Homeनागपूर न्यूजमंगळवारी तलावाच्या स्वच्छेसाठी नागरिकांचे मुंडण आंदोलन!

मंगळवारी तलावाच्या स्वच्छेसाठी नागरिकांचे मुंडण आंदोलन!

Advertisements

आम आदमी पार्टीच्या साखळी उपोषणाला १७ दिवस लोटूनही मनपा प्रशासन धृतराष्ट्!

नागपूर,ता. २५ ऑगस्ट: मंगळवारी तलावाच्या साफसफाई व सौंदर्यीकरण करण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे साई मंदिर नवी मंगळवारी तलाव येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यांत आले असून आज साखळी उपोषणाचा १७ वा दिवस असून ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी या आंदोलनाला सुरवात झाली होती. दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात स्थानिक ५ नागरीक साखळी उपोषणाला बसतात व त्याबाबतचे दररोज सायं ५ वाजता निवेदन सहाय्यक आयुक्त सतरंजीपूरा झोनला देण्यात येते अाहे मात्र मनपा प्रशासनाला ना जाग आली ना मनपा प्रशासनाने या साखळी उपोषणाची गंभीर दखल घेतली !

नागपूर शहराला मेट्रो शहर बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून उत्तर नागपूरातील या ऐतिहासीक तलावाकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. उत्तर नागपूर प्रभाग ५ अंतर्गत नवी मंगळवारी भागात सुमारे ३०० वर्ष जुना तलाव असून गेल्या २० ते ३० वर्षापासून हा तलाव दुर्गंधीयुक्त व रोगराईस आमंत्रण देणारा झालेला आहे . हा तलाव पूर्वी तीन एकर परिसरात होता . या तलावाचे पाणी परिसरातील लोक पिण्यासाठी वापरत असत . कालांतराने तलावाच्या आजूबाजूस अतिक्रमण झाल्यामुळे तलाव फारच लहान झाला आहे . या तलावात गडर लाईनचे पाणी तसेच आजूबाजूला घाण आणि कचरा व निर्माल्य यामूळे तलाव दूषित झाला असून परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे .

तलावाच्या सौंदर्यीकरण करण्याकरिता येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक , स्थानिक आमदार व खासदारांना व मनपा अधिकारी यांना अनेक निवेदने दिलीत परंतू याकडे दुर्लक्ष केल्या गेले .

आज आम आदमी पार्टी तर्फे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात यापूर्वी आम आदमी पक्षाने निवेदन देऊन एकदिवसीय नारे – निदर्शने  तसेच भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले . त्याची  दखल न घेतल्यामूळे ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून तलावाजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यांत आले.परंतु, मनपा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्थानिक आमदार व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत दिनांक २१ ऑगस्टला निवेदन देऊन दिनांक २४ ऑगस्टपर्यंत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दिनांक २५ ऑगस्ट दुपारी २ वाजता  स्थानिक महिला लिना सुनिल गजभिये , आम आदमी पक्ष उत्तर विधानसभा संयोजक रोशन डोंगरे , संपर्क प्रमुख नरेश महाजन , स्थानिक नागरिक भूषण देशमुख , सेवक बारापात्रे , शेखर मुंढरीकर यांनी मुंडन करुन शासन प्रशासनाचा निषेध केला, यापुढे देखील उग्र आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल ,असे प्रभाग अध्यक्ष विजय. नंदनवार , सचिव राज कुंभारे ( आर के ) , योगेश पराते व आमित अंबादे यांनी सांगितले.

साखळी उपोषणास आम आदमी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष विजय नंदनवार , सचिव राज कुंभारे , वार्ड अध्यक्ष योगेश पराते , अमित अंबादे, हरेश निमजे , किशोर मौंदेकर , संगीता केळवदे आज साखळी उपोषणांस बसले असून रोशन डोंगरे , प्रदीप पौनीकर, गुणवंत सोमकुंवर , नरेश महाजन , स्वप्नील सोमकुंवर ,  जयप्रकाश पौनीकर , गणेश राऊत , मानसींग अहिरवार , स्विटी इंदोरकर , प्रियंका तांबे , मृणाली जांभूळकर , शुभम मोरे ,पंकज मेश्राम , प्रणाली  सहारे , विजय धकाते , अब्दुल सलाम , संदिप पराते , हरीश वेलेकर ,निलकंठ टाकळीकर  , योगेश गोन्नाडे, अरूण गुणरकर , अनिल संभे , सुनिल गजभिये , संदीप पराते , गीताबाई मदने ,गीरजा कोहाड , लिना गजभिये , शांता गजभिये , ललीता नंदनवार , पार्वताबाई टाकळीकर , कांताबाई सोनकुसरे , मंजू रंगारी , बेबीनंदा रंगारी , कुंदा सोनकुसरे , शकुंतला पराते , मिथुन निमजे , अशोक रामटेककर इत्यादी पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .

Latest बातम्या