Homeनागपूर न्यूजभाजप प्रवेशापूर्वी आशिष देशमुख यांचे देवदर्शन

भाजप प्रवेशापूर्वी आशिष देशमुख यांचे देवदर्शन

रविवारी करणार भाजपात प्रवेश

नागपूर,ता.१६ जून २०२१: भाजप प्रवेशापूर्वी डॉ. आशिष देशमुख यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा आणि नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तिथे उपस्थित प्रसार माध्यमांशी केलेल्या वार्तालापात ते म्हणाले, ‘मी राजकीय वाटचालीच्या महत्वपूर्ण वळणावर आहे. महाराष्ट्रातील जनतेची चांगली सेवा करण्याची संधी व ताकद मिळावी म्हणून साईबाबांचे आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे.

माझं राजकीय आयुष्य आता नवीन वळणावर उभं आहे. भविष्यात जनतेची सेवा करीत रहावं, हीच माझी अपेक्षा आहे. समाजाच्या सेवेचे व्रत घेऊन मी राजकारणात आलो आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी माध्यम हे महत्वाचे आहे. त्या अनुषंगानेच, एका नवीन वाटेवर माझे जाणे आता निश्चित झाले आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून आणि जनतेची सेवा करण्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल करणार आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल महाराष्ट्र आणि विदर्भातील कॉंग्रेस पक्षामधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाबद्दल बोलणं गरजेचे नाही. माझं राजकीय आयुष्य आता सकारात्मक वळणावर असून ते जनतेच्या सेवेसाठी रहावं, हीच माझी अपेक्षा आहे.

आशिष देशमुख हे रविवार दिनांक १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील ‘नैवेद्यम नॉर्थस्टार’ सभागृहात सकाळी १० वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
यावेळी भाजपचे विदर्भातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. डॉ. आशिष देशमुख यांचे कार्यकर्तेसुद्धा यावेळी उपस्थित राहतील.

भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान:बावणकुळे
माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी ओबीसी विरोधी असलेले राहुल गांधीवर टीका केली. यावरून नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे असेलही. पण भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे. आशिष देशमुख यांनी मला लोकसभा, विधानसभा निवडणूक लढायची नाही. तर मला भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे. काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याने मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही, असे देशमुख यांनी सांगितल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
………………………..

Latest बातम्या