेच ५५ टक्के सूटचे टोकल दिले जातील.ही सूट फक्त महाल बडकस चौकातील शोरुममध्येच ग्राहकांना मिळणार आहे,इतर शाखेमध्ये नाही,अशी माहिती त्यांनी दिली.

गर्दीमुळे ग्राहकांची तारांबळ उडू नये,यासाठी टोकनची सोय केली असल्याचे राजेश रोकडे सांगतात.रात्रीपर्यंत ३० टक्क्यांची सूट कायम राहील.गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांनी रोकडे ज्वेलर्सवर दाखवलेला विश्‍वास , निष्ठा,गुणवत्ता व सेवेचा नवा अध्याय येत्या २६ सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.
महाल येथील शोरुम पूर्वीच्या तुलनेत आता खूप भव्य झाले आहे.अधिक जागेत ते विस्तारले गेले आहे.महत्वाचे म्हणजे शोरुम बंद न करता रात्रंदिवस बांधकाम चालले आहे.परिणामी,आमचे व्यवस्थापक,कर्मचारी यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहे.शोरुममध्ये मौल्यवान दागिने असल्याने व्यवस्थापक तसेच इतर पदाधिकारी यांनी रात्री देखील शोरुममध्ये थांबून बांधकामादरम्यान चोख सुरक्षा राखली आहे.आम्ही बांधकामादरम्यान एक ही दिवस शोरुम बंद ठेवले नाही त्यामुळे ग्राहकी सुरु असलेल्या शोरुमध्ये बांधकामाचे साहित्य सतत आणने,नेणे सुरु असणे हे खूप परिश्रमाचे काम होते.’या सर्वांच्या अथक परिश्रमातून आणि प्रामाणिकेतूनच महालात ‘महल’सारखे दागिन्यांचे शोरुम साकारले गेले असल्याचे ते म्हणाले.
येत्या नवरात्री पासून दसरा-दिवाळी,लग्नसराईसाठी ग्राहकांसाठी सुवर्ण संधी रोकडे ज्वेलर्समधून दागिने खरेदीसाठी असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.संपूर्ण शोरुममधील दागिन्यांवर घडण मूल्यात सूट दिली जाणे ही ‘यूनिक ऑफर’ असल्याचे ते सांगतात.ग्राहक २६ सप्टेंबर पूर्वी देखील आवडीचे दागिने पसंद करुन जाऊ शकतात,अशी माहिती त्यांनी दिली.अशी संधी पुन्हा पुढील पंचवीस वर्षात ग्राहकांना मिळण्यासाठी पुढील पंचवीस वर्षांची वाट बघावी लागेल,अशी मिश्‍किली त्यांनी केली.
लहानशा शोरुमचे भव्य शोरुममध्ये परिवर्तन झालेले बघून अत्यधिक आंनद होत असल्याचे अनामिका रोकडे म्हणाल्या.या शोरुमध्ये डायमंड,सिल्वर,गोल्ड,प्लॅटिममचे अतिशय आकर्षक तसेच वेगवेगळ्या डिझाईन्सचे दागिने ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे अनामिका रोकडे म्हणाल्या.३५० ग्रामपासून तर अगदी २००-३०० ग्रामपर्यंतचे आकर्षक मंगळसूत्र खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण रोकडे ज्वेलर्स असल्याचे त्या सांगतात,आजच्या तरुण युवा पिढीला हलके-फूलके व कमी वजनाची मंगळसूत्रे आवडतात.त्यांच्या पसंदीचे संपूर्ण भान रोकडे ज्वेलर्सने ठेवले आहे.याशिवाय विविध डिझाईन्सचे कानातले टॉप्स,बांगड्या,नॅकलेस,प्लेटिनम,डायमंड,पुरुषांच्या आवडीचे जाड रुंदीचे सोन्याचे ब्रासलेट,अंगठ्या,लहान मुलांच्या सोने व प्लॅटिनमच्या मनगट्या इत्यादी अश्‍या विविध व्हेरायटीचे दागिने शोरुममधील विविध मजल्यांवर विविध भागात ग्राहाकांना सहज उपलब्ध आहेत.कोणतीही गर्दी तसेच घाई न करता रोकडे ज्वेलर्सकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा खरेदीनंतर मनात पूर्ण समाधान घेऊन जातो,हीच आमच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली असल्याचे अनामिका रोकडे सांगतात.

