
दहा दिवसात संपर्क साधण्याचे आवाहन
नागपूर,दि. २९ नोव्हेंबर २०२३ : जिल्हयामध्ये रस्त्यावर सापडलेले व सोडून दिलेले, घरुन निघून आलेल्या, संरक्षणाची गरज असलेली बालके व विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन व पालन पोषणाची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाने स्विकारली असून महिला व बाल विकास विभागातर्गत जिल्हा बालरक्षक कार्यरत आहे. विभागाद्वारे दहा बालके बाल संरक्षणगृहात असून ही मुले आईवडिलांची वाट पाहत आहेत.
सहा वर्षाचा दिपक अर्जुन बेलवंशी याला शासकीय मुलाचे बालगृह, नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सध्यस्थितीत बालक डागा बालसदन कामठी येथे राहत असून शिक्षण घेत आहे., १४ वर्षाचा शैलेष मोहन मेश्राम याला कसतुरचंद डागा बालसदन कामठी दाखल करण्यात आले आहे.
१२ वर्षाची सोनु रामपुरणलाल चव्हाण, १५ वर्षाची प्रिया रामपुरणलाल चव्हाण व १४ वर्षाची चंचल रामपुरणलाल चव्हाण या तिन्ही बालीका नागपूर येथे बस स्टॉपच्या परीसरात फूटपाथ वर भिक मागत असतांना आढळून आल्या. बालिकेच्या वडीलाची मानसिक स्थिती ठिक नसून आई सोडून गेल्या बाबतची माहिती प्राप्त आहे. तिन्ही बालिका सध्या आशा किरण बालगृह खसाडा, मसाडा येथे शिक्षण घेत आहे.
बालिकेच्या पालकांचा व नातेवाईकाचा शोध घेतला असता अध्यापर्यंत कोणीही मिळून आलेले नाही.
याच बालगृहातील १४ वर्षाची खुशबु विजय चाहांदे व १५ वर्षाची शिवानी विजय चाहांदे या दोन्ही बालिकेच्या वडीलांचा मृत्यु झाला असून आई सोडून गेल्याबाबतची माहिती प्राप्त आहे. बालिकेच्या पालकाचा व नातेवाईकाचा शोध घेतला असता अध्यापर्यंत कोणही मिळून आलेले नाही.
दुर्गा मोहन मेश्राम वय ९ वर्ष रेल्वे चाईल्ड लाईन मार्फत बालसदन खसाडा, मसाडा येथे दाखल करण्यात आले. या बालिकेचे वडील मृत्यु पावले असून आई झेंडा चौक चित्रगंधा स्कूल रस्त्यावर भिक मागत आसल्याची माहिती प्राप्त आहे. परंतु मागील पाच वर्षापासून दुर्गा हिला कोणीही नातेवाईक भेटायला आले नाही. छकुली लालाजी नन्नावरे वय १४ वर्षाची बालिका भांडेवाडी झोपडपटटी रेल्वे स्टेशनच्या मागे परीवारासोबत राहत असून भिक मागत होती. बालीकेला विचारले असता आई वडीलाचे निधन झाले असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत बालसदन येथे राहत असून शिक्षण घेत आहे परंतु मागील पाच वर्षापासून छकुली हिला कोणीही नातेवाईक भेटायला आले नाही.
१३ वर्षाची स्नेहल वामनराव ढोबळे हिचे आई वडील घर सोडून गेले असल्याची माहिती प्राप्त आहे. सद्यस्थितीत बालसदन येथे राहत असून शिक्षण घेत आहे पंरतु अद्यापपर्यंत स्नेहल हिला कोणीही नातेवाईक भेटायला आले नाही.
ज्या पालकांना यांच्यावर हक्क दाखवयाचा असेल त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांचे सोबत दुरध्वनी क्र. 0712-2569991 यावर दहा दिवसाच्या आत संपर्क साधावा. सपंर्क न साधल्यास केंद्रिय दत्तक प्राधिकरण न्यु दिल्ली यांचे मार्गदर्शक नियमावलीनुसार बाल संरक्षण समितीच्या आदेशाने दत्तकमुक्त करण्याची प्रकिया पूर्ण करण्यात येईल, असे जाहीर आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिला बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
***

आमचे चॅनल subscribe करा