Homeनागपूर न्यूजभाजपच्या छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

भाजपच्या छोटू भोयर यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

Advertisements
Advertisements

नागपूर,ता.२२ नोव्हेंबर: नागपूर शहर जिल्हा काॅंग्रेस कमेटीची महत्वपूर्ण बैठक आज शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडीया भवन येथे पार पडली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त रविंद्र उपाख्य भोयर यांचा पक्ष प्रवेश पार पडला. काॅंग्रेसचे सभासद म्हणून त्यांना पक्षाचा तिरंगा दुपट्टा गळ्यात घालून विधिवत काॅंग्रेस प्रवेश देण्यात आला.

याप्रसंगी राज्याचे उर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री डाॅ.नितीन राउत, व राज्याचे क्रिडा व दुग्धविकास मंत्री व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केंदार,आ.अॅड.अभिजीत वंजारी,आमदार राजू पारवे,माजी मंत्री जिल्हा अध्यक्ष राजेद्र मुळक,प्रदेश मिडिया सेलचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रदेश काॅंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे,महासचिव उमाकांत अग्निहोत्री,अतुल कोटेचा,संदेश सिंगलकर,सचिव गिरीश पांडव,जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे,प्रधान महासचिव डाॅ.गजराज हटेवार उपस्थित होते.

Latest बातम्या