आमच्याकडील भरपूर स्टाफ आणि भरपूर व्हेरायटी हे देखील यशाचे गमक असल्याचे पारस रोकडे सांगतात.आमच्या यशामागे वडील भैय्याजी रोकडे व आई वंदना रोकडे यांचे योगदान खूप मोठे असल्याचे राजेश रोकडे सांगतात.आमची आई वंदना रोकडे या आज ७८ वर्षांच्या आहे मात्र,आज देखील त्या तितक्याच उत्साहाने शोरुम मधील जुन्या सोन्याचे दागिने बघणे,हिशेब ठेवणे यासारखे काम करतात असे राजेश रोकडे यांनी सांगितले.याप्रसंगी भैय्याजी रोकडे यांनी ग्राहकांनी मोठ्या संख्येने २६ सप्टेंबरच्या ऑफरचा लाभ मिळवावा असे आवाहन केले.वंदना रोकडे यांनी मला महाल येथील शोरुम सर्वाधिक प्रिय असल्याचे सांगितले.माझ्यासाठी ६०० चौ.फूटांच्या शोरुमवरील जिव्हाळा अद्यापही कायम आहे,दोन्ही मुलांनी व नातवंडाने त्यांच्या परिश्रमांने ते ६ हजार चौ.फूटांचे केले याचा अभिमान वाटतो,मुलांनी अशीच प्रगती व्यवसायामध्ये कायम ठेवावी व यापेक्षाही मोठे यश गाठावे,असा आर्शिवाद त्यांनी याप्रसंगी दिला.
रोकडे ज्वेलर्स हा आता विदर्भात एक ब्रॅण्ड झाला आहे,या मागे किती संघर्ष होता?असा प्रश्‍न केला असता,संघर्षाशिवाय कधीही यश मिळत नसल्याचे राजेश रोकडे म्हणाले.सुरवातीला आपल्या ग्राहकांसाठी पार्किंगसाठी घेतलेली ६०० चौ.फूटांची जागा,मग या जागेचं कळलेलं महत्व,उघडलेले लहानसे शोरुम,आमची तुलना बाहेरच्या ज्वेलर्सशी करण्यात येईल अशी भीती मात्र,महालकरांनी आम्हाला परकेपणाची जाणीव न होऊ देता,सहज आपलेसे केले.याचे उदाहरण पारस रोकडे ही पाचवी पिढी देखील दागिन्यांच्या या व्यवसायात यश मिळवती झाली,असे राजेश रोकडे सांगतात.
सोन्याचा दर सव्वा लाखांपर्यंत पोहोचला आहे,याकडे लक्ष वेधले असता,सोन्याचा वाढता दर हीच तर सोन्याची खरी विशेषता आहे,असे राजेश रोकडे सांगतात.३५ वर्षांपूर्वी साेन्याचा दर साढे चार हजार रुपये प्रति तोळा होता मात्र,त्यावेळी देखील त्या काळातील पिढीला तो सर्वात जास्त दर वाटत होता.येत्या काळात सोनं आणखी महाग होईल तरी देखील ग्राहक ते खरेदी करीतच राहणार.गेल्या वर्षी ४०० टन सोने आयात झाले होते,आता ते ५०० टन झाले आहे.भारतात ८१२ टन सोने आयात करण्यात आले.तरी देखील सोने विक्रीमध्ये यंदा १७ टक्क्यांची तुट उद्भवली आहे मात्र,येत्या सणासुदीच्या काळात सोने खरेदीची ही तुट भरुन निघेल,अशी आशा राजेश रोकडे व्यक्त करतात.राखी पासूनच ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे वळतो.नाटो सारखी इस्लामिक देशांनी केलेली संधी,जगात वाढलेली अस्थिरता,अमेरिकेने लादलेले अवास्तव टेरिफ,भारत देशाची ’नही झूकेंगे’ची भूमिका,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार,भारताच्या ३३ टक्के निर्यातीवर आलेले संकट,भारत,चाईना,रशिया यांची व्यापार संधी या सर्व घटनांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असतो,असे राजेश रोकडे यांनी सांगितले.
घडण मूल्यावर फक्त एकच दिवस ऑफर का ठेवली?असा प्रश्‍न केला असता,सोन्याच्या बाजारपेठेतील इतरांवर परिणाम होऊ नये यासाठी सकाळी ६ वाजताची वेळ निवडली असल्याचे राजेश रोकडे सांगतात.सकाळी ६ वा.सोन्याची दूकाने बंद असतात,त्यावेळी इतर सोने दूकानदारांचे नुकसान होऊ नये म्हणून एकच दिवस व पहाटे ६ ची वेळ निवडली असल्याचे ते म्हणाले.
भारतात अद्याप ९ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची बाजारपेठ का नाही?असा प्रश्‍न केला असता,भारतात ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅर्ण्डची अद्याप ९ कॅरेटच्या सोन्याची परवानगी नाही.आम्ही देखील १६,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दागिने घडवतो.रोकडे ज्वेलर्सचा टर्नओव्हर वार्षिक ६७२ कोटी असून आम्ही आमचेच रेकॉर्ड तोडत असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.
