Homeनागपूर न्यूजमनपा केन्द्रांमध्ये ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी गुरुवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

मनपा केन्द्रांमध्ये ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी गुरुवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

नागपूर, ता. ७ : शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे फक्त ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर गुरुवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. केन्द्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हीशिल्डचा पहिला डोज १२ आठवड्यापूर्वी घेतला होता त्यांना दुसरा डोज देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.

१८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

तसेच ज्या वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोज दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल.

Advertisements

Latest बातम्या