Homeनागपूर न्यूजमनपातच रंगला कर्मचा-यांच्या कोविड चाचणीचा घोळ!

मनपातच रंगला कर्मचा-यांच्या कोविड चाचणीचा घोळ!

नागपूर,ता. १० ऑगस्ट: सध्या संपूर्ण शहरात घरोघरी एकच चर्चा आहे ती म्हणजे ‘कोरोना’ आणि एकच धास्ती आहे ती म्हणजे ‘करोना चाचणीचा अहवाल!’अश्‍यातच आज महानगरपालिकेतर्फे मनपाच्या पाचव्या मजल्यावर मनपा कर्मचा-यांची कोविड-१९ ची चाचणी घेण्यासाठी सदर येथील मनपाच्या युपीएससीचे लॅब टेक्शनीशियन हे, पीपीई किट घालून दूपारी १ वा.सज्ज झाले मात्र माध्यमांना ही माहिती मिळाल्यामुळे त्वरीत तेथील चाचणी कार्यक्रम रद्द करुन मनपाच्या जुन्या इमारतीतच घेण्याचे कर्मचा-यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे.

कोविड-१९ ची चाचणी मनपाच्या मुख्यालयात किवा एखाद्या इमारतीत कशी होऊ शकते जेव्हा की मनपाचा सदरचा युपीएससीचा दवाखाना मनपापासून केवळ अर्धा किलोमीटर दूर आहे.त्यात या दवाखान्यातील तज्ज्ञ हे मुख्यालयाच्या पाचव्या मजल्यावर पीपीई किट घालून आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई तसेच सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्या नेतृत्वाखाली सज्जही झाले होते मात्र माशी कुठे शिंकली माहिती नाही आणि तेथे जमलेल्या महिला,लहान मुले यांना परत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.

मनपा कर्मचा-यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची ही स्वॅब टेस्ट होणार होती असे सांगितले जाते मात्र मनपाच्या मुख्यालयात जिथे आधीच करोना पॉझिटीव्ह आढळून येत असताना तिथे कर्मचा-यांचे कुटुंबिय,महिला व लहान मुले बोलावणे योग्य होते का?असा सवाल आता उपस्थित केल्या जात आहे.मनपाचा आरोग्य विभाग आपल्याच कर्मचा-यांच्या कोविड चाचणीप्रति किती गंभीर आहे,हे यावरुन सिद्ध होतं.
आरोग्य विभागाचे सहायक अधिक्ष् क यांनी मनपाच्या मुख्यालयातील पाचव्या मजल्यावरील कोविड चाचणी रद्द करुन मनपाच्या जुन्या इमारातीत साफ-सफाई झाल्यावर ही चाचणी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. मात्र असे असले तरी सदर येथील युपीएससीचे लॅब टेक्नीशियन यांनी पीपीई किट घालून पाचव्या माळ्यावर जी तत्परता दाखवली त्याचे गौडबंगाल मात्र कर्मचा-यांनाही आज शेवटपर्यंत सोडवता आले नाही.

Latest बातम्या