तुम्ही सुवर्ण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात,तुमच्या ६७२ कोटींच्या टर्नओव्हरसारखेच संघटनेतील इतर सुवर्णकार यांच्या प्रगतीची दारे उघडण्यासाठी कोणती धोरण अवलंबिता?असा प्रश्‍न केला असता,मी आठ महिन्यांपूर्वी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो.सर्वात आधी कलम ४११ अन्वये सुवर्णकारांवर होणारी वारंवार कारवाई या संदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी बोललो.अनेक सुवर्णकार तुरुंगात गेले,काहींवर आत्महत्या करण्याची वेळ आली.परिणामी,वाघ यांच्या पुढाकारातून ३६ जिल्ह्यांसाठी विजिलेंस कमेटीची स्थापना करण्याचा निर्णय झाला आहे.गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी देखील या कमेटीची माहिती दिली असून येत्या दोन-तीन दिवसात यासंबधी नोटीस निघणार असून त्यात कमेटीतील सदस्यांची नावे घोषित होतील,असे राजेश रोकडे म्हणाले.याशिवाय सुवर्ण व क्लस्टर संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत देखील चर्चा झाली.चार क्लस्टर सुरवातीला नेमण्यात आले.नागपूर,पुणे,नाशिक व कोल्हापूर.सुवर्णकारांविरोधातील कलम ४११,३१७ या विरोधातील प्रयत्ने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशभर राबविणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय फंड मॅनेजमेंट,स्टॉक आणि स्टाफ मॅनेजमेंट असे तीन प्रश्‍न असतात.बँकिंग कशी करायची याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी म्हणतात,माझ्याकडे खूप पैसा आहे,तुम्ही फक्त योजना आणा,आमच्या सुवर्णकारांच्या क्षेत्रात देखील हीच बाब लागू होते.बँकेकडे खूप पैसा असतो,तो व्यवसायात कसा उपयोगी आणायचा,चांगली फाईल,चांगली योजना बँकेला कशी सादर करायची याचे मार्गदर्शन करीत असल्याचे राजेश रोकडे म्हणाले.स्टॉक काम करीत आहेत तर स्टॉफ हा पूर्वी ५ टक्के संगठीत होता आता तो ३५ ते ४० टक्के संघटित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले.सुवर्णकार संघाचा अध्यक्ष असल्यामुळेच ’जियो और जिने दो’ची कृती करीत असल्याचे ते म्हणाले.दागिन्यांवरील घडण मूल्यांवरील सूट त्यामुळेच केवळ एका दिवसासाठी ठेवली आहे,जेणेकरुन इतर सुवर्णकारांचे नुकसान होऊ नये.
चांदीवर सुवर्णसारखे हॉलमार्क का नाही?या प्रश्‍नावर बोलताना,भविष्यात चांदीवर देखील हॉलमार्कचे धोरण येऊ शकतं.ज्वेलरी इंडस्ट्रीने याचे स्वागतच केले आहे.भारतात २३० केंद्र हे सुवर्णची असून तीन हजार केंद्रे चांदी धातूची आहे.भारतात एका वर्षात सोने १ हजार टन आयात होतं तर चांदी ७ हजार टन आयोत होते.केंद्र सरकारने याबाबत निश्‍चितच धोरण ठरवावे.हा एकमेव असा व्यवसाय आहे जो पारदर्शितेवर चालत असतो,असे राजेश रोकडे सांगतात.ग्राहक जितक्या पैशात दागिना विकत घेतो त्यापेक्षा किती तरी जास्त रकम तो दागिना विकल्यानंतर त्याला मिळत असतो कारण,सोन्याचे  दर हे नेहमीच चढत्या क्रमावर असतात.
‘कॅरेटोमीटर’विषयी प्रश्‍न केला असता,सुवर्णकारांनी कॅरेटोमीटर ठेवायला हवा,आपण दूध विकत नाही तर सुवर्ण विकतो,ग्राहकांना दागिन्याची शुद्धता जाणून घेण्याचा हक्क आहे.कार विकत नका घेऊ मात्र,कॅरेटोमीटर विकत घ्या,असे आवाहन राजेश रोकडे सुवर्णकारांना करतात.यातून विश्‍वासहर्ता व त्यातून व्यवसाय वाढेल,असे ते सांगतात.
लवकरच रोकडे ज्वेलर्सची ई-कॉमर्स वेबसाईट-पारस रोकडे
रोकडे ज्वेलर्सची लवकरच ई-कॉमर्सची वेबसाईट सुरु होणार असल्याचे पारस रोकडे यांनी सांगितले.या पोर्टलमुळे ऑन लाईन खरेदीला वाव मिळेल.येत्या जानेवरीपासून रोकडे ज्वेलर्सची वेबसाईट लॉन्च करण्याचा प्रयत्न असून नव्या पिढीला अनुलक्षून दागिने डिझाईन केले जात असल्याचे ते म्हणाले.आजची नवीन तरुण पिढी ही हलक्या वजनाच्या दागिन्यांना पसंदी देते.त्यांना असे दागिने आवडतात जे दिवसा पण घालू शकतात व रात्री पार्टीला देखील घालता येईल.पूर्वी प्रोडक्ट विकल्या जात असे आताचा काळ डिझाईन्सचा असल्याचे पारस सांगतात.अगदी लहान मंगळसूत्र,हॅण्ड मंगलसूत्र ही त्याचीच उदाहरणे आहेत.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………………

 

Latest बातम्या