


नागपूर, ता. ७ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत ५ जुलैपासून सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिक मोठ्या संख्येने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत.
शिबिरांमध्ये विविध आजारांच्या तपासण्या, आवश्यक स्कॅनिंग, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाआरोग्य शिबिराअंतर्गत १५ जुलैपर्यंत विविध ठिकाणी स्कॅनिंग कॅम्प सुरू राहणार आहेत. ८ जुलै रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील समाजभवन, बुद्धविहार (गुजरवाडी), बालाजी सभागृह (सुयोग नगर), रेणुका मंदिर (रेणुका नगर, टाकळी सीम) आणि कांजी हाऊस (सोमलवाडा) तसेच पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील दुर्गा माता मंदिर (छावणी), संत गाडगे महाराज कम्युनिटी हॉल (मानकापूर) आणि हनुमान मंदिर (गोकुळपेठ) येथे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी, सह संयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे, रितेश पांडे यांनी केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा