Homeनागपूर न्यूजभाजयुमो ने फुंकला महाविकास आघाडीचा पुतळा

भाजयुमो ने फुंकला महाविकास आघाडीचा पुतळा

नागपूर,५ ऑक्टो,  : आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे महाविकास आघाडीचा पुतळा फुंकण्यात आला.
ज्याप्रकारे महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत,महिलांवर वाढणारे अत्याचार आणि त्यावर हे महाविकास आघाडीचे सरकार काहीही पाऊल उचलत नाही,याचा आज निषेध करण्यात आला. आघाडीच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर हे केवळ राजकारण करण्याकरता करतात पण शिवशाही आणि शिवराज्य या महाराष्ट्रात प्रस्थापित व्हावे असे कुठलेही पाऊल उचलताना हे महाविकास आघाडी सरकार दिसत नाही.

हिंगणघाटच्या घटनेनंतर ‘दिशा’ कायदा आणतील व रॅपिड केस होऊन वीस-पंचवीस दिवसात गुन्हेगाराला शिक्षा होईल अशा सर्व बाता ह्या लोकांनी केल्या पण त्यावर कुठलेही पाऊल ह्या लोकांनी उचललेले नाही.

आज केवळ प्रतीकात्मक पुतळा आम्ही फुंकलेला आहे मात्र उद्या जर का ह्यांची कानउघडणी झाली नाही तर ज्या भाषेत त्यांना कळतं त्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याची तयारी आज भाजयुमो ने दाखवली आहे,असे या आंदोलनाचे नेतृत्व करणा-या भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी- वखरे यांनी पत्रकाद्वारे कळवले.

निषेध आंदोलनात भक्ती आमटे, आरती पांडे पाटील, प्रतीक्षा पोहणकर, प्रगती कारेमोरे, शिवानी हाडगे, जया नितनवरे, पूजा बदुले, रागिणी संघपाल, आसावरी लोही, योगेश पाचपोर, सचिन सावरकर, सारंग कदम, अलोक पांडे, वैभव चौधरी, रितेश रहाटे, अमर धरमरे, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, संदीपन शुक्ला, अनिकेत ढोले, सागर गंधर्व, संकेत कुकडे उपस्थित होते.

Latest बातम्या