Homeनागपूर न्यूजमनपाचा रुग्णालय झाला कुंटणखाना!

मनपाचा रुग्णालय झाला कुंटणखाना!

दयाशंकर तिवारी यांचा सभागृहात धक्कादायक आरोप:डॉ.गंटावार यांचे पितळ उघडे

नागपूर,ता. २५ जून: गांधी नगर येथील महानगरपालिकेचा इंदिरा गांधी रुग्णालयात माजी आरोग्य अधिक्ष् क डॉ.प्रधान यांनी त्यांच्या केबिनच्या मागील छोट्याश्‍या खोलीत डबा खाण्यासाठी एक लहानसे टेबल व खूर्ची टाकली होती.मात्र मनपाचे सहायक वैद्यकी अधिकारी डॉ.गंटावार हे येथील प्रमुख बनताच त्यांनी ते खूर्ची-टेबल हटवून त्या ठिकाणी पलंग टाकला आणि यानंतरचे त्यांचे ‘कारनामे’हे सभागृहात उघडपणे सांगण्यासारखे नाहीत,असा घणाघातील आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात केला.

आयुक्त तुकराम मुंढे हे देखील हा प्रकार ऐकून थक्क झाले.विशेष म्हणजे काँग्रेसच्या नितीन साठवणेशिवसेनच्या मंगला गवरे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर आज तिस-या दिवशी देखील सभागृहात चर्चा सुरु होती. आज तिस-या दिवशी दयाशंकर तिवारी यांनी चर्चेत सहभाग नोंदवताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकंदरित कार्यशैलीची चे धिंडवडे काढताना आयुक्त कश्‍या प्रकारची चमू घेऊन शहरात कोविड-१९चा मुकाबला करीत आहे, हे सांगताना त्यांनी मनपाच्या आरोग्य विभागातील सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्यावर जी अतिशय महत्वपूर्ण जवाबदारी साेपवली आहे,त्या व्यक्तिची ‘ चाल आणि चारित्र्य’कसे आहे?हे सांगताना त्यांनी वरील धक्कादायक उलगडा केला.

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील एका परिचारिकेने या विषयी उलगडा केला असून रात्री-अपरात्री त्या खोलीत काय कारनामे होतात,याचा पुरावा तेथील एका परिचारिकेनेच दिला. याची ऑडीयो क्लीप ऐकायची झाल्यास,ती फक्त महापौरांच्या कक्षातच ऐकवली जाऊ शकते. आयुक्तांनी महापौरांच्या कक्षात एकदाच भेट दिली मात्र,डॉ.गंटावार यांनी मनपा रुग्णालयाचाच जो ‘कुंटणखाना’केला आहे,‘रात्रीस खेळ चाले’ किस्से ऐकायचे झाल्यास,आयुक्तांना महापौरांच्या कक्षातच भेट द्यावी लागेल,असे ते म्हणाले.

या परिचारिकेने ती ऑडीयो क्लिीप ऐकवली मात्र देण्यास नकार दिला कारण हा तिच्या नोकरीचा सवाल होता.याच गंटावार यांना माननीय आयुक्तांनी चक्क . एवढेच नव्हे तर डॉ.गंटावा र यांच्या सुविज्ञ पत्नी डॉ. शीलू चिमुरकर गंटावार या स्वत: मनपाच्या त्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असताना मध्यप्रदेश्‍चा बैतूल येथून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी रुग्णालय सोडून प्रचार,रॅलीत व्यस्त होत्या. सरकारी नोकरीवर असणा-याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावात राहू नये,असा कायद्या असताना डॉ.शीलू या रुग्ण आणि रुग्णालय वा-यावर सोडून बैतूल येथे व्यस्त होत्या. तत्कालीन मुख्य आरोग्य विभाग प्रमुख डॉ.चिव्हाणे यांनी डॉ.शीलूला १५ मे २०१९ रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवली,यात त्यांच्या रुग्णालयातील उपस्थितीबाबत एप्रिल २००० पासूनच गैरहजर राहण्याचे निर्दशनास येऊन त्यांच्या हजेरी पुस्तिकेवर डॉ.गंटावार यांच्या स्वाक्ष्-या असल्याचा आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला.

दयाशंकर तिवारी यांच्या विनंतीवर ही नोटीस निगम सचिवाला महापौरांनी वाचून दाखवायाल सांगितली. विशेष म्हणजे डॉ.गंटावार यांना गेल्या अनेक महिन्यांपासून दयाशंकर तिवारी हे आरोग्य अधिका-याच्या मार्फत इंदिरा गांधी रुग्णालयातील हजेरी पुस्तिकेची मागणी करीत असताना,किल्ली नसल्याचे सबब सांगून ही पुस्तिका मला देण्यात आली नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात सांगितले. महापौरांनी आयुक्तांना निर्देश देऊन लवकरात लवकर ती हजेरी पुस्तिका आयुक्तांनी आपल्या ताब्यात घेण्याचे निर्देश द्यावे,अशी मागणी तिवारी यांनी केली.

