
जम्मू आंनद यांच्या नेतृत्वात ’न्याय’ मागण्यांसाठी मनपा आरोग्य केंद्रातील परिचारिकांचे आंदोलन
नागपूर,ता.९ सप्टेंबर: महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत मानधन तत्वावरील परिचारिका व इतर कर्मचा-यांनी बुधवारी ता. ९ सप्टेंबर रोजी मनपा मुख्यालयात नवनियुक्त मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या कक्ष्ा समोरील दालनात आंदोलन पुकारले.परिणामी कर्मचा-यांनी केलेल्या या आंदोलनामुळे या सर्व केंद्रातील करोना चाचणी ही संपूर्ण एक दिवस खंडीत झाली.
दुपारपर्यंत हे आंदोलन सुरु होते.त्यामुळे बुधवारी चाचणीचा आकडा हा अर्ध्यावर आला.या सर्व केंद्रांवर अँटीजनसह आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येते.शहरातील मनपाच्या नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात मानधन तत्वावरील परिचारिका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,फार्मासिस्ट व इतर कर्मचारी कार्यरत आहेत.सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत हे सर्व अस्थायी कर्मचारी काम करीत असतात.महत्वाचे म्हणजे यातील ४० जणांना करोनाची लागण झाली आहे!त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेतला.

चाचणी केंद्रात काम करताना काही सुविधा मिळाव्यात,अशी मागणी या कर्मचा-यांनी पुढे केली होती.मात्र,त्याकडे दुलर्क्ष् करण्यात आले.अखेर या कर्मचा-यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली.या आंदोलनामुळे कोविड काळात चाचणी केंद्रातील व्यवस्थाच कोलमडून पडली.
मनपाच्या या सर्व केंद्रांवर दरदिवशी १,४०० ते १,५०० च्या जवळपास चाचण्या होतात.बुधवारी हा आकडा ७५० पर्यंत घसरला.नागपूरकर नागरिक हे मनपाच्या अारोग्य केंद्रांवर जाऊन करोनाची अँटीजन चाचणी करुन घेत असतात.मात्र,बुधवारी अनेकांना आल्यापावली परत जावे लागले.
‘
‘हमसे बात करो’,‘हमे भी समझो’,‘हमारी भी सुनो‘,‘हम बंधुआ मजदूर नही है‘,‘हमारी भी जिंदगी किमती है’,अशी मार्मिक विधाने असणारी फलके घेऊन परिचारिका, महानगरपालिकेतील आंदोलन स्थळी बसल्या होत्या. गेल्या ५ महिन्यांपासून करोना महामारीचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाने संपूर्ण जवाबदारी अस्थाई आरोग्य परिचारिकांच्या खांद्यांवर सोपवून मोकळे झाल्याचा आरोप परिचारिकांनी केला तर दुसरीकडे मनपाच्या ५० च्या वर इतर दवाखान्यांना तसेच त्यात कार्यरत स्थायी कर्मचा-यांना करोनाच्या जवाबदारीपासून मुक्त ठेवण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणने होते.या भेदभावाविरोधात आंदोलनकर्त्यांनी आज आपला आवाज बुलंद केला.संघटनेचे अध्यक्ष् जम्मू आनंद यांच्या नेतृत्वात त्यांनी हे आंदोलन पुकारले.

नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी आंदोलनकर्त्यांची मागणी समजून घेण्यासाठी संघटनेतील सदस्यांसोबत सखोल चर्चा केली. जम्मू आनंद यांनी अस्थायी कर्मचा-यांना विद्यमान मानधनाशिवाय करोना काळात दर महिन्याला प्रोत्साहनपर भत्ता देण्याची मागणी केली. अारोग्य कर्मचा-यांच्या आरोग्यासाठी त्यांना चहा,नाश्ता तसेच दुपारचे पौष्टिक अन्न पुरविण्यात यावे.मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर एक लिपिक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञाची नियुक्ती करण्यात यावी,सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सॅनिटायझरचे बूथ उपलब्ध करावे तसेच गेल्या काही दिवसात जे ४० आरोग्यकर्मी हे करोनाने बाधित झाले त्यांना उपचारावर स्वत:चा अमाप पैसा खर्च करावा लागला,तो मोबदला मनपा प्रशासनाने त्यांना परत करावा.
याशिवाय नागपूर महानगरपालिकेवरच शहरातील नागरिकांना प्राथमिक अारोग्याच्या सेवा पुरविण्याची संवैधानिक जवाबदारी आहे.मात्र मनपातर्फे संचालित सर्व दवाखाने मिळून जवळपास ४०० जागा रिक्त आहेत,या रिक्त जागा मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्थायी कर्मचारीद्वारे भरण्यात यावी.
यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या काळजीपूर्वक समजून घेतल्या तसेच त्यांच्यास्तरावर प्रयत्न करुन आंदोलनकर्त्यांच्या समस्या या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले.याप्रसंगी त्यांनी जे ४० अस्थायी कर्मचारी करोनाने बाधित झाले त्यांच्या खर्चाचे भुगतान करण्याचे आदेश अधिका-यांना दिले.प्रत्येक प्राथमिक अारोग्य केंद्रावर सेनिटायझरचे बूथ लावण्यात येतील तसेच प्रशासनाला आदेश देत मौखिक आदेशांवरुन काम करवून घेऊ नका असे निर्देश दिले.प्रत्येक आदेश हा लिखित स्वरुपात दिला जावा.या पुढे या आरोग्य कर्मचा-यांना ज्या काही समस्या असतील त्यांनी त्या समस्या आयुक्तांकडे मांडाव्या,जेवढे संभव होईल त्या समस्या दूर केल्या जातील असे आयुक्त म्हणाले.

राज्यभरात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पुढाकारातून १ सप्टेंबर पासून विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली जात आहे. ८ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मेडिकल परिसरात झालेल्या द्वारसभेत यापूर्वीच देण्यात आला होता.परिचारिकांची रिक्त पदे भरावीत,पदोन्नती व पदभरती राबविण्यात यावी,कोव्हिड कक्ष्ात रोटेशनप्रमाणे परिचारिकांना ७ दिवस विलगीकरणाची मुभा द्यावी,परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे जोखिम भत्ता नव्याने मंजूर करावा,परिचारिकांना फक्त रुग्णसेवेचीच कामे द्यावी,ग्रामीण रुग्णालयस्तरावर मासिक अहवाल,डाटा एन्ट्री यासारख्या कारकुनी कामांमधून वगळावे,ससून अधिपरिचारिकेचे निलंबन मागे घ्यावे,अश्या मागण्या मेडीकल परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या.
आंदोलनात प्रामुख्याने अर्चना मंगरुलकर,कुंदा कोहाड,ममता कावले, कल्पना इखार, कल्पना फोफरे,मालती भगत,मोहनी गुलाक्ष्ाने,नीता वनवे,प्राची घोडे,प्रिया,राखी पाटील,राेशनी बरमकर,शीला पाटील,शिल्पा उलकुटकर,सोनाली खंडहार,सुमित्रा घोडघासे,वैशाली मेश्राम,वर्षा कालवे,शिखा बैसारे,ओम्कारी तांदुलकर,कविता माने,रोहित,प्रिया मेश्राम,अंकिता वरडे,क्ष्प्रिा नगरारे आदी यांच्याशिवाय मोठ्या प्रमाणात परिचारिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
……….

आमचे चॅनल subscribe करा