डॉ.शीलू या समता सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी चिमूरकर यांच्या कन्या आहेत. मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात डॉ.शीलू पंदराम नावाने प्रचारात सहभागी झाल्या होत्या. मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष् राहूल गांधी यांच्या प्रचार रॅलीचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ.शीलू यांनी केले. एकीकडे मनपाकडून आपल्या पदाचा एक ते सव्वा लाख रुपये पगार दरमहा घेत असताना त्या सरकारी नोकर असताना रुग्ण व रुग्णालयाप्रति कोणतेही कर्तव्य न बजावता राजकीय पक्षाच्या नेत्री म्हणून मध्य प्रदेशात कार्यरत होत्या. यावेळी दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या सरकारी नोकरदारांना राजकीय पक्षाविषयीचे संबंध किवा घेण्यात येणारे लाभ यावरचे नियम वाचून दाखवण्याची विनंती महापौरांना केली.

महापौरांनी ते निगम सचिव डॉ.रंजना लाडे यांना वाचण्यास सांगितले. दयाशंकर तिवारी यांनी हिरव्या रंगाने अधोरेखित केलेली ओळच फक्त वाचा असे सूचित केले असता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तो कागद आपल्या हातात घेऊन स्वत:चाळला.याप्रसंगी तिवारी यांनी डॉ.शीलू चिमूरकर-गंटावार उर्फ डॉ.शीलू पंधराम यांच्या विरोधातले सर्व पुरावे महापौरांच्या स्वाधीन केले.

अश्‍या ‘चारित्र्यवान’आणि भ्रष्टाचारी, डॉ.गंटावार यांनाच शिस्तबद्ध,कर्तव्यदक्ष् आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोविड-१९च्या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी मनपाच्या ‘डेथ ऑडिट कमेटी’चा प्रमुख बनवले.हे सर्जरीमध्ये एम.डी असून या पदासाठी शासनाच्या नियमानुसार मेडीसीन किवा फॉर्माचाच अधिकारी लागतो.मुंढे यांनी त्यांच्या ‘पॅटर्न’नुसार नवी प्रयोग नागपूरच्या मनपात राबविला असल्याचा टोला तिवारी यांनी हाणला.या ‘प्रति मुंढे ’यांनी मेयो,मेडीकलच्या कोविड वॉर्डात विना परवानगी प्रवेश केला असता,या दोन्ही रुग्णालयांच्या अधिष्ठांनी याविषयीची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली. याच गंटावार यांनी मनपातील परिचारिकांना मनपा मुख्यालयात आणले तर येथील क्लार्क लोकांना विलगीकरण केंद्रात सेवेवर पाठवले

याच डॉ.गंटावार यांचे धंतोलीसारख्या प्रसिद्ध भागात प्रशस्त असे ‘कोलंबिया’रुग्णालय आहे.या रुग्णालयाची नोंदणी कोणाच्या नावाने आहे,याची देखील चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी महापौरांना केली.गंटावार यांना देखील मोठया मुंढे सारखी फेसबूकची सवय आहे.आपल्या अनेक गोष्टी ते फेसबूकवर शेअर करतात,त्यावर देखील महापौरांनी नजर मारली पाहीजे,असे तिवारी म्हणाले.
दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मदन थूल यांनी आयुक्तांना फेब्रुवारी महिन्यातच डॉ.गंटावार यांच्या विरोधातील बरेच पुरावे सादर केले होते.तरी देखील कर्तव्यदक्ष् आयुक्तांनी कोविड-१९च्या विरोधात लढण्यासाठी अश्‍याच चारित्र्यवान माणसाची निवड करुन त्याला मुख्य पदी बसवले.

आयुक्त काँग्रेसच्या दडपणात!
डॉ.शीलू चिमूरकर-गंटावार या काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. राज्यात सध्या महाविकासआघाडीचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस पक्षाचे पाठबळ हे सरकार चालवण्यासाठी अपरिहार्य आहे. परिणामी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर देखील काँग्रेस पक्ष्ाच्या मोठ्या राजकीय नेत्यांचे दडपण असण्याची शक्यता आहे,हे त्यांनी सभागृहाला सांगावे,अशी विनंती तिवारी यांनी केली.

सभागृहात उमटला डॉ.गंटावारला सदनातून बहीष्कृत करण्याचा आवाज-
दयाशंकर तिवारी यांनी मध्य प्रदेशाच्या भैसेदेही येथून काँग्रेस पक्ष्ाचे तिकीट मागणा-या डॉ.शीलू चिमूरकर-गंटावार यांना नियमबाह्य कारभारसाठी तात्काळ निलंबनाची मागणी करताच सभागृहातून  एका नगरसेवकाने सदनात मंचावर डॉ.गंटावर हे देखील उपस्थित असतील तर त्यांची देखील येथून तात्काळ हकालपट्टी करावी व त्यांच्या पत्नीसोबतच त्यांचे देखील निलंबन करावे,अशी मागणी केली.

डॉ.गंटावारला तर नागपूरातील पोलीस महकमा देखील घाबरतो,असे तिवारी यांनी सभागृहाला सांगितले. नगरसेवकावर मुंढे यांनी एफआयदार दाखल करण्यास जशी तत्परता दाखवली तशीच तत्परता आता मुंढे हे डॉ.गंटावार पती-पत्नीवर, मनपाची फसवणूक करण्यासंबधी दाखवतील का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.मनपाच्या पैश्‍यांची ज्या प्रकारे उधळपट्टी करण्यात आली तो जनतेचा कष्टाचा पैसा दुपटीने वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.

विशेष म्हणजे दयाशंकर तिवारी यांनी आजच्या आपल्या प्रदीर्घ साढे तीन तासांच्या भाषणात गंटावारचा विषय काढताच,आयुक्त जागेवरुन उठून आत गेले.यावर तिवारी यांनी गंटावार यांचा विषय एवढा महत्वाचा आहे की मला आयुक्त पुन्हा जागेवर येऊन बसल्यावरच मी हा विषय मांडील,असे सांगितले. तोपर्यंत त्यांनी इतर विषयावर मनोगत व्यक्त केले. मात्र आयुक्त येताच दयाशंकर तिवारी यांनी डॉ.गंटावार ज्यांचे कोविडच्या काळात ‘छोटे मुंढे’असे नामांतरण झाले,त्यांच्या कारनाम्याविषयी सांगायला सुरवात केली. आयुक्त देखील लक्ष् पूर्वक ऐकत होते. मात्र गंटावारचे कुंटणखाना प्रकरणाविषयी ऐकून आयुक्तांचाही चेहरा हा बघण्यासारखा झाला होता.

तेथील परिचारिकेच्या ऑडीयो क्लिममधील संभाषणात,गंटावार यांची पत्नी ही मध्यप्रदेशमध्येच व्यस्त असताना डॉ.गंटावार हे कश्‍याप्रकारे दररोज रात्री वेगवेगळ्या तरुणींना इंदिरा गांधी रुग्णालयात घेऊन येत होते,याचे सुरस कथन व्यक्त केले आहे.विशेष म्हणजे,डॉ.गंटावार यांच्या याच स्त्रीलंपट स्वभावामुळे, चरित्र्यावान महीला स्टॉफने एकसाथ त्यांच्या धंतोली येथील खासगी रुग्णालय कोलंबियामधून राजीनामा दिल्याची चर्चा ही बरीच रंगली होती.

दटके यांचे खास-
माजी महापौर प्रवीण दटके यांच्या ‘खास‘मर्जीतील म्हणून डॉ.गंटावार गणले जात होते. मनपा मुख्यालयात गंटावार यांच्या अनेक ‘आर्थिक’व्यवहारांविषयी भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांनाही संपूर्ण सज्ञान आहे. मात्र तेच गंटावार मुंढे आयुक्त पदी रुजू होताच,आयुक्तांचे विशेष ‘प्रिय’ झाले आणि सत्ताधा-यांच्या नजरेत खूपू लागल्याची चर्चा आहे.

सभागृह स्थगित झाल्यानंतर माध्यमांना बाईट देताना माजी महापौर व भाजपचे आमदार प्रवीण दटके यांना खास ‘सत्ताधीश’ने ही विचारणा केली. सभागृहात चर्चिल्या गेलेल्या तसेच सदनाच्या पटलावर डॉ.गंटावार यांच्या विरोधात ठेवण्यात आलेले पुरावे,तसेच मनपा रुग्णालयाचे चक्क एका कुंटणखान्यात त्यांनी केलेले  परिवर्तन याबाबत मत विचारले असता,महापौर याची संपूर्ण दखल घेऊन आयुक्तांना ते निर्देश देतील,जो कोणी दोषी आहे निश्‍चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल,असे प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Latest बातम्या